Sections

प्रत्येक पोलिस होणार ‘स्मार्ट’

अनिल कांबळे |   गुरुवार, 5 एप्रिल 2018
Smart-Police

नागपूर - प्रत्येक पोलिस कर्मचारी ‘डिजिटल’ व्हावा, यासाठी पोलिस आयुक्‍तांच्या प्रयत्नास यश आले आहे. ‘ध्रुवा’ नावाने ऑनलाइन सेवा प्रदान करण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांना सुटीच्या ऑनलाइन अर्जापासून ते उद्याची ड्यूटी कुठे असेल, ही माहिती मोबाईलवर मिळत आहे. त्यामुळे नागपूर शहर विभाग जवळपास डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे.

शहर पोलिस दल ‘डिजिटल’ करण्यासाठी पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी अनेक सकारात्मक बदल केले आहेत. पोलिसांना कॉम्प्युटर आणि अन्य ऑनलाइन सेवेचा वापर करण्यासाठी ‘एन-कॉप्स’ ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्यात आले आहे.

नागपूर - प्रत्येक पोलिस कर्मचारी ‘डिजिटल’ व्हावा, यासाठी पोलिस आयुक्‍तांच्या प्रयत्नास यश आले आहे. ‘ध्रुवा’ नावाने ऑनलाइन सेवा प्रदान करण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांना सुटीच्या ऑनलाइन अर्जापासून ते उद्याची ड्यूटी कुठे असेल, ही माहिती मोबाईलवर मिळत आहे. त्यामुळे नागपूर शहर विभाग जवळपास डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे.

शहर पोलिस दल ‘डिजिटल’ करण्यासाठी पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी अनेक सकारात्मक बदल केले आहेत. पोलिसांना कॉम्प्युटर आणि अन्य ऑनलाइन सेवेचा वापर करण्यासाठी ‘एन-कॉप्स’ ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्यात आले आहे.

बदलत्या काळानुरूप प्रत्येक पोलिस ‘स्मार्ट’ करण्यासाठी ‘ध्रुवा’ नावाची ऑनलाइन सेवा देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचे अकाउंट तयार करण्यात आले आहे. ही सेवा वापरण्यासाठी नागपूर पोलिस वेबसाइटवर अकाउंट नंबर टाकावा लागतो. त्यानंतर नोंदणी असलेल्या मोबाईलवर लगेच ‘ओटीपी’ येतो. ओटीपी टाकताच पासवर्ड तयार करता येतो. ‘ध्रुवा’ सेवेसाठी ‘आयटी’च्या विशेष पथकाने प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचे फोटो, मोबाईल नंबर, सर्व्हिस शिट, बक्षीस-पुरस्कार, कार्यालयीन शिक्षा, नियुक्‍त पोलिस स्टेशन, पगार, कपात, विमा आणि अन्य सेवेची माहिती एका क्‍लिकवर मिळत आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचा वेळ आणि आयुक्‍तालयाचे हेलपाटेसुद्धा वाचत आहेत. कर्मचाऱ्यांना सुटी पाहिजे असल्यास ऑनलाइन अर्ज करता येतो, तसेच किती सुट्या शिल्लक आहेत, याबाबतही माहिती मिळते. या ऑनलाइन सेवेवर पोलिस कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

चार पोलिस स्टेशन अपडेट ‘ध्रुवा’ ऑनलाइन सेवा सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. सध्या अंबाझरी, सीताबर्डी, धंतोली आणि गिट्टीखदान पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळत आहे. परंतु येत्या काहीच दिवसांत ही सेवा संपूर्ण पोलिस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात येणार आहे. 

एसएमएसवर ड्यूटीची माहिती पोलिस कर्मचाऱ्यांची दैनंदिन ड्यूटी कोठे लावावी याबाबत ड्यूटी रायटर ठरवत होता. ती माहिती पोलिस ठाण्यात गेल्यावरच कर्मचाऱ्यांना कळत होती. मात्र, ‘ध्रुवा’ सेवेनुसार उद्याची ड्यूटी कोठे लावण्यात आली आहे, याबाबत रात्रीलाच एसएमएस पोलिस कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर येतो. त्यामुळे पोलिसांना घरूनच तयारीनिशी निघता येते. 

पोलिस सेवेबाबत अनुत्सुक अनेक पोलिसांना इंटरनेट, ई-मेल्स, वेबसाइट आणि स्मार्टफोन हाताळता येत नाही. त्यामुळे या सेवेबाबत अनुत्सुक आहेत. अनेकांना पासवर्ड कसा सेट करावा किंवा एटीपी कसा मिळवावा, याबाबत माहिती नाही. त्यामुळे अनेक पोलिसांना प्रशिक्षणाची गरज आहे. जेणेकरून प्रत्येक पोलिस ‘स्मार्ट’ बनविण्याचे स्वप्न पूर्णत्वास जाईल.

पोलिस विभागही ‘स्मार्ट’ बनत आहे. पोलिस डिजिटल-स्मार्ट बनविण्यासाठी हा सकारात्मक बदल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना घरबसल्या ऑनलाइन सेवा मिळावी तसेच समाधानही व्हावे, असा प्रयत्न आहे. - डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त

Web Title: nagpur vidarbha news police smart

टॅग्स

संबंधित बातम्या

crime
दौंड : मेडीकलमध्ये चोरी, 4 लाख 34 हजार रूपयांची रोकड चोरीस

दौंड (पुणे) : दौंड शहराजवळील लिंगाळी (ता. दौंड) येथील पल्लवी मेडीकल मध्ये झालेल्या चोरीत 4 लाख 34 हजार रूपयांची रोकड चोरीस गेली आहे....

nanded
नांदेड - बंदोबस्तावरील पोलिसांना टिफीनचे वाटप 

नांदेड - गणेश विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्त कामी असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल आणि पोलिस मित्रांना जेवनाचे टिफीन वाटप करण्यात आले. हा...

ulhasnagar
उल्हासनगरातील कृत्रिम तलावात 16 हजार 661 बाप्पांचे विसर्जन

उल्हासनगर : पालिकेने तयार केलेल्या पाच कृत्रिम तलावात उल्हासनगरातील गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले आहे. तलावातून 45 टन निर्माल्य जमा झाले...

Pakistani man singing Indian national anthem during Asia Cup match goes viral watch video
Asia Cup : अन् पाकिस्तानी व्यक्तीनेच गायले भारतीय राष्ट्रगीत

दुबई- भारत पाकिस्तान सामना म्हटले की, प्रेक्षकांसाठी प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो. मैदानातील प्रत्येक घडामोडीवर प्रेक्षकांचे लक्ष असते. भारत आणि...

wani
मिरवणुकीच्या खर्चातून वसतिगृहातील मुलांना फळांचे वाटप

वणी (नाशिक) : येथील वणीचा राजा बजरंग गणेशोत्सव मित्र मंडळाने पोलिसांचा बंदोबस्ताचा ताण कमी करण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून वसतिगृहातील...