Sections

राष्ट्रीय किर्तन महोत्सवास धर्मध्वज ध्वजारोहणाने सुरवात

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 5 मे 2018
live photo

सिडको : विश्वशांती वैष्णव धर्मसोहळा अंतर्गत राष्ट्रीय किर्तन महोत्सवाचे राजे संभाजी स्टेडियम नाशिक येथे धर्मध्वज ध्वजारोहण स्वामी सागरानंद महाराज सरस्वती यांच्या हस्ते झाले. या राष्ट्रीय किर्तन महोत्स्वास सुरवात झाली. 

सिडको : विश्वशांती वैष्णव धर्मसोहळा अंतर्गत राष्ट्रीय किर्तन महोत्सवाचे राजे संभाजी स्टेडियम नाशिक येथे धर्मध्वज ध्वजारोहण स्वामी सागरानंद महाराज सरस्वती यांच्या हस्ते झाले. या राष्ट्रीय किर्तन महोत्स्वास सुरवात झाली. 

घटस्थापना व विणापूजन हभप शिवराम म्हसकर ,आचार्य महामंडालेश्वर विठ्ठलनाथ द्वाराचार्य, डॉ हभप रामकृष्ण लहवीतकर , गोविंद महाराज गोरे, संजय नाना महाराज धोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले . आमदार सीमा हिरे,नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन शिवाजी चुंभळे,नाशिक मनपा  महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ कावेरी घुगे ,मुरलीधर पाटील ,योगाचार्य गोकुळ घुगे ,प्रज्ञा पाटील आदी उपस्थित होते.

 तब्बल पंचवीस वर्षानंतर वर्षानंतर दुस-यांदा नाशिक शहरात साजरा होणा-या राष्ट्रीय किर्तन महोत्सव व संगीत तुलसी रामायण कथेेच्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन विश्वशांती वैष्णव धर्म सोहळा व समस्त वारकरी सांप्रदाय महाराष्ट् राज्य अंतर्गत अनंत शिवराज बहूउददेशीय सेवा संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.

भव्य प्रांगणात आजपासून ते 15 मे पर्यंत हा सोहळा होत आहे. त्याचप्रमाणे भव्य रक्तदार शिबीर, अवयवदान शिबीर, सर्व रोगनिदान शिबीर, आरोग्यविषयी विशेष मार्गदर्शन, योगा मार्गदर्शन शिबिर आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: marathi news national kirtan mohotsav

टॅग्स

संबंधित बातम्या

शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर उरकावे

भिलार : महाबळेश्वर तालुक्यातील महसूल विभागाने शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर उरकावे आणि तोपर्यंत शिधापत्रिका धारकांना रेशन देण्याची...

सहकारामध्ये मनाला वाट्टेल तशी लुडबुड सरकारने करू नये : दिलीप माने

मोहोळ: सहकाराबद्धल कायद्यात पुर्ण तरतुद असताना सरकारने त्यामध्ये मनाला वाट्टेल तसा अर्थ काढुन सहकारमध्ये लुडबुड करू नये असे स्पष्ट मत...

विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

मुरबाड (ठाणे) : शिवळे महाविद्यालयात शनिवारी (ता 22) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये...

सुवर्णपदक विजेता रोहित चव्हाणचा सत्कार...

वालचंदनगर : दक्षिण कोरियामध्ये झालेल्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेतील भाला फेक मध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या रोहित भारत चव्हाणचे कळंब (ता. इंदापूर)...

Satara
पवारसाहेब, फसवाफसवी करु नका नाहीतर... : उदयनराजे

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरु असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर पहायला...