Sections

नक्षल संघटनेत रोडावली महिलाची संख्या

सुरेश नगराळे |   शुक्रवार, 6 एप्रिल 2018
गडचिरोली - नक्षल दलममध्ये महत्त्वाच्या पदावर महिला कार्यरत आहेत.

वंदनावर चार लाखांचे बक्षीस 
सिरोंचा उपविभागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले होते. यात  दोन महिलांचाही समावेश होता. त्यापैकी दोन मृत नक्षल्यांची ओळख घटनेच्या दिवशीच पटली होती तर अन्य एका मृत महिला नक्षलीची ओळख बुधवारी (ता.४) पटली. वंदना कौसी  (रा. मांड पाखंजुर) असे तिचे नाव असून ती प्लाटून क्रमांक १४ मध्ये सदस्य होती. तिच्यावर ४ लाख रुपयांचे बक्षीस होते.

गडचिरोली - नक्षल संघटनेत महत्त्वाची कामगिरी पार पाडणाऱ्या महिलांची संख्या रोडावल्याने माओवादी नेत्यांची मोठी पंचायत झाली आहे. त्यातच गडचिरोली पोलिस दलाच्या सी.-६० पथकाने मागील दीड वर्षात तब्बल १७ महिला माओवाद्यांचा खात्मा केल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

गावपातळीवर नक्षल चळवळीचा प्रचार-प्रसारात महिला नक्षलवाद्यांचा मोठा हातभार आहे. विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि महिलांच्या हिताचे प्रश्‍न पुढे करून आदिवासी युवतींना संघटनेत आणण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांच्याद्वारे केली जात होती. एवढेच नाही तर माओवाद्यांच्या नेत्यांच्या सुरक्षेचा भारही त्यांच्यावरच होता. मात्र, गेल्या काही वर्षांत गडचिरोली, छत्तीसगड तसेच तेलंगणा सरकारने नक्षलवाद्यांच्या विरोधात राबविलेल्या कोंबीग ऑपरेशनमुळे  माओवाद्यांची चांगलीच दमछाक सुरू झाली.

नक्षलवाद्यांचा सुरक्षित गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड पहाडाच्या परिसरातही गडचिरोली पोलिसांनी दोनवेळा कारवाई करून नक्षलवाद्यांचे शिबिर उद्‌ध्वस्त केले. यामुळे या भागातील कारवाया थंड झाल्याने माओवाद्यांनी आपला मोर्चा छत्तीसगडमधील घनदाट जंगलाकडे वळविला आहे. मात्र, या साऱ्या समस्येमुळे महिला माओवाद्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शासनाच्या आत्मसमर्पण योजनेकडे त्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.

नक्षलविरोधी अभियान पथकाच्या कारवाईमुळे गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी झालेल्या चकमकीत २८ नक्षलवादी मारल्या गेले. यामध्ये १७ महिलांचा समावेश आहे. या धास्तीने युवतींचे चळवळीबद्दल आकर्षण कमी झाल्याने त्यांनी भरतीकडेही पाठ फिरविल्याचे दिसून येते. नर्मदाअक्का सध्या विभागीय सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, वय वाढल्याने तिला धावपळ करता येत नाही. तर पेरमिली दलम कमांडर विजयाअक्काने आंध्र प्रदेश पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. सध्या पोलिसांना मोस्ट वाँटेड असलेल्या गट्टा नक्षल दलमची उपकमांडर रमकोवर तीन तालुक्‍यांचा भार असल्याने तिची चांगलीच दमछाक होत आहे.

Web Title: gadchiroli vidarbha news naxalite organisation women

टॅग्स

संबंधित बातम्या

#PmcIssues 'स्मार्ट' पुण्याची टॉयलेट्‌स मात्र 'वर्स्ट' ! 

पुणे : तुटलेले दरवाजे, पाण्याचा अभाव, खिडक्‍यांच्या फुटलेल्या काचा, नळच गायब... जागोजागी कचरा..... हे आहे चित्र शहरातील महिलांच्या सार्वजनिक...

amol udgirkar
बायो'पीक' (अमोल उदगीरकर)

दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली....

sundeep waslekar
हवी विवाद-निराकरण यंत्रणा (संदीप वासलेकर)

विवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात...

sandeep kale
हसलेली झेंडूची फुले... (संदीप काळे)

आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला...

लाखोंचा ऐवज चोरणाऱ्या नेपाळच्या चोरट्यांना अटक 

पुणे : एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांसह 35 लाखांचा ऐवज चोरणाऱ्या नेपाळ येथील चोरट्यांना गुन्हे शाखेच्या...

pravin tokekar
रथचक्र उद्धरू दे... (प्रवीण टोकेकर)

"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "...