Sections

गोदावरीच्या स्वच्छतेसाठी तरंगत्या सायकलचा प्रयोग 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
residentional photo

नाशिक : राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या पूर्वसंध्येला आज नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी तरंगत्या सायकलच्या प्रयोगाची चाचणी यशस्वी झाली. इस्पॅलियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी संशोधनातून सायकलची निर्मिती केली आहे. सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे नाशिककरांनी कौतुक केले. 

नाशिक : राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या पूर्वसंध्येला आज नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी तरंगत्या सायकलच्या प्रयोगाची चाचणी यशस्वी झाली. इस्पॅलियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी संशोधनातून सायकलची निर्मिती केली आहे. सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे नाशिककरांनी कौतुक केले.  सायकलच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्यांच्या माध्यमातून बॉक्‍स तयार केला. त्यात झाकणबंद आठ रिकामे पाण्याचे जार बसवण्यात आलेत. त्यामुळे नदीमध्ये सायकल उतरवल्यावर ती तरंगत असल्याचे शहरवासियांनी पाहिले. पानवेली काढण्यासाठी तरंगत्या सायकलच्या पुढील बाजूस विशिष्ठ पद्धतीची रचनाही करण्यात आली आहे. त्यामुळे तरंगत्या सायकलचा उपयोग गोदावरीच्या प्रदुषण मुक्तीसाठी मोठा फायदा होणार आहे.  जगविख्यात शास्त्रज्ञ आर्किमिडीज यांच्या सिद्धांतानुसार जेंव्हा आपण वस्तू पाण्यात बुडवतो, तेंव्हा त्याच्या वजनात घट होते. ज्या वस्तूची घनता कमी असते, तेंव्हा ती पाण्यावर तरंगते आणि घनता वाढली तर ती पाण्यात बुडते. वस्तूची घनता आणि घनफळ हे व्यस्त प्रमाणात असते. या सिद्धांताचा अभ्यास इस्पॅलियरच्या विद्यार्थ्यांनी उपयोगी पडला आहे. रिकाम्या जार मधील हवेचा दाब आणि प्लास्टिकमुळे सायकल पाण्यावर तरंगते. पॅंडलचा उपयोग पाण्यावर सायकल चालवण्यासाठी केला जातो. सायकलच्या पुढे लोखंडी पट्टी बसविण्यात आली असून तिला प्लास्टिकचे जाळी बसविण्यात आली आहे. या जाळीच्या माध्यमातून पाण्यात असलेला कचरा, प्लास्टिक, पानवेली, हिरवे गवत असे सर्व काही सहजगत्या काढता येते. विद्यार्थ्यांनी त्यासंबंधीचे प्रात्यक्षिक गोदावरीमध्ये करुन दाखवले. नदीच्या प्रदूषण निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांची ही तरंगती सायकल बहुउपयोगी ठरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आर्किमिडीज युरेका असा जयघोषही केला. विज्ञान विषयाच्या शिक्षिका कल्याणी जोशी, जॅक्‍सन नाडे, मुख्याध्यापिका अंकिता कुर्या यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. 

""अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी संशोधन व कल्पकतेचा योग्य वापर करत तरंगती सायकल तयार केली आहे. या सायकलचा वापर करून गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ  करण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. प्रयोगातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.''  - सचिन जोशी (शिक्षण अभ्यासक, इस्पॅलियर स्कूल)   

Web Title: marathi news national science day

टॅग्स

संबंधित बातम्या

काव्यगायन स्पर्धेत अनुराग जगदाळे प्रथम!
काव्यगायन स्पर्धेत अनुराग जगदाळे प्रथम!

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील जवाहरलाल सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह यांच्या मातोश्री व माजी सरपंच अजितचंद्र शाह यांच्या...

sharad pawar
उदयनराजेंना वगळून पवारांच्या घरी आमदारांची बैठक

बारामती (पुणे) : सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार हे आज स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या...

Pakistani man singing Indian national anthem during Asia Cup match goes viral watch video
Asia Cup : अन् पाकिस्तानी व्यक्तीनेच गायले भारतीय राष्ट्रगीत

दुबई- भारत पाकिस्तान सामना म्हटले की, प्रेक्षकांसाठी प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो. मैदानातील प्रत्येक घडामोडीवर प्रेक्षकांचे लक्ष असते. भारत आणि...

aurangabad
64 व्या कृषी संशोधन समितीच्या बैठकीस सुरवात

औरंगाबाद - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या (रब्बी हंगाम) 64 वी बैठकीस (झेड आरइएसी,...

bhigwan
राष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी

भिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...