Sections

गळफास लावून युवा शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 25 एप्रिल 2018
suicide

दर्यापूर (जि. अमरावती) - शहरातील जयस्तंभ चौकातील सेंट्रल बॅंकेसमोरील खुल्या जागेत एका टिनाच्या शेडमध्ये युवा शेतकऱ्याने मंगळवारी (ता. २४) गळफास लावून आत्महत्या केली. विकास बाळकृष्ण तायडे (वय ३३, रा. कौलखेड), असे मृत युवकाचे नाव आहे. एका नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी विकास तायडे गावात आला होता; मात्र तो विमनस्क अवस्थेत बनोसा मार्केटमध्ये फिरताना दिसला. तेथीलच एका दुकानातून त्याने दोरी विकत घेतली आणि त्याच दोरीने गळफास लावला. त्याच्याकडे पाच एकर शेती असून अंगावर कर्ज असल्याचे समजते. या विवंचनेतूनच त्याने गळफास घेतला असावा, असा अंदाज आहे. पोलिस उपनिरीक्षक नंदलाल निंघोट यांनी पंचनामा केला.

Web Title: Youth Farmer suicides by hanging

टॅग्स

संबंधित बातम्या

नकली सोने गहाण ठेऊन बँकेला 17 लाखांचा गंडा

परळी : बँकेने नेमलेल्या मूल्यमापक सोनाराने मित्रांसोबत संगनमत करून तिघा खोट्या कर्जदारांच्या मार्फत परळीच्या अ‍ॅक्सिस बँकेत नकली सोने गहाण ठेवून...

प्रफुल्ल पाटील
Loksabha 2019 : गटातटाच्या बंडाळीत बुडलाय माढा!

लोकसभा मतदारसंघात सरकारची धोरणं अथवा सर्वपक्षीय नेतृत्वाचा करिष्मा चालत नसतो. इथं या सर्वांवर जिल्ह्यातलं गटातटाचं राजकारण भारी पडतं. नातीगोती अन्‌...

शेती थकबाकीची जूननंतर वसुली 

सोलापूर - राज्यातील जिल्हा बॅंकांचे शेती व बिगरशेती कर्जाचे तब्बल 43 हजार कोटी रुपये थकले आहेत, त्यामुळे राज्यातील 16 जिल्हा बॅंकांची थकीत कर्जे...

"मनपा'ने थकविले "ग. स.', "एलआयसी'चे हप्ते 

जळगाव ः महापालिका कर्मचाऱ्यांच्या 32 महिन्यांच्या पगारातून पाच कोटी सत्तर लाख रुपये ग. स. सोसायटी व "एलआयसी'च्या हप्त्याचे कपात झाले. मात्र, हे...

वसुलीसाठी सावकाराचा नवविवाहितेवर अत्याचार

कोल्हापूर - अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर एका खासगी सावकाराने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

Sugarcane
ऊस उत्पादकांना दुसऱ्या बिलाची प्रतीक्षा

काशीळ - जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना वगळता इतर सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. मात्र, आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही कारखान्याने ‘...