Sections

श्रीदेवींच्या उपस्थितीने ‘देखणा’ झाला सोहळा!

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
फ्लॅशबॅक - काटोलमध्ये चौदा वर्षांपूर्वी झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अभिनेत्री श्रीदेवी.

नागपूर - चार दशके भारतीय चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी बॉलीवूडची ‘चांदनी’ अर्थात श्रीदेवी यांनी आज अचानक एक्‍झिट घेतली. केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरील असंख्य चाहते हळहळ व्यक्त करीत असताना काटोल येथील कार्यक्रमाच्या आठवणीही ताज्या झाल्या. चौदा वर्षांपूर्वी खास महिला खो-खोपटूंचा गौरव करण्यासाठी त्या काटोल येथे आल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीने ‘देखणा’ झालेला हा सोहळा आजही सर्वांच्या स्मरणात आहे.

नागपूर - चार दशके भारतीय चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी बॉलीवूडची ‘चांदनी’ अर्थात श्रीदेवी यांनी आज अचानक एक्‍झिट घेतली. केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरील असंख्य चाहते हळहळ व्यक्त करीत असताना काटोल येथील कार्यक्रमाच्या आठवणीही ताज्या झाल्या. चौदा वर्षांपूर्वी खास महिला खो-खोपटूंचा गौरव करण्यासाठी त्या काटोल येथे आल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीने ‘देखणा’ झालेला हा सोहळा आजही सर्वांच्या स्मरणात आहे.

काटोलमध्ये २००४ मध्ये विदर्भ युथचे अध्यक्ष अनुप खराडे यांनी महिलांची अखिल भारतीय खो-खो स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या काटोलमध्ये ही स्पर्धा होत असल्याने पुरस्कार वितरण सोहळ्याला महिला सेलिब्रिटीला आमंत्रित करण्याचाच त्यांनी विचार केला. ‘मुंबईला एका कार्यक्रमात भेट झाल्यावर मी श्रीदेवींना काटोलला येण्याची विनंती केली. महिलांच्या खो-खो स्पर्धा असल्यामुळे त्यांनाही कौतुक वाटले आणि लगेच होकार दिला.

त्यांच्या उपस्थितीने आयोजक आणि खेळाडूंचाही उत्साह वाढला होता,’ अशी आठवण माजी मंत्री अनिल देशमुख यांनी ‘सकाळ’ला सांगितली. १९९७ ते २००४ या कालावधीत त्यांनी फारसे चित्रपट केलेले नसले तरी रसिकांच्या मनावरील त्यांच्या अभिनयाचे गारूड कायम होते. त्यामुळेच काटोलमधील चाहत्यांनी अतिशय जल्लोषात स्वागत केले होते. मुंबईपासून साडेआठशे किलोमीटर लांब एका तालुक्‍याच्या ठिकाणी चाहत्यांचे आपल्यासाठी असलेले प्रेम बघून श्रीदेवीही भारवल्या होत्या, अशी आठवण विदर्भ युथचे अनुप खराडे सांगतात. बक्षीस वितरण सोहळ्यात भाषण करताना श्रीदेवी यांनी अनिल देशमुख यांच्या ‘हिरो’ पर्सनॅलिटीचे कौतुक करताना ‘आप गलतीसे पॉलिटिक्‍स में गये, आप को तो हमारे फिल्ड में होना था’ असा डायलॉगही मारला होता.

मराठीत काम करण्याची इच्छा या कार्यक्रमानंतर श्रीदेवी यांनी काटोल व नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला होता. मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे का, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला. श्रीदेवी यांनी, ‘मराठीत काम करण्याची खूप इच्छा आहे. योग्य संधी मिळाल्यास नक्कीच काम करायला आवडेल’, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर मराठी चित्रपटांमध्ये तर त्यांना कामाची संधी मिळाली नाही; पण काही वर्षांपूर्वी ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटात मराठमोळ्या आईची भूमिका साकारून त्यांनी आपली इच्छा पूर्ण करून घेतली.

Web Title: marathi news nagpur news sridevi kho kho competition event

टॅग्स

संबंधित बातम्या

Ganesh Festival : ढोल-ताशा पोहोचला साता-समुद्रापार

सध्या ढोल-ताशावर टीका होते, ती आवाजामुळे आणि पथकांच्या वाढत्या संख्येमुळे. ध्वनिप्रदूषण आणि डेसिबल हे शब्द उत्सवाच्या काळात हमखास चर्चेत येतात....

amazon-more
दिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)

भारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...

"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले  

मुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...

महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर 

मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...

dr uma kulkarni
अनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध

साने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...