Sections

अमरावती परिवहन महामंडळातील बसेसना 250 टायर्सची आवश्यकता

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 मार्च 2018
Amravati Transport Corporation Buses Needs 250 Tyers

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागात तब्बल अडीचशे टायरचा तुटवडा असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास केला जात आहे. टायरशिवाय आगारात उभ्या असलेल्या बस टायरशिवाय चालणार कशी ? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

अकोला : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागात तब्बल अडीचशे टायरचा तुटवडा असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास केला जात आहे. टायरशिवाय आगारात उभ्या असलेल्या बस टायरशिवाय चालणार कशी ? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

महामंडळाच्या लालपरीला पर्याय म्हणून दिवसेंदिवस शिवशाही बसेसचा ताफा दाखल होत असताना दुसरीकडे टायरच्या तुटवड्यामुळे जुन्या, रिमोल्ड व चोपडे झालेले टायर रस्त्यावरुन धावत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला. टायरचा तुटवडा ही गंभीर बाब असताना या समस्येकडे दुर्लक्ष करुन शिवशाहीला महत्व दिले जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

प्रवाशांच्या जीविताला धोका असलेल्या चोपड्या झालेल्या टायरकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शंभर टायरचा पुरवठा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर अजून अडीचशे टायरची आवश्यकता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बहुतांश बस जुनाट टायरवरच प्रवास करत आहेत. वारंवार तक्रारी, निवेदने देऊनही महामंडळाच्या कारभारात फरक पडत नसल्याने प्रवाशांचे म्हणणे आहे.

Web Title: Amravati Transport Corporation Buses Needs 250 Tyers

टॅग्स

संबंधित बातम्या

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

2ajit_pawar_26.jpg
मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा : अजित पवार 

औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची...

Raj Thackeray greets Manmohan Singh on his birthday
माझ्या सकट, भारतीयांना तुमच्या ज्ञानाची उणीव भासते- राज ठाकरे

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांना आपल्या खास शैलीत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. राज...

wani
धार्मिक स्थळी स्वच्छतेचे महात्म्यही पसरावे : ईशादिन शेळकंदे

वणी (नाशिक) : वणी हे धार्मिक व पर्यटन दृष्ट्या महत्वाचे ठिकाण असून येथील धार्मिक स्थळाच्या महात्म्याबरोबरच स्वच्छतेचे महात्म्यही सर्वत्र...

छत्तीसगडमध्ये रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण होणार : अर्थमंत्री

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील कथगोरापासून दोंगरग्रहपर्यंत रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. छत्तीसगड सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये करार होणार असून...