Sections

छाननी लिपिक 70 हजारांची लाच घेताना ताब्यात

नीळकंठ कांबळे |   गुरुवार, 19 एप्रिल 2018
The scrutiny clerk is in possession of a Seventy thousands bribe

एका बिअरबारमध्ये तक्रारदाराकडून तडजोडीअंती 70 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर काशिफ सय्यद याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

लोहारा - शेतजमीन मोजणीच्या नकाशावर हद्द कायम करून नकाशाची नक्कल देण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लोहारा (जि. उस्मानाबाद) येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 19) पकडले. 

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदाराने सास्तूर (ता. लोहारा) येथे शेतजमीन खरेदी केली. खरेदीवेळी मूळ मालकाने शेत जमिनीच्या मोजणीवरून हद्द कायम करून कब्जा देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे मोजणी शुल्क भरून जमिनीची मोजणी करण्यात आली. मोजणीच्या नकाशावर हद्द कायम करून नकाशाची नक्कल देण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक काशिफ तारेख अहेमद सय्यद याने तक्रारदाराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उस्मानाबाद कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे, पोलिस निरीक्षक बी. जी. आघाव, व्ही. आर. बहिर यांनी बुधवारी (ता. 18) या तक्रारीची शहानिशा केली. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास लोहारा येथील एका बिअरबारमध्ये तक्रारदाराकडून तडजोडीअंती 70 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर काशिफ सय्यद याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The scrutiny clerk is in possession of a Seventy thousands bribe

टॅग्स

संबंधित बातम्या

किरकोळ बाजारात भाज्या महागच 

ऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र...

मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...

File photo
भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार

भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...

एक लाख कोटींचा खड्डा 

नाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...

आलोक नाथ यांची "सिन्टा'तून उचलबांगडी 

मुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या...

वृद्धाच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणेत मुलाला अटक 

नवी मुंबई - कोपरखैरणे सेक्‍टर 14 मधील न्यू कृष्णा टॉवरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार धाहोत्रे (62) या वृद्धाची त्यांचा मुलगा निखिल यानेच हत्या...