Sections

सुरेश भट सभागृहात लागणार पार्किंग शुल्क

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 8 मे 2018
Suresh-Bhatt-Hall

नागपूर - आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेने शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात परिसरात वाहन पार्किंगसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहेच, शिवाय येथे येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांच्या सुरक्षेची हमीही मिळणार असल्याचे सूत्राने नमूद केले. 

नागपूर - आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेने शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात परिसरात वाहन पार्किंगसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहेच, शिवाय येथे येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांच्या सुरक्षेची हमीही मिळणार असल्याचे सूत्राने नमूद केले. 

महापालिकेने मध्य नागपूर परिसरातील रसिकांसाठी सुरेश भट सभागृह बांधले. सर्व सोयीसुविधा असलेल्या या सभागृहात येणार प्रेक्षक येथील सुविधांनी थक्क होतो. दररोज होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येथे येतात. सध्या त्यांच्याकडून कुठलेही वाहन पार्किंग शुल्क घेतले जात नाही. दुसरीकडे शहरातील काही सभागृहात पार्किंग शुल्क आकारल्या जाते. या धर्तीवर पार्किंग शुल्क न वसूल केल्यामुळे महापालिकेचे वर्षाला कोट्यवधीचे नुकसान होत आहे.

हे नुकसान भरून काढणे तसेच प्रेक्षकांना त्यांच्या वाहनांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी पार्किंग शुल्क घेण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या वाहतूक विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव १० मे रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. दर निश्‍चत केल्यानंतर पार्किंगसाठी निविदा काढण्यात येणार आहे.

प्रस्तावित पार्किंग शुल्क प्रति कार्यक्रम  सायकल    ५ रुपये  दुचाकी    १० रुपये  चारचाकी वाहने    २० रुपये

Web Title: parking fee in suresh bhat hall

टॅग्स

संबंधित बातम्या

"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान?

स्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....

न्या. लोया मृत्यूप्रकरणाची होणार सुनावणी 

नागपूर - न्या. लोया रविभवनात थांबले होते तेव्हा, त्यांच्यासोबत न्या. विनय जोशीदेखील होते, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे न्या. रवी...

File photo
वसुली निरीक्षक बनले व्यवस्थापक

नागपूर : चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने, तसेच त्यांचा शैक्षणिक, आर्थिक...

File photo
दीक्षान्त सोहळ्यातील 275 पदके घटली

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे दीक्षान्त समारंभात पदक, पारितोषिकांसाठी वाढीव रक्‍कम देण्याचे आवाहन करण्यात आले होते....

नागपूर : जप्त मद्यसाठा आणि महिला तस्करांसह कारवाई करणारे रेल्वे सुरक्षा दलाचे पथक.
साडीत बाटल्या लपवून मद्यतस्करी

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर स्थानकावरील पथकाने मद्यतस्करांना जेरीस आणले आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवूनही मद्यसाठा पकडला जात आहे. साडीखालील...

पती नागुपरात पत्नी अमेरिकेत अन् व्हॉट्सअॅपवर झाला घटस्फोट

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवरून अनेकदा चॅटिंग केले जाते. मात्र, आता चक्क व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये संबंधित...