Sections

पोस्टाने येणारे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे प्राचार्यांच्या कपाटात सीलबंद

संतोष विंचू |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
HSC

अधिवेशनात प्रश्न गाजणार
आजपासून (ता.२६) विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून विरोधकांकडून शासनाला हे आंदोलन व प्रलंबित मागण्यांसंदर्भात जाब विचारून धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करून २० टक्के अनुदानाची तरतूद करावी,2 मे 2012 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना मान्यता आणि वेतन मिळावे. 2010-12 नंतरच्या सर्व प्रस्तावित पदांना मंजुरी मिळावी. विनाअनुदानितकडून अनुदानित जागेवर बदली करताना वेतनश्रेणीत नियुक्ती मिळावी. माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षकांना मान्यता मिळावी आदि मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

येवला : शासन मागण्या मान्य करत नसल्याने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील प्राध्यापकांच्या बहिष्कार आंदोलनाने बाळसे धरले आहे. आंदोलनाचा आज सहावा दिवस असून या काळात झालेल्या पाच ते सहा विषयाच्या मुख्य नियामकांची सभा मंडळाच्या कार्यालयात झालेल्या नाही. इकडे उत्तरपत्रिका तपासणीचे गठ्ठे महाविद्यालयात येत असून विषय शिक्षक त्याला हात लावत नसल्याने पोस्टाने येत असलेले गठ्ठे कपाटात सीलबंद ठेवून सांभाळण्याची वेळ प्राचार्यांवर आली आहे.

विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून थेट जीआर काढण्याचा मागणीसाठी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने हे आंदोलन हाती घेतले आहे. तीन फेब्रुवारीला स्वतः शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पंधरा दिवसांत या संदर्भात शासन निर्णय घेऊ असा शब्द देऊनही २० तारखेपर्यंत कुठलेही परिपत्रक निघाले नाही. यामुळे बुधवार (ता.२१) पासून प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. आजपर्यंत इंग्रजी, हिंदी, मराठी,सहकार,भूशास्र या विषयांच्या मुख्य नियामकांच्या सभा पुण्यासह मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर, कोंकण येथील नियोजित असतांना सभा झाल्या नाहीत. या सर्व विभागीय मंडळाच्या अध्यक्षांना तेथील नियामकांनी आणि विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार आंदोलन करण्या चे मुख्य नियामक व नियामकांच्या सह्यांचे निवेदन दिले आहे. आंदोलन अधिक लांबल्यास १२ वीच्या निकालावर परिणाम होनार हे निछित आहे. त्यातच शासन ठोस निर्णय घेत नसल्याने आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहेत.

उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडून राहणार! महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख,सरचिटणीस संजय शिंदे,जिल्हा सरचिटणीस अनिल महाजन आदि रोजच नियामक व प्राध्यापकांशी संपर्क साधून आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहण्याचे आवाहन करत आहेत.येथील जिल्हा प्रतिनिधी अंबादास ढोले,तालुकाध्यक्ष एम.पी.गायकवाड यांनी देखिल सातत्याने संपर्क करत नियामक व प्राध्यापकांना आंदोलनाची गरज समजावली आहे. मंडळाच्या पद्धतीप्रमाणे उत्तरपत्रिका या प्राचार्यांच्या नावे कनिष्ठ महाविद्यालयात पोस्टाने पाठविल्या जातात.प्राचार्यांकडून संबंधित विषय शिक्षक या उत्तरपत्रिका स्वीकारतात व तपासणी करतात. परंतु बहिष्कार आंदोलनामुळे उत्तरपत्रिकेचे गठ्ठे आता महाविद्यालयात पडून राहणार आहे.आलेले गठ्ठे आता सांभाळण्यासाठी जवाबदारी प्राचार्यांवर आली आहे. विशेष म्हणजे नियामकांनी शिक्षण मंडळाच्या सभेवर बहिष्कार टाकल्याने परीक्षकाला तपासणीच्या मार्गदर्शक सूचना व विद्यार्थ्यांच्या रोल नंबरची याद्यी  प्राप्त होऊ शकत नाही.त्यामुळे तपासणी करणे शक्यच होत नाहीये.

अधिवेशनात प्रश्न गाजणार आजपासून (ता.२६) विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून विरोधकांकडून शासनाला हे आंदोलन व प्रलंबित मागण्यांसंदर्भात जाब विचारून धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करून २० टक्के अनुदानाची तरतूद करावी,2 मे 2012 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना मान्यता आणि वेतन मिळावे. 2010-12 नंतरच्या सर्व प्रस्तावित पदांना मंजुरी मिळावी. विनाअनुदानितकडून अनुदानित जागेवर बदली करताना वेतनश्रेणीत नियुक्ती मिळावी. माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षकांना मान्यता मिळावी आदि मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

Web Title: Marathi news Nashik news HSC exam

टॅग्स

संबंधित बातम्या

महिला-बालविकास विभागाचे वरातीमागून घोडे!

मुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा...

छोट्यांचे मोठे यश

छोट्यांचे मोठे यश नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर...

File photo
बालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला?

बालक दिनाचे काय पुसता...भुकेचे काय ते बोला? नागपूर : "घर से मस्जिद है बहुत दूर...चलो यूँ कर लें, किसी रोते हुये बच्चे को हंसाया जाये...' या उर्दू...

भोरच्या विकासासाठी एकवटले अधिकारी

नसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी...

बेकायदेशीर दारु बंदसाठी महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव 

सोलापूर : वारंवार निवेदने देऊनही बार्शी तालुक्‍यातील साकत गावातील बेकायदेशीर दारु विक्री बंद होत नसल्याने तेथील महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात...

parner.jpg
पारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे

पारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच...