Sections

प्रेयसीने केले लैंगिक शोषण

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 12 एप्रिल 2018
Sexual-abuse-Man

नागपूर - प्रेयसीने मला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत लैंगिक शोषण केले. त्यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रियकराने आज बुधवारी पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. शशांक डोंगरे (वय ३३, रा. हुडकेश्‍वर) असे पीडित प्रियकराचे नाव आहे. युवकाच्या तक्रारीसमोर पोलिस हतबल असून त्याने दिलेल्या तक्रार अर्जावर काय कारवाई करावी, अशा संभ्रमात आहेत.

नागपूर - प्रेयसीने मला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत लैंगिक शोषण केले. त्यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रियकराने आज बुधवारी पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. शशांक डोंगरे (वय ३३, रा. हुडकेश्‍वर) असे पीडित प्रियकराचे नाव आहे. युवकाच्या तक्रारीसमोर पोलिस हतबल असून त्याने दिलेल्या तक्रार अर्जावर काय कारवाई करावी, अशा संभ्रमात आहेत.

पीडित शंशाक हा अभियंता असून त्याची २००८ नातेवाइकाच्या लग्नात आसावरी (बदललेले नाव) हिच्याशी ओळख झाली. तिने नातेवाइकांकडून शशांकचा मोबाईल नंबर मिळवला आणि फोनवरून मैत्री केली. एकाच शहरात राहत असल्यामुळे तिने भेटण्याची इच्छा व्यक्‍त केली. शशांक त्यावेळी नोकरी आणि शिक्षण घेत होता. दोघांची भेट झाल्यानंतर तिने थेट त्याला ‘प्रपोज’ केले. त्यानेही होकार देत प्रेमाचा स्वीकार केला.

आठवड्याभरातच तिने कुटुंबीयांशी भेट घालून प्रियकर असल्याची ओळख करून दिली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना भेटण्याचा तगादा लावला. त्यानेही आपल्या कुटुंबीयांची ओळख करून दिली. दोघांत नऊ वर्षे प्रेमसंबंधाचे नाते होते. तिने लग्नाचा तगादा लावला. 

मात्र, शिक्षण पूर्ण करताच तिला स्पर्धा परीक्षाचे क्‍लासेस लावून दिले. २०१४ मध्ये तिला एका बॅंकेत नोकरी लागली. दोघांच्याही घरच्यांनी लग्नास होकार दिला. 

या दरम्यान आसावरीने एक दिवस घरी बोलावून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप शशांकने केला. त्यानंतर ती वारंवार शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होती. तिच्या दबावाला बळी पडून तब्बल आठ वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप शशांकने केला आहे. त्यानंतर तिला लग्नाविषयी विचारले असता तिने चक्‍क नकार दिला. त्यामुळे शशांकने हुडकेश्‍वर पोलिस स्टेशन गाठून तक्रार अर्ज दिला. मात्र, तक्रार पाहताच पोलिसही संभ्रमात पडले. वरिष्ठांना विचारून निर्णय घेऊ, असे जुजबी उत्तर देऊन शशांकची बोळवण केली. या प्रकरणात पोलिस काय कारवाई करतील? याची उत्सुकता लागली आहे.

 

Web Title: Sexual abuse by girlfriend

टॅग्स

संबंधित बातम्या

फलकांवर छायाचित्रे असणाऱ्यांची यादी द्या! 

मुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या...

#NavDurga सोशिक सीता नाही; झाशीच्या राणी व्हा! 

पुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो....

File photo
जागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत

जागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत नागपूर : "दीक्षाभूमी म्हणजे बौद्धांचे धार्मिक स्थान. यामुळे ऐतिहासिक अशा धम्मदीक्षेची भूमी आम्हाला मिळावीच....

बाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट

पुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल...

रद्दीच्या बदल्यात विद्यार्थ्यांना वह्या 

मुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि "नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात...