Sections

पाणीपुरवठा योजनेतून पाच वर्षांत पाचच महीने पाणी

दीपक कच्छवा |   गुरुवार, 12 एप्रिल 2018
water

राजमाने गावातील हातपंप दुरूस्ती संदर्भात आम्ही प्रशासनाकडे फी देखील भरली आहे.येथील बंद असलेले हातपंप चालु करण्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.  
- कविताबाई पाटील , सरपंच कळमडु (ता.चाळीसगाव)

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : राजमाने (ता.चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  गंभीर बनला आहे.गेल्या पाच वर्षांत पाणीपुरवठा योजनेचे पाच महीनेच पाणी मिळाले आहे.  गावातील हातपंप बंद असून 'ते' 'शोपीस' ठरले आहेत.पाणी प्रश्न न सुटल्यास महिलांसह सर्व ग्रामस्थांनी उपोषणाला बसण्याचा  इशारा दिला आहे.

कळमडु ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या राजमाने गावातील महीलांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागतआहे. या गावातील ग्रामस्थांच्या नशिबी असलेली पाण्याची भटकंती कधी थांबेल ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

2013 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर राजमाने येथीव  ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.त्यावेळी त्यांचा तात्पुरता पाणीप्रश्न सोडवण्याचा  काही राजकीय पदाधिकारी यांनी केविलवाणा प्रयत्न केला होता. असा आरोप  ग्रामस्थांनी केला आहे.त्यावेळी पंधराच दिवसात पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आजही पुन्हा तशीच वेळ राजमाने येथील ग्रामस्थावर आली आहे.सध्या येथील गावाची सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ही जिल्हा परिषदेच्या उपविभाग पाचोरा यांच्याकडुन 1 आॅक्टोबंर 2017 ला कळमडु ग्रामपंचायतीच्या ताब्यात मिळाली आहे.आता त्यांना या योजनेचे वीजवितरण कंपनीकडून नविन कनेक्शन घ्यायचे असुन त्यांच्या नावाची बिलाची रक्कम जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने वीजवितरण कंपनीला भरलेली  नाही. त्यामुळे त्यांना नविन विजेचे  कनेक्श मिळण्यास  आडचणी येत आहेत.जिल्हा  परिषद जोपर्यंत पैसे भरत नाही तो पर्यंत कळमडुकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

हातपंप ठरले 'शो' पीस राजमाने गावातील पाणीटंचाई काळात उपयोगी पडणारे चार  हातपंप तेरा महीन्यापासुन नादुरुस्त असल्याने बंद पडले आहेत.उन्हाळ्या पुर्वीच्या हातपंपाची दुरूस्ती करणे गरजेचे होते.मात्र आज या गावातील पाणीटंचाई काळात जर एखादा हातपंप चालु राहीला असता तर महीलांना गावातच पाणी मिळाले असते. हातपंपासाठी जमिनीत टाकण्यात येणाऱ्या पाईपची मर्यादा दोनशे फुटापर्यंत असते.तरी या चारही हातपंप लवकरात लवकर दुरूस्त करावे आशी मागणी महीलांमधुन होत आहे.

बातमीनंतर सोशल मीडियावर चर्चा! 'सकाळ'च्या बातमीनंतर आज सोशल मीडियावर पाणी प्रश्न चांगलाच पेटला. सकाळने प्रकाशित केलेली बातमी ट्विटरसह, व्हाट्सऍपवर चांगलीच व्हायरल झाली. ट्विटरवर राजमानेतील पाणी टंचाईवर प्रशासनाप्रति संताप व्यक्त केला गेला. शिवाय तातडीने पाणी प्रश्न न सुटल्यास उपोषणाचा देखील इशारा देण्यात आला.

राजमाने गावातील हातपंप दुरूस्ती संदर्भात आम्ही प्रशासनाकडे फी देखील भरली आहे.येथील बंद असलेले हातपंप चालु करण्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.  - कविताबाई पाटील , सरपंच कळमडु (ता.चाळीसगाव)

Web Title: water supply in chalisgaon

टॅग्स

संबंधित बातम्या

कोण आहे ही प्राची कुलकर्णी? 

सातारा - खरं तर त्यांचं सोशल मीडियावरील आयुष्मान इनमिन दोन-अडीच महिन्यांचं, पण त्यांनी साताऱ्याच्या कला प्रांतात अल्पावधीत तहलका माजवला. वैयक्तिक...

पारंपरिक वेशभूषेत महिलांचा सहभाग

पुणे -  ‘बाप्पा मोरया... मोरया’ असा जयघोष करत, ढोल वाजवत, पारंपरिक वेशभूषेत फुगड्या खेळत तरुणी, महिला मोठ्या संख्येने ‘बाप्पा’ला निरोप...

File photo
हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड

हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड नागपूर : हॉटेल गंगाकाशीमधील हायप्रोफाइल सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी...

पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

पुणे - महापालिकेच्या विविध जलकेंद्र, पंपिंग स्टेशनच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (ता. २७) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार...

ढोलांचा दणदणाट अन्‌ हलगीचा कडकडाट! 

सातारा - एक ठेका पडला अन्‌ ढोल-ताशाच्या वादनाचा जल्लोष सुरू झाला... विसर्जन मिरवणुकी जशी पुढे सरकत होती, तसा हा नाद बहरत गेला... ढोल-ताशांच्या...