Sections

बारा लाखांवर महिला, प्रसाधनगृहे केवळ पावणेदोनशे!

राजेश प्रायकर |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
Municipal-Toilet

नागपूर - शहराची लोकसंख्या २४ लाखांवर असून यातील निम्म्या महिला आहेत. यातील अनेक महिला कामानिमित्त, बाजारासाठी बाहेर पडतात. मात्र, त्यांच्यासाठी शहरात केवळ १७३ ठिकाणी सहाशे प्रसाधनगृहे आहेत. विशेष म्हणजे प्रसाधनगृहे तयार करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना तयार असताना नागरिकच नव्हे तर लोकांनी निवडून दिलेले नगरसेवकही दुर्गंधीचे कारण पुढे करून विरोध करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे बाजार किंवा इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची कुचंबणा होत आहे. 

नागपूर - शहराची लोकसंख्या २४ लाखांवर असून यातील निम्म्या महिला आहेत. यातील अनेक महिला कामानिमित्त, बाजारासाठी बाहेर पडतात. मात्र, त्यांच्यासाठी शहरात केवळ १७३ ठिकाणी सहाशे प्रसाधनगृहे आहेत. विशेष म्हणजे प्रसाधनगृहे तयार करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना तयार असताना नागरिकच नव्हे तर लोकांनी निवडून दिलेले नगरसेवकही दुर्गंधीचे कारण पुढे करून विरोध करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे बाजार किंवा इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची कुचंबणा होत आहे. 

शहरात महापालिकेचे १०२ ठिकाणी सार्वजनिक शौचालये आहेत. यात पुरुषांसाठी ४८८ सिट्‌स असून महिलांसाठी केवळ २८५ सिट्‌स आहेत. यात सुलभ इंटरनॅशनलने तयार केलेल्या ५४ प्रसाधनगृहांचा समावेश आहे.

झोपडपट्टी आदी वस्त्यांसाठी ७१ ठिकाणी सामुदायिक शौचालये तयार करण्यात आली. यात पुरुषांसाठी ३०१ तर महिलांसाठी ३२१ सिट्‌स आहे. ही प्रसाधनगृहे केवळ वस्त्यांसाठी आहे. त्यामुळे याचा अपवाद वगळता शहरात कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी केवळ २८५ सिट्‌स आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २४ लाख ५ हजार ९११ आहे. त्यात महिलांची लोकसंख्या १२ लाखांवर असूनही केवळ २८५ सिट्‌समुळे महिलांबाबत भेदभाव अधोरेखित होत आहे. यातही पुरुष बाहेर कुठेही निर्जन ठिकाणी सुविधा उपलब्ध करून घेत असतानाही त्यांच्यासाठी जास्त सिट्‌स आहेत. महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर प्रसाधनगृहे तयार  करण्यासाठी जागा निश्‍चित करण्यास गेले असता अनेकदा नागरिक आणि नगरसेवकही त्याला विरोध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे घरात महिलांनी सर्व कामे करावी, अशी अपेक्षा बाळगणारे पुरुषच महिलांच्या आरोग्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

रस्त्यावर बाजार, प्रसाधनगृहांची बोंब शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर बाजार भरतो. या बाजारात अनेक महिला भाजी विक्रेत्या दिवसभर राहतात. त्याचप्रमाणे खरेदीसाठी येणाऱ्या महिलाही तास-दोन तास बाजारात असतात. अशा रस्त्यांवरील बाजाराच्या ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृहाची बोंब आहे. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. इतवारी, महाल, बर्डीसारख्या बाजारपेठ असलेल्या ठिकाणी प्रसाधनगृहे आहेत, परंतु ते तोकडे असल्यानेही याठिकाणी असलेल्या दुकानात काम करणाऱ्या तसेच खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना मनस्ताप  सहन करावा लागतो.  

