Sections

शेतकर्‍यांना रोख पैसे द्या; अन्यथा शेतमालाचा लिलाव होणार नाही!

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 1 मे 2018

नांदगाव : शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या शेतमालाला रोखीने पेमेंट करावे, अशा नोटिसा बजावीत जोवर रोखीने शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार नाहीत, तोवर शेतमालाच्या लिलावाचे कामकाज सुरु केले जाणार नसल्याची ताकीद नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने आज व्यापाऱ्यांना दिली.

नांदगाव : शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या शेतमालाला रोखीने पेमेंट करावे, अशा नोटिसा बजावीत जोवर रोखीने शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार नाहीत, तोवर शेतमालाच्या लिलावाचे कामकाज सुरु केले जाणार नसल्याची ताकीद नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने आज व्यापाऱ्यांना दिली.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने व्यापारी प्रतिनिधी व संचालक मंडळ यांच्यात याबाबत झालेल्या बैठकीत कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. दरम्यान ज्या दिवशी खरेदी त्याच दिवसाचा धनादेश देण्याची तयारी दाखविणाऱ्या व्यापाऱ्यांचा लेखी प्रस्ताव बाजार समिती प्रशासनाने फेटाळून लावल्याने उद्यापासून लिलावाचे कामकाज बंद राहणार असल्याची सूचना प्रशासनाने बाजार समितीच्या आवारात फलकावर लावली आहे.

बँकाकडून वेळेवर रोकड मिळत नाही व एवढ्या प्रमाणात रोकड मिळत नसल्याने धनादेश स्वीकारला जावा, यासाठी व्यापारी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने सचिव अमोल खैरनार याना निवेदन दिले. निवेदनावर भिवराज कानमल, जय भवानी ओनियन मर्चंट, जय बालाजी ट्रेडिंग कंपनी ,रमेश करवा, जय श्रीराम ट्रेडिंग, कचराडस करवा, संदीप फोफलिया, आनंद चोरडिया, अभिजित कासलीवाल, भूषण धूत, योगेश फोफलिया, रिखबचंद कासलीवाल, संदीप खैरनार, राहुल ट्रेंडिंग, जय बजरंग ट्रेडिंग कंपनी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत 

संचालक मंडळ व व्यापारी वर्गाने  शेतमाल पेमेंट रोख स्वरूपात करणेबाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात व्यापारी वर्गाने रोख पेमेंट करण्यास असमर्थता दर्शविल्याने बुधवार दि.०२/०५/२०१८ पासून पुढील निर्णय होईपर्यंत नांदगाव मुख्य यार्डवरील संपूर्ण शेतमाल लिलावाचे कामकाज बंद राहील याची नोंद घ्यावी असे एका पत्रकान्वये बाजार समितीने कळविले आहे.

जिल्ह्यातील इतर बाजार समितीमधून शेतकऱ्यांना रोखीने पेमेंट होत असताना नांदगावमध्ये अशा प्रकारचे रोखीचे पेमेंट करावयास काहीच हरकत नाही, अशी भूमिका संचालक मंडळाने घेतल्याची माहिती सचिव अमोल खैरनार यांनी दिली.

Web Title: Nandgaon Agricultural Committee asks traders to pay farmers in cash only

टॅग्स

संबंधित बातम्या

लोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...

लॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज 

नागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...

Ganesh Festival : ढोल-ताशा पोहोचला साता-समुद्रापार

सध्या ढोल-ताशावर टीका होते, ती आवाजामुळे आणि पथकांच्या वाढत्या संख्येमुळे. ध्वनिप्रदूषण आणि डेसिबल हे शब्द उत्सवाच्या काळात हमखास चर्चेत येतात....

amazon-more
दिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)

भारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...

महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर 

मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...