Sections

मंगरूळ येथे विहिरीत आढळला बिबट्या

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 13 मार्च 2018
live photo

पारोळा 12 : मंगरूळ (ता. पारोळा) येथील मयाराम राजाराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळी बिबट्या आढळला आहे. वनविभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून, बिबट्याला काढण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत. 

पारोळा 12 : मंगरूळ (ता. पारोळा) येथील मयाराम राजाराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळी बिबट्या आढळला आहे. वनविभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून, बिबट्याला काढण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत.  बिबट्या विहिरीत नेमका कसा पडला याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. ही घटना आज सकाळी नऊच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. डॉ. सुनील पाटील यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. दसरे यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. श्री. दसरे वनविभागाच्या ताफ्यासह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले आहेत. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. आर. एस. दसरे यांच्या समवेत चाळीसगाव संजय मोरे, एरंडोलचे बी. एस. पाटील, धनंजय पवार (जळगाव) आदींसह वनपाल, वनरक्षक असा सुमारे 50 कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी बिबट्याला काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.

Web Title: marathi news mangrul bibtya

टॅग्स

संबंधित बातम्या

अखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू

मरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...

आम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर 

औरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक...

bhilar
पुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ

भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...

usha-ramlu
मुलीच्या पोटाची शस्त्रक्रिया बाजूला ठेवीत कार्यकर्त्याला न्यायालयात मदत

गोरेगाव (मुंबई) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या  (आठवले गट) मुंबई कार्याध्यक्षा उषा रामलु या गोरेगाव  पश्चिम भागात तर गोरेगाव रिपाई...

sangamner
संगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी

संगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...

मुकुल वासनिक व नितीन राऊत समर्थक भिडले

नागपूर - जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत रामटेक लोकसभेच्या उमेदवारीवरून माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आणि राज्यातील माजी मंत्री नितीन राऊत यांचे...