Sections

नकाशात पार्किंग, जागेवर पत्ताच नाही!

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 11 एप्रिल 2018
Parking

जळगाव - शहरात ‘पार्किंग’ची समस्या अत्यंत बिकट बनली असून, पालिकेसह खासगी व्यापारी संकुलांच्या बांधकाम नकाशात दाखविलेल्या वाहनतळाचा प्रत्यक्ष जागेवर पत्ताच नसल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे बहुतांश संकुलांमध्ये येणारे ग्राहक आपली वाहने थेट रस्त्यांवरच लावत असल्याने आधीच बिकट बनलेल्या वाहतुकीचा मोठाच बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. दुर्दैवाने यासंदर्भात ना महापालिका कारवाई करत ना पोलिसदलाची वाहतूक शाखा. 

जळगाव - शहरात ‘पार्किंग’ची समस्या अत्यंत बिकट बनली असून, पालिकेसह खासगी व्यापारी संकुलांच्या बांधकाम नकाशात दाखविलेल्या वाहनतळाचा प्रत्यक्ष जागेवर पत्ताच नसल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे बहुतांश संकुलांमध्ये येणारे ग्राहक आपली वाहने थेट रस्त्यांवरच लावत असल्याने आधीच बिकट बनलेल्या वाहतुकीचा मोठाच बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. दुर्दैवाने यासंदर्भात ना महापालिका कारवाई करत ना पोलिसदलाची वाहतूक शाखा. 

वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर महापालिकेने मोठ्या प्रयत्नांना उपाय शोधला. त्यातून शहरातील, विशेषत: बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांनी काही काळ का होईना मोकळा श्‍वास घेतला. वर्ष-दीड वर्ष अतिक्रमणविरोधी मोहीम राबविल्यानंतर हे यश महापालिका प्रशासनाला दिसू शकले. मात्र, शहरातील बेशिस्त पार्किंगच्या बिकट समस्येवर अद्याप महापालिका प्रशासनाला तोडगा काढता आलेला नाही. 

पार्किंग व्यवस्थाच नाही शहरात पालिकेसह खासगी व्यापारी संकुलांची संख्या मोठी आहे. पालिकेच्या मालकीची २२ व अन्य खासगी व्यापारी संकुले मिळून दोनशेवर लहान-मोठ्या इमारती आहेत. या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी गाळे काढण्यात आले असून, यापैकी ९५ टक्के इमारतींच्या बांधकामात तळमजल्यासह संकुलाच्या हद्दीत वाहनतळ दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्ष जागेवर मात्र कुठलेही वाहनतळ दिसून येत नाही. त्यामुळे या संकुलांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने थेट रस्त्यावरच बेशिस्तपणे लागलेली असतात. 

...येथे होते कोंडी अधिक अगदी महापालिका मालकीच्या गांधी मार्केट, चौबे मार्केट व अन्य काही संकुलांमध्येही पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था देण्यात आलेली नाही. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोलाणी व्यापारी संकुलासमोर तीन-चार खासगी संकुले असून त्या सर्व संकुलांमध्ये तळघरात वाहनतळ केवळ नकाशावर दिसते, प्रत्यक्षात गाळे काढण्यात आले आहेत. या संकुलांमध्ये येणारे सर्व ग्राहक थेट रस्त्यावर वाहने लावतात व वाहतुकीची कोंडी होते. चित्राचौक ते गणेश कॉलनीदरम्यान प्रत्येक १००-२०० मीटर अंतरावर एक-दोन संकुले आढळून येतात, मात्र त्यापैकी कोणत्याही संकुलाने स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे गांधी मार्केट, फुले मार्केट, गोलाणी संकुल, कोर्टासमोरील रस्ता, नूतन मराठा महाविद्यालय, शाहूनगर ते थेट गणेश कॉलनी, गोविंदा रिक्षाथांबा, नवे बसस्थानक अशा सर्वच प्रमुख रस्त्यांच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते.

या उपाययोजना आवश्‍यक  प्रमुख रस्त्यांवर पार्किंग झोन निश्‍चित करणे  बेशिस्त रिक्षाचालकांचा बंदोबस्त करणे  जुन्या पालिका इमारतीच्या जागेवर पार्किंग झोन करणे  जुन्या सानेगुरुजी रुग्णालयाची जागा वापरणे  वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोलिस नियुक्त करणे

Web Title: municipal parking map place issue

टॅग्स

संबंधित बातम्या

राज्यात प्रथमच पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र पोलिसिंग

पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला....

urali-kanchan.jpg
उरुळी कांचनमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व...

तुर्काबादला किराणा दुकान फोडून 10 हजारांची चोरी

लिंबेजलगाव : तुर्काबाद खराडी (ता.गंगापुर, जि. औरंगाबाद ) येथे चोरट्यांनी किराणा दुकान फोडुन साहित्यासह 10 हजार रुपये चोल्याची घटना शनिवारी (ता.17)...

44crime_logo_525_1.jpg
शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्‍टरवर गुन्हा 

पिंपरी : शरीर सुखाची मागणी मान्य न केल्यास एका 36 वर्षीय महिलेला बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्‍टराच्या...

vajreshvari.
वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानामध्ये सव्वातीन कोटींचा अपहार

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानात जवळपास सव्वा तीन कोटी रुपयांच्या अपहार झाला आहे. या प्रकरणी विश्वस्थ...

yavat
नांदूरच्या कंपनीतून 'टाईल्स' चोरी करणारी टोळी जेरबंद

यवत - नांदूर (ता. दौंड) येथील टाईल्स कंपनी मधील टाईल्सची चोरी करणारी टोळी यवत पोलिसांनी जेरबंद केली आहे. यासाठी त्यांना स्थानिक पोलिस मित्रांची मोठी...