Sections

विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रात उत्तुंग यश गाठावे : साहेबराव बच्छाव

रोशन खैरनार |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Satana

सटाणा : मोबाईल, टीव्ही व इंटरनेटच्या जगात तरुणाई भरकटत आहे. लहान वयातल्या छंदांचा आयुष्यभर उपयोग होत असल्याने अभ्यासाबरोबरच बालवयापासून चित्रकलासारखे विविध छंद जोपासून विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रात उत्तुंग यश गाठावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव यांनी येथे केले.

सटाणा : मोबाईल, टीव्ही व इंटरनेटच्या जगात तरुणाई भरकटत आहे. लहान वयातल्या छंदांचा आयुष्यभर उपयोग होत असल्याने अभ्यासाबरोबरच बालवयापासून चित्रकलासारखे विविध छंद जोपासून विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रात उत्तुंग यश गाठावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव यांनी येथे केले.

येथील श्री शक्ती शैक्षणिक संस्था संचलित डिव्हाईन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक, आमदार अपूर्व हिरे व सचिव दीपक सोनवणे यांच्या संकल्पनेतून आयोजित तालुकास्तरीय चित्रकला रंगभरण स्पर्धेचे उद्घाटन बच्छाव यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष संजय देसले, डिव्हाईन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य राजेंद्र भदाणे, बागलाण विकास मंचचे समन्वयक नंदकिशोर शेवाळे, एस.जी.लाड, टी.एन.खरे, जे.डी.दात्रे आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक प्रशांत निकम यांनी प्रास्ताविकात संस्थेतर्फे राबविण्याल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. बालवाडी ते पहिली, दुसरी ते चौथी, इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटात घेण्यात आलेल्या चित्रकला रंगभरण स्पर्धेत तालुक्यातील ८०० हून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन चित्र रंगविले.

एस.एस.जगताप, यु.बी.देवरे, एस.एस.कदम यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अविनाश पवार, सचिन सोनवणे, राहुल जमदाडे, माधुरी सावंत, नेहा देवरे, धनश्री ठाकरे, ऋतुजा दुसाने, अनुजा आहिरे, पल्लवी पंडित, वर्षा सुरवडे, श्वेता बोरसे, भूषण सोनवणे, अमित सोनवणे, सयाजी सोनवणे, अरुण वाघ, दीपक काळे, संदीप गांगुर्डे आदींसह पालक व शिक्षकांनी सहकार्य केले. पंकज दात्रे यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक प्रशांत निकम यांनी आभार मानले. 

Web Title: Marathi news north maharashtra news students success

टॅग्स

संबंधित बातम्या

pune
शेतकरी उत्पादक संस्थेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांनाच व्हावा : केंद्रीय कृषी राज्यमंत्री

पुणे (औंध) : "बाजारात विक्री करतांना शेतकऱ्यांनी गटांच्या स्वरुपात एकत्र येऊन विक्री व पुरवठ्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांचे दिवस बदलतील....

WhatsApp-Image-2018-09-20-a.jpg
इंदापूरमध्ये मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरा

इंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला....

kasturba chwok.jpg
कस्तुरबा चौकातील शिल्पाचा चबुतरा सुशोभित करावा

औंध : येथील विद्यापीठ रस्त्यावर कस्तुरबा वसाहतीजवळील चौकातील शिल्पाचा सिमेंटचा चबुतरा तोडण्यात आला. वाहतूकीस अडथळा होत असल्यामुळे हा चबूतरा तोडण्यात...

wani
सराड-वणी राष्ट्रीय महामार्गचे काम बाधीत शेतकऱ्यांनी पाडले बंद

वणी (नाशिक) : गुजरात राज्यातील सोनगड ते पिंपळगाव बसवंत या दरम्यानचा नव्याने जाहिर झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 वरील सराड ते...

Sakal Yin arranged Nirmalya compilation at Solapur
निर्माल्य संकलनासोबतच 'सकाळ यिन' करणार स्मार्ट सिटीचा जागर! 

सोलापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिन सदस्य विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करणार आहेत. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यंदा निर्माल्य संकलनासोबतच...