Sections

मुन्ना यादवला अटकपूर्व जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 24 एप्रिल 2018

नागपूर - गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मुन्ना यादवला आज सर्वोच्च न्यायालयाने तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मुन्ना यादव याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.

नागपूर - गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मुन्ना यादवला आज सर्वोच्च न्यायालयाने तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मुन्ना यादव याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा अध्यक्ष मुन्ना उर्फ ओमप्रकाश यादव व मंगल यादव यांच्या गटात २१ ऑक्‍टोबर २०१७ ला सशस्त्र हाणामारी झाली होती. भाऊबीजेसाठी मंजू यादव या मंगल यादव यांच्याकडे आल्या होत्या. त्यावेळी मुन्ना यादवची मुले करण व अर्जुन परिसरात फटाके उडवत होते. त्यावरूनच वाद झाला आणि करण व अर्जुनने मंजू यादव यांना मारहाण केली. दोन्ही कुटुंबातील भांडण विकोपाला गेले व मुन्ना तसेच बाला यादव यांनी  आपल्या साथीदारांच्या मदतीने तलवारीने हल्ला चढवला. दोन्ही गटांत हाणामारी होत असताना पोलिस पोहोचले. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी मुन्ना व त्याच्या कुटुंबियांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणात मुन्ना यादववरील प्राणघातक हल्ल्याचे कलम वगळून मारहाणीचे कलम लावले होते. याविरोधातही मंगल यादवने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. दरम्यान, उच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये पोलिसांनी मुन्नाच्या जामीनाला स्पष्ट विरोध दर्शवला होता.

मुन्ना यादव याने संबंधित घटनेच्या वेळी महिलेची साडी आणि केस ओढले होते. यावरून आरोपीला महिलांप्रती आदर नाही, असे सिद्ध होत असल्याचे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदविले होते. घटनेप्रसंगी मंगल यादव याने ‘तू तो फुटेज में आ गया’ असे मुन्ना यादव याला म्हटले होते. त्यावर ‘मै फुटेज गायब कर दुँगा’ असे विधान मुन्ना यादवने केले होते. यावरून त्याची कायदा मोडण्याची प्रवृत्ती स्पष्ट होते, असे स्पष्ट निरीक्षणही न्यायालयाने आदेशात नोंदवले होते. पोलिसांनी कस्टडी मागितली नसली तरी अटकपूर्व जामीनाला सातत्याने विरोध केला आहे. यावरून मुन्ना यादव याची विचारपूस करणे गरजेचे आहे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने मुन्ना यादव याचा अटकपर्व जामीनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. मात्र, मुन्नाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आज अटकपूर्व जामीन मिळवला. न्या. जस्ती चेलमेश्‍वर आणि न्या. संजय कौल यांच्यासमक्ष ही सुनावणी झाली. वरीष्ठ अधिवक्ता मुकूल रोहतगी यांनी मुन्ना यादवची बाजू मांडली.

Web Title: Munna Yadav anticipatory bail granted

टॅग्स

संबंधित बातम्या

Akhilesh Yadav Demands JPC Probe Into Rafale Deal, Says Issue Has Now Become Global
राफेल खरेदी व्यवहाराची संसदीय समितीमार्फत चौकशी करा- अखिलेश

नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन देशातील राजकीय वातवरण तापले आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्या राफेल...

जुन्नर : कोळवाडी येथे अपघातात दोन जण ठार एक  गंभीर जखमी

ओतूर (ता.जुन्नर) : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कोळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कवडधरा मंदिराजवळ दुचाकी आणि पिकअप यांची समोरासमोर...

Shubha lagna savdhan trailer launched program
'शुभ लग्न सावधान'चा पार पडला ट्रेलर सोहळा

अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पल्लवी विनय...

pandharpur
पंढरपूरमध्ये गणरायाला निरोप

पंढरपूर : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सर्वच जण आनंदाने मिरवणूकीमध्ये सहभागी होतात. परंतु 24 तास ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना मात्र अशा...

पुणे : भव्य मिरवणुकीने दापोडीत गणरायाला निरोप

पुणे : गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष..ढोल ताशांचा दणदणाट...पारंपारीक बँड पथक..आकर्षक सजवलेल्या रथातुन निघालेल्या गणपती...