Sections

थर्माकोलचे खान्देशातील पहिले घर सोनगीरला

एल. बी. चौधरी |   रविवार, 15 एप्रिल 2018
thermocol

विदेशी तंत्रज्ञानावर आधारित थर्माकोलचा उपयोग करून घर बांधण्याची पध्दत राज्यात आली आहे. हवी तेवढी इमारत उभी करता येते. सध्या थर्माकोलचा भिंती परदेशातून आयात केल्या जातात. पण लवकरच भारतात त्या तयार मिळतील. तेव्हा गरीबांना त्यांच्या स्वप्नातील स्वस्त घरे मिळतील. 
- अपेक्षा पाटीदार, प्लॅनर अॅण्ड डिझायनर, विजयशील बिल्डर्स, ऐरोली मुंबई 

सोनगीर (जि. धुळे) : थर्माकोलचा उपयोग करून खान्देशातील पहिले घर येथे बांधण्यात येत असून, वाळू, वीट, पाणी व सिमेंटचा कमीतकमी वापरामुळे ते घर पर्यावरण पूरक तर आहेच पण कमी कालावधीत उभे राहत असल्याने खर्च ही कमी होत आहे. मजबूती अथवा वजन सहन करण्याची ताकद सिमेंटच्या अन्य पध्दतीने बांधलेल्या पक्क्या घरापेक्षा तिप्पट जास्त असते.

परदेशात अथवा भूकंप प्रवण देशात अशा प्रकारची घरे बांधण्यास प्राधान्य दिले जाते. भारतातही यापध्दतीच्या घरांनी प्रवेश मिळवला आहे. सोनगीरच्या भाचीने राज्यात हा प्रयत्न केला आहे. येथील हॉटेल सुरभीचे मालक लक्ष्मीकांत श्रीरंग पाटील यांनी त्यांच्या ढाब्याशेजारी प्रवाशांना मुक्कामासाठी स्वस्त दरात धर्मशाळा उपलब्ध करून दिले आहे. या धर्मशाळेच्या विस्तारीत बांधकाम त्यांनी मुंबईच्या विजयशील कंपनीला दिला आहे. ही कंपनी त्यांची भाची अपेक्षा पाटीवर व जावई प्रणव पाटीदार यांनी स्थापन केली आहे. भाचा कुशल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाते. 

घर बांधण्याची पध्दत आपल्याला कशी इमारत हवी आहे, त्यात कोणत्या सोयी सुविधा हव्यात याचा आराखडा आधी तयार केला जातो. त्यानुसार हव्या त्या आकारातील आधीच तयार थर्माकोलच्या भिंती मागवल्या जातात. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अवघे दोन मजूर भिंती उभ्या करु शकतात. मजूरांना पुर्वानुभवाची गरज नाही. या भिंती म्हणजे तारांच्या जाळीत फीट केलेले थर्माकोल असते. भिंत उभी राहिल्यानंतर त्यावर दोन्ही बाजूंनी सिमेंटचे प्लास्टर केले जाते. त्यामुळे भिंत अभेद्य व पक्की बनते. अन्य पध्दतीत भिंत बांधताना वीटांचा जो उपयोग होतो याठिकाणी तेच कार्य थर्माकोल करते. त्यामुळे भिंतींचे वजन अत्यंत कमी होते. स्लॅब देखील तारांच्या जाळीतील थर्माकोलचा तयार मिळतो. वरुन व आतून सिमेंटचा थर लावला जातो. थर्माकोल मुळे घराला हवे तसे व प्रवेश द्वारावर गोल, त्रिकोण, चौकोन, षटकोणी आकार देता येतो.

उपयोग सर्वात महत्त्वाचे उपयोग म्हणजे भूकंप झाल्यास घर पडत नाही. भिंती वक्र होतील पण पडणार नाहीत. व त्या हलक्या असल्याने जखमी होण्याचा धोका नाही. घर तापमान नियंत्रक असते. पाणी गाळण्याचा धोका नाही. आग उपद्रव नाही. घुशींचा त्रास नाही. साउंड प्रुफ आहे. अल्पावधीत बांधकाम होते. तारांच्या जाळीमुळे घरफोडी करणे निव्वळ अशक्य आहे. राज्यात अशा पध्दतीने घर बनविण्याकडे कल वाढला आहे. 

विदेशी तंत्रज्ञानावर आधारित थर्माकोलचा उपयोग करून घर बांधण्याची पध्दत राज्यात आली आहे. हवी तेवढी इमारत उभी करता येते. सध्या थर्माकोलचा भिंती परदेशातून आयात केल्या जातात. पण लवकरच भारतात त्या तयार मिळतील. तेव्हा गरीबांना त्यांच्या स्वप्नातील स्वस्त घरे मिळतील. - अपेक्षा पाटीदार, प्लॅनर अॅण्ड डिझायनर, विजयशील बिल्डर्स, ऐरोली मुंबई 

Web Title: thermocol home in songir

टॅग्स

संबंधित बातम्या

Amit Shah
अमित शहांना स्वाइन फ्लू; 'एम्स'मध्ये उपचार सुरू 

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे त्यांना येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आज दाखल...

भाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख

नवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...

23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'

नवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...

vijay yadav
‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’

लखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...

pali
उन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव

पाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...

शिवनेरीवरील प्रस्तावित संग्रहालयासाठीची अंबरखाना इमारत.
शिवनेरीवर सातवाहनकालीन वस्तू संग्रहालय

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय साकारणार आहे. जुन्नरची सह्याद्री...