Sections

तेली समाजाचा बागलाण तहसीलवर मूकमोर्चा 

रोशन खैरनार |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Rally

सटाणा : दोंडाईचा (जि.धुळे) येथील तेली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा नराधम व त्याला पाठीशी घालणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी बागलाण तालुका तेली समाजातर्फे आज (ता.२७) तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

सटाणा : दोंडाईचा (जि.धुळे) येथील तेली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा नराधम व त्याला पाठीशी घालणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी बागलाण तालुका तेली समाजातर्फे आज (ता.२७) तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

बागलाणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा : दोंडाईचा (जि.धुळे) येथील माध्यमिक शाळेत पाच वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून शाळेच्या आवारात नराधमाने बलात्कार केला होता. घटनेनंतर नराधमास तात्काळ अटक करण्याऐवजी शाळेच्या संस्थाचालकांनी बलात्कारी नराधमाविरोधात गुन्हा दाखल करू नये यासाठी पिडीत मुलीच्या कुटुंबियांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ही बाब अत्यंत संतापजनक व निंदनीय आहे. या प्रकारानंतर भयभीत झालेले पिडीत मुलीचे कुटुंबीयांनी गाव सोडले असून ते आपल्या मूळगावी जळगाव येथे सध्या राहत आहेत. या घटनेमुळे राज्यभरातील संपूर्ण तेली समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून समाजबांधवांच्या भावना तीव्र आहेत. 

असे कृत्य करणाऱ्या नराधमास फाशी व्हावी आणि त्या नराधमास पाठीशी घालून त्याला मदत करणारे यांना या प्रकरणात सहआरोपी करावे, गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, पोसो कायद्यांतर्गत तपास व्हावा, खटला द्रुगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, पिडीत मुलीच्या कुटुंबियांना शासकीय धोरणानुसार तातडीने मदत मिळावी, पिडीत मुलीचा शैक्षणिक खर्च शासनाने करावा व भविष्यातील तिच्या नोकरीची हमी द्यावी, वैद्यकीय मदत देऊन पिडीतेच्या कुटुंबीयास पोलीस संरक्षण मिळावे तसेच पिडीत मुलीच्या पालकांवर दबाव टाकणारे संस्थाचालक, विद्यालयाचे प्रमुख व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशा मागण्याही निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. 

मोर्चात बागलाण तालुका तेली समाजाचे अध्यक्ष दत्तात्रेय पवार, सचिव कैलास बोरसे, शहराध्यक्ष अरुण सोनवणे, उमेश गाडेकर, सुधाकर चौधरी, प्रकाश चौधरी, बाळासाहेब चौधरी, सुनील जाधव, किशोर जाधव, विश्वनाथ जाधव, राजाराम जाधव, सुनील बोरसे, शशिकांत बिरारी, गुलाब चित्ते आदींसह शेकडो समाजबांधव उपस्थित होते. 

Web Title: Marathi news north maharashtra news tahsil balgan rally

टॅग्स

संबंधित बातम्या

‘विराट’ घेण्यास महाराष्ट्र इच्छुक 

मुंबई : भारतीय नौदलात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या विराट या युद्धनौकेचा ताबा घेण्यास महाराष्ट्र सरकार इच्छुक आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारच्या...

विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात 24 जण बुडाले 

मुंबई  - गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असतानाच काही दुर्घटनांमुळे उत्साहावर विरजण पडले. मिरवणुकीदरम्यान रविवारी राज्यभरात किमान 24 जणांचा...

File photo
वडिलांची जात मुलाला नाकारली!

वडिलांची जात मुलाला नाकारली! नागपूर : वडिलांना ज्या जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले, त्याच जातीचा मुलाचा दावा जात वैधता पडताळणी समितीने नाकारला आहे....

girl
चिमुकलीवर अत्याचार करून घेतला नाकाचा चावा

औंध (पुणे) : तीन वर्षीय चिरमुडीवर लैंगिक अत्याचार करून व तिच्या नाकाचा चावा घेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पाषाण येथे घडली. याप्रकरणी...

khadakwasla
खडकवासला : ढोल ताशांच्या गजरात श्री गणेशाला निरोप 

खडकवासला : खडकवासला, किरकटवाडी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडळांनी आकर्षक फुलांच्या सजावटी ,विद्यूत रोषणाई , देखाव्यांनी लक्ष वेधले जात...