‘रोटरी’चीही अडवणूक  रोटरी इशान्यने महापालिकेला महिलांसाठी प्रसाधनगृहे तयार करण्याचा प्रस्ताव दिला होता. स्थायी समितीने मंजुरीही दिली. रोटरी विविध कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या सीएसआर फंडातून ५० प्रसाधनगृहे तयार करून देणार आहे. शहरातील विविध भागात यातील १५ अत्याधुनिक दुर्गंधीमुक्त प्रसाधनगृहे तयार करण्यात आली. परंतु, नागरिकांच्या विरोधामुळे अद्याप ३५ प्रसाधनगृहे उभारण्याचे काम रखडले आहे. रोटरीने तयार केलेल्या प्रसाधनगृहात दिवे,  वाशबेसिन, फॅन आदी असून पुरुषांसाठीही बाजूला युरीनल लावण्यात आले आहे. 

यासंदर्भात एक याचिका दाखल होती, त्यावेळी महापालिकेने शपथपत्र दाखल करून  प्रसाधनगृहाची पूर्तता करण्याचे म्हटले होते. परंतु, प्रसाधनगृहे दिसत नाही. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांची देखभाल केली जात नाही. अस्वच्छतेमुळे महिला जाण्याचे टाळतात. काही स्वच्छतागृहे केवळ मनपाच्या रेकॉर्डवर आहे, मात्र प्रत्यक्षात नाही. नाल्याच्या बाजूला असलेल्या प्रसाधनगृहात जीवजंतूचीही भीती आहे.  - ॲड. स्मिता सरोदे सिंगलकर. 

महापालिका जिथे जागा उपलब्ध करून देणार, तेथे प्रसाधनगृहे उभारण्याची तयारी आहे. त्यामुळे भविष्यात नक्कीच प्रसाधनगृहाची वाढ करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी मनपाचे अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांचे सहकार्य लाभले. परंतु, अनेक ठिकाणी नागरिक विरोध करतात. शिवाय नगरसेवकांकडूनही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ५० प्रसाधनगृहे लावण्यासाठीही विलंब होत आहे.  - राहुल लद्धड, चेअरमन, लेडीज टॉयलेट प्रोजेक्‍ट, रोटरी इशान्य.

प्रसाधनगृहे तयार करण्यात नागरिक किंवा नगरसेवक विरोध करीत असतील तर नगरसेविकांनीच आपल्या प्रभागात ते उभारण्यास पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. नागरिक, नगरसेवकांनी जागेबाबत तोडगा काढावा. आता तयार करण्यात येत असलेले प्रसाधनगृहे अत्याधुनिक असून दुर्गंधीचा कुठेही लवलेश नाही. त्यामुळे नागरिकांचा दुर्गंधीचा मुद्दाच निकाली निघतो. - वर्षा ठाकरे, महिला, बालकल्याण सभापती, महापालिका. 

शहरात सध्या असलेल्या अनेक प्रसाधनगृहांमध्ये विशेषतः महिलांसाठी असलेल्या प्रसाधनगृहांत जुगाराचे प्रकार चालतात. काही दिवसांपूर्वी शांतीनगर घाटाजवळील स्वच्छतागृहात हा प्रकार पुढे आला होता. याशिवाय स्वच्छतागृहांची स्वच्छतेकडेही प्राधान्याने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नागरिक दुर्गंधीमुळे विरोध करतात. महिला महापौर असून त्यांनी यात लक्ष घालणे अपेक्षित आहे.  - आभा पांडे, नगरसेविका. 

Web Title: marathi news nagpur news municipal toilet women

टॅग्स

संबंधित बातम्या

मधुमेह टाळण्यासाठी यंदा ‘कुटुंबा’वर भर 

पुणे - जीवनशैलीत होत असलेले बदल आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहींची संख्या वाढत आहे. त्याबाबत जागरूकतेसाठी आता कुटुंब या घटकावर लक्ष केंद्रित...

पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...

छोट्यांचे मोठे यश

छोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...

Pune Edition Editorial Article Raj North Indian arrow on Marm
राज यांचा "उत्तर भारतीय' बाणा! (मर्म)

शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...

गरोदरपणात पाचपैकी एका महिलेस मधुमेह

जळगाव - मधुमेह हा आजार मोठ्यांबरोबरच सर्व वयोगटांमध्ये आढळत आहे. फास्टफूडचे अतिसेवन, अपूर्ण झोप, न पेलणारे ताणतणाव या साऱ्यांचा परिणामस्वरूप शरीरातील...

‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त 

पुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी...