Sections

नाशिकरोड रेल्वे स्थानकाला मालवाहतूकीची लॉटरी 

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 31 मार्च 2018
residentional photo

नाशिक : माल वाहतूक हा रेल्वे प्रशासनाचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत. पण आतापर्यत कृषी मालवाहतूकीशिवाय इतर मोठ्या वाहतूकीची कामे नसणाऱ्या नाशिक रोड रेल्वे स्थानकाला वाटच पहावी लागते असे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात मात्र जिंदाल स्टील या कंपनीच्या स्टील वाहतूकीचे सुमारे 90 लाखांचा महसूल देणारे काम मिळाल्याने स्थानकाला ही लॉटरी लागली आहे. 

नाशिक : माल वाहतूक हा रेल्वे प्रशासनाचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत. पण आतापर्यत कृषी मालवाहतूकीशिवाय इतर मोठ्या वाहतूकीची कामे नसणाऱ्या नाशिक रोड रेल्वे स्थानकाला वाटच पहावी लागते असे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात मात्र जिंदाल स्टील या कंपनीच्या स्टील वाहतूकीचे सुमारे 90 लाखांचा महसूल देणारे काम मिळाल्याने स्थानकाला ही लॉटरी लागली आहे.  जिंदाल स्टील कंपनीच्या माल वाहातूकीचे मोठे काम मिळाले आहे. ज्यात कंपनीचे नाशिक रोड ते धुलिजन 2897 किलोमीटर 2774 टन लोंखडी साहित्य वाहून नेण्याचे हे काम आहे. ज्यापोटी रेल्वेला 91 लाख 91 हजार 989 रुपये माल वाहतूक भाडे मिळणार आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवजड माल वाहतूकीचे हे पहिलेच काम आहे. नाशिक रोडला सिमेंट, खते आणि धान्याची मालवाहतूक रेल्वेद्वारे होते. पण एकाच मालवाहातूकीच्या कामापोटी थेट 90 लाखांचे रेल्वे भाडे मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नाशिक रोड स्थानकाच्या मालवाहतूक विभागाच्या दृष्ट्रीने ही मार्चमधील लॉटरी आहे. 

50 लाखांची बचत  जिंदाल स्टील कंपनीला 2774 टनाचा लोंखडी साहित्य 2897 किलोमीटर लांबच्या प्रवासासाठी रस्ते वाहतूकीचा पर्याय निवडला असता तर किमान 1 कोटी 40 लाखाचा भाडे खर्च द्यावा लागला असता. याशिवाय रस्ते वाहातूकीत जोखमही होती. पण रेल्वेने मालवाहातूकीमुळे जिंदाल कंपनीचा सरासरी 50 लाखांचा लाभ होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कंपनी आणि नाशिक रोड रेल्वे स्थानक अशा दोहोसाठी लाभदायक असाच हा सौदा ठरला.   प्रवासाचे अंतर 2897 कि.मी.  वजन ः 2674 टन  भाडे ः 87 लाख 54 हजार 275  सीएसटी ः 4 लाख 37 हजार 713

Web Title: marathi news nasik road railway station

टॅग्स

संबंधित बातम्या

डेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट

पुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...

चाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील

मुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...

पिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस

पिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...

पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...

जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी

जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...

File photo
भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार

भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...