Sections

सटाणा पालिकेच्या विंधन विहिरीचे काम तात्काळ पूर्ण करा; पाणीपुरवठा सभापतींचा आदेश

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 9 एप्रिल 2018
Satana Corporations Wells Work Should Complete immediately Says Rahul Patil

शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यातून सर्व नगरसेवकांसह या विंधन विहिरीची पाहणी केली.

सटाणा - सटाणा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक वचनबद्ध असून नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. शहरवासियांना पाणीटंचाईची झळ बसू नये यासाठी ठेंगोडा (ता. बागलाण) येथील गिरणा नदीपात्रालगत पालिकेतर्फे नव्याने विंधन विहीर बांधण्याचे काम सुरु आहे. या विंधन विहिरीचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले आहेत, अशी माहिती पालिकेचे पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील यांनी दिली.  

पालिकेतर्फे गिरणा नदीपात्रालगत नव्याने बांधण्यात येणाऱ्या विंधन विहीरीची पाहणी करण्यासाठी पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील व नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी ठेंगोडा येथे भेट दिली. शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यातून सर्व नगरसेवकांसह या विंधन विहिरीची पाहणी केली. टंचाईकाळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने काम करून जवळपास 75 टक्के काम पूर्ण झालेल्या विंधनविहिरीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेशही श्री.पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी नगराध्यक्ष मोरे, उपनगराध्यक्षा सुवर्णा नंदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते काकाजी सोनवणे, काँग्रेसचे गटनेते दिनकर सोनवणे, नगरसेविका सोनाली बैताडे, संगीता देवरे, पुष्पा सूर्यवंशी, सुनिता मोरकर, निर्मला भदाणे, शमा मन्सुरी, भारती सूर्यवंशी, शमीम मुल्ला, नगरसेवक दीपक पाकळे, मनोहर देवरे, बाळू बागुल, महेश देवरे, दत्तू बैताडे, नाना मोरकर, दीपक नंदाळे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्रीकांत फागणेकर, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.

'सध्या कडक उन्हाळा असून मार्च महिन्यातच सर्व विहिरींनी तळ गाठल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वाना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून सटाणा नगरपरिषद देखील याला अपवाद नाही. मात्र जिल्ह्यातील इतर पालिकांच्या तुलनेत सटाणा पालिकेच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक चांगले आहे. सटाणा शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असून शहरवासियांनी टंचाईकाळात पाणी जपून वापरावे आणि पालिकेस सहकार्य करावे,' असे मत पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल पाटील यांनी मांडले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Satana Corporations Wells Work Should Complete immediately Says Rahul Patil

टॅग्स

संबंधित बातम्या

धुलाईअभावी शस्त्रक्रिया रखडल्या

मुंबई - सेंट्रल लाँड्रीमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्याने पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी वापरले जाणारे कपडे वेळेत धुतले जात नाहीत. त्यामुळे सायन...

विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात 24 जण बुडाले 

मुंबई  - गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असतानाच काही दुर्घटनांमुळे उत्साहावर विरजण पडले. मिरवणुकीदरम्यान रविवारी राज्यभरात किमान 24 जणांचा...

पोलिसांना ‘घरचा डबा’

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस...

पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

पुणे - महापालिकेच्या विविध जलकेंद्र, पंपिंग स्टेशनच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (ता. २७) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार...

नंदा जिचकार
मुलासह विदेशवारीवरून महापौरांविरोधात फलक

मुलासह विदेशवारीवरून महापौरांविरोधात फलक नागपूर : पदाचा गैरवापर करीत महापौरांनी मुलालाही विदेशात सैरसपाटा केला. यासाठी खोटी कागदपत्रे सादर केली असून...