Sections

कृष्णापुरीत पाणी सोडल्यावरून तालुक्यात श्रेयवाद

शिवनंदन बाविस्कर |   बुधवार, 11 एप्रिल 2018
krushnapuri dam

तहसील कार्यालयात केलेल्या उपोषणास कुठल्याही राजकीय पक्षाचा सहभाग नव्हता. ते सर्व शेतकरी मिळून होते. आमच्या या लढाईत 'सकाळ'ने आमची साथ दिली त्यामुळे हे यश आमच्याबरोबर 'सकाळ'चेही आहे.
- रुपसिंग जाधव, शेतकरी, कृष्णापुरी.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : कृष्णापुरी (ता. चाळीसगाव) धरणात ठणठणाट असल्याने त्यात गिरणातून पाणी सोडण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती. त्याला पाठबळ म्हणून 'सकाळ'ने वारंवार बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. अशा संयुक्तिक प्रयत्नांना यश लाभत गिरणातून कृष्णापुरीत पाणी सोडले गेले. परंतु तालुक्यात सध्या वेगळ्याच श्रेयवादाची पोळी भाजली जात आहे.

गतवर्षी समाधानकारक पर्जन्यमान नसल्याने कृष्णापुरी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. होता तेवढा 18 टक्के पाणीसाठा तोही पाणी चोरांनी चोरून नेला. यामुळे धरणात ठणठणाट होता. स्थानिक रहिवासी आणि गुराढोरांचे पाण्यावाचून हाल होत होते.  शासन दरबारी शेतकऱ्यांनी गिरणातून पाणी सोडावे या मागणीसाठी तगादा लावून धरला होता. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तरी, शेतकऱ्यांच्या पदरी काहीच फलित नव्हते. 

शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा 'सकाळ'कडे मांडल्या. त्यावरून सकाळने शेतकऱ्यांच्या वेदना आणि तिथल्या पाणी टंचाईची धग अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना करून दिली. त्यानंतर कृष्णापुरीच्या पाणीटंचाईचा विषय चर्चेत आला. त्यावेळी काहींनी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्नही केला. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर पाण्यासाठी उपोषण केले. या उपोषणात कृष्णापुरीचे शेतकरीच होते. त्यात कुठल्याही राजकीय पक्षाचा सहभाग अथवा नेतृत्व नव्हते. त्यामुळे उपोषणाला कुठलाच राजकीय 'टच' असल्याचा संबंध नाही.

तालुक्याचे लोकप्रतिनिधी व जबाबदारी म्हणून आमदार उन्मेष पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करत आपल्या पातळीवर पाठपुरावा केला. मात्र, हे खरे यश कृष्णापुरीच्या शेतकऱ्यांचे तसेच शासन दरबारी बातम्यांच्या माध्यमातून विषय लावून धरणारे 'सकाळ'चे आणि आमदारांच्या पाठपुराव्याचे आहे. 

कृष्णापुरी धरणात पाणी सोडल्याने तेथील पाणी प्रश्न काही प्रमाणात मिटला असला, तरी राजकीय श्रेयवादाचा प्रश्न नव्याने पेटला आहे. तालुक्यातील काही तथाकथित पुढारी हे आपल्यामुळेच कृष्णापुरीत पाणी सोडल्याचे श्रेय घेत आहेत. तेथील रहिवासी हे भोळेभाबळे नसून कुणामुळे धरणात पाणी सुटले; हे त्यांना चांगलेच माहिती आहे. दरम्यान याला राजकीय असे काहीच महत्व नसल्याने कुठल्या गोष्टीचे श्रेय आपण घ्यावे, हा देखील विचार करण्यासारखा विषय आहे. 

तहसील कार्यालयात केलेल्या उपोषणास कुठल्याही राजकीय पक्षाचा सहभाग नव्हता. ते सर्व शेतकरी मिळून होते. आमच्या या लढाईत 'सकाळ'ने आमची साथ दिली त्यामुळे हे यश आमच्याबरोबर 'सकाळ'चेही आहे.- रुपसिंग जाधव, शेतकरी, कृष्णापुरी.

Web Title: water in Krushnapuri dam chalisgaon

टॅग्स

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...

टंचाई आराखड्यातील कामे सुरू करा

पुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...

अंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे

मुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ...

parner.jpg
पारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे

पारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...

करमाळ्याच्या राजकारणाची दिशा बदलते आहे

करमाळा : सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्याचे राजकारण नेहमीच वेगवेगळ्या विषयाने चर्चेत राहिले आहे. गेल्या महिन्यात बाजार समिती सभापती निवडीवेळी...

रहीपुरीत अडीच एकर ऊस जळून खाक

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : रहीपुरी (ता.चाळीसगाव) येथुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चार एकर ऊसाच्या बेणे प्लॉटला आज सकाळी दहाच्या सुमारास शॉर्टसर्किट...