Sections

वधु-वरांना विवाहात पालिकेकडून कचराकुंडीचा आहेर

सुधाकर पाटील  |   शनिवार, 12 मे 2018

शहरात स्वच्छता मोहीमेने चांगलाच जोर धरला आहे. शहरात दररोज दहा टन कचरा संकलीत व्हायला लागला आहे.  पालिका स्वच्छतेच्या बाबतीत वेगवेगळ्या माध्यमाने जनजागृती करत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन भडगाव पालिकेच्या वतीने  लग्नात नव वधु वराना कचराकुंडी आहेर दिला . 8 मे रोजी शहरात असलेल्या लग्न समारंभात नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी स्वतः जाऊन नविन जोडप्याला या कचराकुंड्या भेट दिल्या.

भडगाव : पालिकेच्या वतीने लग्नात वधु-वरांना कचराकुंड्याचा आगळावेगळा आहेर भेट देऊन नव दापंत्याला स्वच्छता ठेवण्याची सवय व्हावी हा त्यामागील पालिका प्रशासनाचा हेतू आहे. मात्र पालिकेचा हा कचराकुंड्याचा आहेर शहरात चर्चेचा ठरला आहे.

शहरात स्वच्छता मोहीमेने चांगलाच जोर धरला आहे. शहरात दररोज दहा टन कचरा संकलीत व्हायला लागला आहे.  पालिका स्वच्छतेच्या बाबतीत वेगवेगळ्या माध्यमाने जनजागृती करत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन भडगाव पालिकेच्या वतीने  लग्नात नव वधु वराना कचराकुंडी आहेर दिला . 8 मे रोजी शहरात असलेल्या लग्न समारंभात नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी स्वतः जाऊन नविन जोडप्याला या कचराकुंड्या भेट दिल्या.

मुस्लिम समाजाच्या नववधु-वराला ला मुख्याधिकारी राहुल पाटील आदींनी घरी जाऊन कुंड्या दिल्यात. याशिवाय पालिकेचे कर्मचारी सुभाष अहिरे यांच्या दोन कन्याच्या लग्नातही या कुंड्या दोघे विवाहित जोडप्याला भेट देण्यात आल्या.  तर दुपारी लक्ष्मण भाऊ मंगलकार्यालय पत्रकार संजय पवार यांची कन्या गायत्री व निलेश खोडें यांच्या विवाह सोहळ्यात भेट देऊन नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, मुख्याधिकारी राहुल पाटील , नगरसेवक अमोल नाना पाटील , योजना पाटील, यांनी पालिकेच्या वतीने ओला व सुखा कचरा कुंडी भेट दिल्या . यावेळी श्री साई समर्थ संस्थेचे चेअरमन भय्यासाहेब पाटील, लाडकूबाई शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे , प्रदीप महाजन, संजय शिंदे, संजय पवार आदी उपस्थित होते. पालिकेच्या वतीने दिलेली ही भेट शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. 

नवदापंत्याला स्वच्छतेचे महत्व पटावे, त्यांना स्वच्छतेची सवय लागावी त्यामुळे पालिकेच्या वतीने ओला व सुका कचरा टाचण्यासाठी प्रत्येकी दोन कचरा कुंड्या भेट दिल्या आहेत. त्यांचा त्यांनी उपयोग करावा. - राजेंद्र पाटील नगरध्यक्ष - राहूल पाटील मुख्याधिकारी

Web Title: social message in bhadgaon

टॅग्स

संबंधित बातम्या

तळेगावातील आरपीएफची चौकी बंद 

तळेगाव स्टेशन - लोहमार्गावरील सुरक्षेच्यादृष्टीने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवरील आरपीएफची चौकी दोन महिन्यांपासून अधिक काळ बंद आहे. त्यामुळे...

बांधकाम नियमितीकरणाला मुदतवाढ 

पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाकडून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणासाठी १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे...

ओडिशाच्या किनाऱ्याला 'दाये' वादळाची धडक 

भुवनेश्‍वर : ओडिशाच्या किनाऱ्याला आज "दाये' या चक्रीवादळाने धडक दिली. या वादळामुळे किनारी भागात मुसळधार पाऊस पडत असून, मलकानगिरी या जिल्ह्याचा...

चंद्रपूर जिल्ह्यात पोलिस मित्रांच्या हाती शिटी

गोंडपिपरी : समाजातील शांतता व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलिसदादा रात्रदिवस कार्यरत असतात. पण सणसमारंभाच्या काळात परिस्थिती सांभाळताना...

Baramatis total development is the main objective for NCP says Ajit Pawar
बारामतीचा सर्वांगिण विकास हेच उद्दिष्ठ : अजित पवार

बारामती शहर - समाजातील सर्वच घटकांना सोबत घेत बारामतीचा सर्वांगिण विकास साध्य करण्याचे उद्दीष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नजरेसमोर ठेवले असून या...