Sections

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविला आनंद...

प्रा. भगवान जगदाळे |   शनिवार, 7 एप्रिल 2018
jaitane

"कै. रामरावदादा पाटील हे माझे राजकीय गुरू होते. दादांसोबत राजकारणात असताना हितशत्रूंनी मलाही दादांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उलट दुप्पट जोमाने आपण दादांची पाठराखण केली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज हा छोटासा अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला."
 - ऍड.शरदचंद्र जगन्नाथ शाह, अध्यक्ष, आदर्श कला महाविद्यालय, निजामपूर-जैताणे ता. साक्री

निजामपूर-जैताणे (धुळे) : ज्येष्ठ नेते कै. रामरावदादा पाटील यांच्या स्मृतिनिमित्त आज (ता.४) सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे कट्टर समर्थक, पांझरा-कान सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व आदर्श कला महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र शाह यांच्यातर्फे आदर्श प्राथमिक विद्या मंदिर व आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलच्या सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. यावेळी शेकडो चिमुरड्यांनी या अन्नदानाचा मनापासून लाभ घेतला.

माळमाथा परिसरातील ह्या 'आदर्श' शाळेत हा विधायक उपक्रम राबविल्याबद्दल कै. रामरावदादा पाटील यांचे सुपुत्र, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपचे प्रांतिक सदस्य व विद्याविकास मंडळाचे सभापती सुरेश पाटील यांनी ऍड. शाह यांच्याप्रति ऋण व्यक्त केले. या उपक्रमासाठी दोन्ही विद्यालयांचे मुख्याध्यापकद्वय व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

निजामपूर (ता.साक्री) : येथील आदर्श प्राथमिक विद्या मंदिर व आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित संस्थाचालक ऍड. शरदचंद्र जगन्नाथ शाह आदी..

"कै. रामरावदादा पाटील हे माझे राजकीय गुरू होते. दादांसोबत राजकारणात असताना हितशत्रूंनी मलाही दादांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उलट दुप्पट जोमाने आपण दादांची पाठराखण केली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज हा छोटासा अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला."  - ऍड.शरदचंद्र जगन्नाथ शाह, अध्यक्ष, आदर्श कला महाविद्यालय, निजामपूर-जैताणे ता. साक्री

Web Title: social work in jaitane

टॅग्स

संबंधित बातम्या

Sharad Pawar
उदयनराजे, आठ दिवस थांबा... : शरद पवार

पुणे : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीअंतर्गत भडकलेल्या राजकारणाचा केंद्रबिंदू सोमवारी पुणे जिल्हा ठरला. सकाळी उदयनराजे विरोधकांनी बारामतीत पवारांची...

मिरवणूक मार्गावर फ्लेक्‍सबाजी

पुणे - विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’च्या वापराबाबत ठाम राहिलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करण्याचा सल्ला देणाऱ्या...

पोलिसांना ‘घरचा डबा’

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस...

दोन टन निर्माल्याचे झाले संकलन 

सातारा - "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातर्फे अनंत चतुर्दशीला येथील संगम माहुली (ता....

dr ashok modak
शेजारधर्म अन्‌ धर्मसंकट

चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील कळीचा मुद्दा आहे. त्यातच इन्डो-पॅसिफिक...