Sections

इगतपुरीत रिसॉर्ट डान्सपार्टीवर छापा 

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 19 मार्च 2018
raid on resort dance party in igatpuri

मुंबईतून डान्ससाठी आणण्यात आलेल्या 6 मुलींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्वयंघोषित पत्रकार डॉ. राहुल जैन-बागमार याने कारवाई टाळण्यासाठी पोलिसांवर सर्वतोपरी दबाव आणण्याचा प्रयत्न करीत गोंधळ घातल्याची चर्चा आहे. 

नाशिक - इगतपुरी तालुक्‍यातील तळेगाव शिवारात मिस्टीक व्हॅली या रिसॉर्टवर सुरू असलेल्या डान्सपार्टीवर पोलिसांनी छापा टाकून नाशिकच्या स्वयंघोषित पत्रकार संघटनेच्या अध्यक्षासह दहा जणांना अटक केली आहे. तर, मुंबईतून डान्ससाठी आणण्यात आलेल्या 6 मुलींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्वयंघोषित पत्रकार डॉ. राहुल जैन-बागमार याने कारवाई टाळण्यासाठी पोलिसांवर सर्वतोपरी दबाव आणण्याचा प्रयत्न करीत गोंधळ घातल्याची चर्चा आहे.    तळेगाव शिवारात हॉटेल मिस्टिक व्हॅली असून येथील 9 क्रमांकाच्या बंगल्यामध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास डान्सपार्टी सुरू होती. अतिशय कर्णकर्कश साऊंड सिस्टिमच्या आवाजाने सदरच्या ठिकाणी डान्सपार्टी सुरू होती. इगतपुरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असता, पायात घुंगरू व तोडके कपडे घालून सहा मुली डान्स करीत होते. तर 10 संशयित हे मद्याच्या नशेमध्ये नाचत होते. पोलिसांनी यावेळी संशयित व स्वयंघोषित पत्रकार संघटनेचा अध्यक्ष डॉ. राहुल जैन-बागमार (33, रा. बागमार भवन, रविवार पेठ, नाशिक), अनिल लक्ष्मण बर्गे (42, रा. घर नं. 22, देशपांडे वाडा, जुने नाशिक), लक्ष्मण राजेंद्र पवार (31, रा. फुलेनगर, पेठरोड, पंचवटी), प्रकाश पांडुरंग गवळी (33, रा. चतुर संप्रदाय आखाडा, आडगाव), अर्जून दत्तात्रय कवडे (23, रा. शिवकल्प रेसीडेन्सी, शांतीनगर, मखमलाबाद, पंचवटी), बासु मोहन नाईक (44, रा. भद्रकाली पोलीस ठाण्यामागे, खडकाळी), आकाश राजेंद्र गायकवाड (19, रा. स्वराजनगर, अंजना लॉन्सजवळ, पाथर्डीफाटा), हर्षद विजयकुमार गोठी (27, रा. 403, आर्या प्लाझा, वासननगर, पाथर्डीफाटा), चेतन दत्तात्रय कवरे (30, रा. रुम नं.5, शिवकल्प रेसीडेन्सी, एलआयसी कॉलनी, मखमलाबाद रोड, पंचवटी), काशि आनंतलाल पंडित (35, रा. कृष्ण हॉटेल, शिंगाडा तलाव, नाशिक) यांना अटक केली आहे. तर यावेळी नृत्य करणाऱ्या मुंबईतील 6 मुलींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्वयंघोषित पत्रकाराचा धिंगाणा - हॉटेल परिसरातील बंगल्याच्या बाहेर सुरू असलेल्या डान्सपार्टीवर पोलिसांनी छापा टाकला असता, स्वयंघोषित पत्रकार डॉ. बागमार याने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगून दबाव आणून पोलिसांशी अरेरावी करीत धिंगाणा घातला. दरम्यान, संशयित बागमार हा शहरातील बड्या कुटूंबियांतील आहे.

Web Title: raid on resort dance party in igatpuri

टॅग्स

संबंधित बातम्या

nanded
नांदेड : गणपूर गावात दरोडेखोरांचा हैदोस

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात रात्री दरोडेखोरांनी एक घर लुटले आहे. या दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून 1 लाख 71 ...

Cotton
कापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी

जळगाव - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रोत्साहनाने खानदेश, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात जिनिंगची संख्या वाढली, परंतु जिनिंगकडे हवा...

ullasnagar.
उल्हासनगरमध्ये वाढीव वीज बिलाच्या विरोधात साईपक्ष रस्त्यावर

उल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे....

deshmukh
माढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून...

गेवराई - शहराजवळ दुचाकीला धडक दिल्यानंतर गॅरेजमध्ये घुसलेले ट्रॅक्‍टर.
वाळू तस्करीमुळे विद्यार्थिनीचा बळी

गेवराई - अवैध वाळू उपसा बंद असल्याची टिमकी महसूल विभाग वाजवित असले तरी विद्यार्थिनीचा बळी गेल्याने पुन्हा एकदा तालुक्‍यातील वाळू तस्करी चव्हाट्यावर...

औरंगाबाद - एमजीएममध्ये येमेनच्या अमल रागेह या युवतीशी संवाद साधताना डॉ. गिरीश गाडेकर, डॉ. गजानन काथार.
येमेनच्या युवतीचे खुबा प्रत्यारोपण यशस्वी

औरंगाबाद - येनेममध्ये अठरा वर्षांपूर्वी स्टेजवरून पडलेल्या मुलीच्या खुब्यावर उपचार होऊ शकले नाही म्हणून खुब्याचे एकसंध हाडात रूपांतर झाले. त्यामुळे...