Sections

गावांना टँकर सुरु करण्याचे अधिकार तहसीलदारांकडे द्यावेत

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 28 मार्च 2018
deepika-chavhan

सटाणा - टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना असलेले अधिकार तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात यावे, या मागणीसाठी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची काल मंगळवार (ता.२७) रोजी मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले.

सटाणा - टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना असलेले अधिकार तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात यावे, या मागणीसाठी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची काल मंगळवार (ता.२७) रोजी मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले.

आज विधानभवनात आमदार सौ.चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडवणीस यांची भेट घेऊन या गंभीर प्रश्नावर चर्चा केली. यावेळी दिलेल्या निवेदनात, महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सध्या पाणी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या वर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे एप्रिल व मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. 

बागलाण विधानसभा मतदारसंघात या वर्षी जानेवारी महिन्यातच पाण्याची भयावह परिस्थिती तयार झाली असून, फेब्रुवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु झाले आहेत. अनेक गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा सुरु करावा अशी मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. टँकर सुरु करण्याबाबतचे सर्व अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रत्यक्ष टँकर सुरु होण्यास बराच कालावधी लागतो. पंचायत समिती, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचेकडून टँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जातात. यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे जनतेमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी वाढते. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर सुरु करण्याचे अधिकार तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात यावे अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. 

या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही आमदार सौ.चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Web Title: satana north maharashtra water crisis water tanker

टॅग्स

संबंधित बातम्या

yeola
आम्हांला बी दुष्काळाच्या यादीत येऊ द्या कि रं..

येवला - यादीतून वगळलेला तालुका अखेर दुष्काळी यादीत समाविष्ट झाला मात्र साताळीसह १७ गावांचा समावेश न केल्याने या गावातून आता संतापाची भावना उमटू लागली...

Harsul-Jail
कैदी महिलांचे हात, बनवू लागले लॉक!

औरंगाबाद - हर्सूल कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या पंधरा महिलांनी महिन्याकाठी तब्बल दोन लाख दुचाकी लॉक असेंब्ली तयार करण्याची किमया साधली आहे. अवघ्या ५००...

water tanker
राज्यात टँकरची हजाराकडे वाटचाल 

सोलापूर : सद्यस्थितीत राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये एकूण 692 पाणी टॅंकर सुरु झाले आहेत. त्यामध्ये 567 गावे आणि एक हजार 117 वाड्यांवर टॅंकरद्वारे पाणी...

kancha ilaiah
देशाला 'या' लोकांपासून वाचवा : डॉ. कांचा इलैया

लातूर : "शूद्र, दलितांबरोबरच सर्व जातीतील लोकांनी आम्हा ब्राह्मणांच्या पायाजवळ येऊन बसावे, आम्ही सांगू तेच त्यांनी शिकावे, असे हिंदू राष्ट्र भारतीय...

leopard
नॅशनल पार्कातील बिबट्यांवर विषप्रयोग नाही

मुंबई : बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपुर्वी बिबट्यांवर झालेल्या विषप्रयोगाने नवे वळण घेतले आहे.मृत्यू झालेल्या दोन बिबट्यांचा...

mangalwedha
हमीभाव मका खरेदी नाव नोंदणी सुरु

मंगळवेढा - तालुका खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्यावतीने हमीभाव मका खरेदी नाव नोंदणी आज दि १४ नोव्हेंबर पासून ऑनलाइन...