Sections

इलेक्ट्रिकल वजनकाट्यावरून निर्माण झालेला तिढा अखेर संपुष्टात

संजीव निकम |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
Nandgao

नांदगाव : शेतमालातील मोजमापातील पारदर्शकता यावी यासाठी बाजार समितीने सुरु केलेल्या इलेक्ट्रिकल वजनकाट्यावरून निर्माण झालेला तिढा आज अखेर संपुष्टात आला असून उद्या मंगळवारपासून लिलावाचे कामकाज पूर्ववत होणार आहे.

नांदगाव : शेतमालातील मोजमापातील पारदर्शकता यावी यासाठी बाजार समितीने सुरु केलेल्या इलेक्ट्रिकल वजनकाट्यावरून निर्माण झालेला तिढा आज अखेर संपुष्टात आला असून उद्या मंगळवारपासून लिलावाचे कामकाज पूर्ववत होणार आहे.

दरम्यान व्यापाऱ्यांनी आज सोमवारपासून बेमुदत बंद पुकारल्यामुळे बाजार समितीच्या आवारात आज लिलावाचे कामकाज सुरु होऊ शकले नव्हते. शिवाय शेतकऱ्यांनी देखील कुठल्याही प्रकारचा माल विक्रीसाठी आणलेला नव्हता, दरम्यान वजनकाट्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सभापती तेज कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. ही बैठक सुरु असतांनाच निलेश चव्हाण, विशाल वडघुले यांच्या नेतृत्वाखालील  स्वाभिमानी शेतकरी संघटना व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वजनकाटा सुरु झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यास प्रारंभ झालं तेव्हा सभापती तेज कवडे, माजी सभापती विलासराव आहेर, पुंजाराम जाधव, राजाभाऊ देशमुख भास्करराव कासार आदी संचालक बैठकीतून खाली उतरून घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना सामोरे गेले व त्यांचे निवेदन स्वीकारले.

आज सांयकाळी पर्यंत व्यापाऱ्यांना देण्यात आलेले परवाने रद्द करावेत, त्यांच्याकडील व व्यापाऱ्याकडे वजनकाट्यांची गाळे खाली करून घ्यावेत अशा मागणीचे निवेदन सादर केले. अन्यथा मंगळवारी बाजार समितीला टाळे ठोकू अशी भूमिका या कार्यर्त्यांनी घेतली. बाजार समितीमध्ये वजनकाटा सुरु करावा या मागणीसाठी या कार्यर्त्यांनी काही दिवसापासून पाठपुरावा सुरु केला होता. शेतकरी हित व मागणी लक्षात घेता बाजार समितीच्या संचालक मंडळाने अशा प्रकारचा वजनकाटा सुरु करण्यास संमती दिली मात्र खरेदीदार व्यापाऱ्यांचे खळे लांब असल्याचे कारण देत खरेदी झालेल्या मालातील वजनातील कथित तफावतीचा मुद्दा उपस्थित करीत व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या वजनकट्याला विरोध केला होता.

सकाळी संचालक मंडळाची बैठक सुरु असताना कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी नंतर निर्माण झालेल्या विवादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाने व्यापारी प्रतिनिधींना चर्चेसाठी पाचारण केले त्यात खळ्यासाठी जागा द्या असा मुद्दा उपस्थित झाला काट्यावरील तफावती बाबत ती किती असावी यावर बराच खाल झाला मनोहरमल पारख,सचिन पारख,संदीप फोफलीया,रिखब कासलीवाल,सोमनाथ घोंगाने नंदन करवा,आदींनी चर्चेत भाग घेतला  संचालक मंडळ व व्यापारी वर्ग यांच्यात सकारात्मक बैठक होवून त्यात यशस्वी तोडगा निघून बाजार समितीचा वजनकाटा ग्राह्य धरणेस व्यापारी वर्गाने सहमती दर्शविल्याने लिलावाचे कामकाज मंगळवार पासून नियमितपणे सुरू राहणार आहे.

संचालक मंडळ व व्यापारी यांच्यात यशस्वी बैठक होवून बाजार समितीचा वजनकाटा ग्राह्य धरणेत येवून व्यापारी व बाजार समिती चे वजनकाट्यात प्रति वाहनात 10 किलो वजनाचा फरक ग्राह्य धरणेत येईल. बाजार समितीचे वजनकाट्यावर मोजलेल्या वाहनासाठी  बाजार समितीस रू. 10/- व व्यापारी वजनकाटा रू. 15/- फी आकारली जाईल. इत्यादी निर्णय यावेळी घेण्यात आले. तसेच वजनात जास्त तफावत आढळून आल्यास पुन्हा वाहनाचे वजन करून खात्री केली जाईल. व त्यात दोषीवर कारवाई केली जाईल. असे निर्णय घेण्यात आले बाजार समितीचे लिलावाचे कामकाज मंगळवार पासून नियमित सुरू राहणार असून आपला शेतमाल नांदगांव यार्डवर विक्रीस आणावा असे आवाहन सभापती तेज कवडे व संचालक मंडळाने केले आहे.  

Web Title: Marathi news north maharashtra news nandgao electric weight

टॅग्स

संबंधित बातम्या

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

urali-kanchan.jpg
उरुळी कांचनमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व...

File photo
मनपाला जकात आधारित अनुदान

मनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...

शेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड

मुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16  ...

संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव : सुप्रिया सुळे

इंदापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली. मात्र, आता संविधान बदलण्याचा डाव भाजप सरकारकडून केला जात ...

Kalyan Municipal Corporation taken action against Encroachment on Footpath
कल्याणमध्ये महापालिकेने हटविली पदपथावरील अतिक्रमणे

कल्याण : शहरातील पदपथावर फेरीवाले आणि दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना चालता येत नसल्याच्या तक्रारी पाहता पालिका आयुक्त गोविंद बोडके...