Sections

रस्ते देखभाल-दुरुस्तीसाठी आता "इंटिग्रेटेड सिस्टिम' 

सकाळ न्यूज नेटवर्क |   शनिवार, 12 मे 2018

रस्ते देखभाल-दुरुस्तीसाठी आता "इंटिग्रेटेड सिस्टिम' 

रस्ते देखभाल-दुरुस्तीसाठी आता "इंटिग्रेटेड सिस्टिम' 

जळगाव : खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा राज्याच्या बांधकाम मंत्र्यांनी केल्यानंतरही रस्त्यांची स्थिती सुधारलेली नसताना बांधकाम विभागाने आता रस्त्यांच्या देखभाल- दुरुस्तीसाठी नवी "इंटिग्रेटेड सिस्टिम' कार्यान्वित केली आहे. या प्रणालीत लहान कामे देण्यापेक्षा मोठी कामे देण्यावर भर असून त्यामुळे एकूणच निविदांची संख्या कमी झाली आहे. याद्वारे रस्त्यांच्या दुरुस्तीचा दर्जा राखण्यावर भर दिला जात आहे.  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्यावर्षी डिसेंबर 15 तारखेपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली होती, प्रत्यक्षात हे काम काही होऊ शकले नाही. प्रत्येक कामाचे मर्यादित स्वरूप, त्यामुळे निविदांची वाढती संख्या व त्यातच अतिरिक्त रस्ते विकासाचा भार आणि त्यातून न राहणारा कामाचा दर्जा यामुळे राज्यातील बहुतांश रस्ते आजही खड्डेमुक्त नव्हे तर खड्डेयुक्तच आहेत. 

अशी आहे "इंटिग्रेटेड सिस्टिम'  उपाय म्हणून बांधकाम खात्याने आता रस्त्यांच्या देखभाल- दुरुस्तीसाठी नवी "इंटिग्रेटेड सिस्टिम' कार्यान्वित केली आहे. यात नवीन रस्त्यांची कामे, रुंदीकरण अथवा विस्ताराचे काम न घेता आहे ते रस्ते टिकविण्यावर भर असेल. एक-दोन कोटींची लहान कामे न घेता गट पद्धतीने मोठी कामे समाविष्ट करून निविदांची संख्या कमी करण्यावर यात भर आहे. ही प्रणाली कार्यान्वित केल्यामुळे शे-दोनशे निविदांची संख्या मर्यादित होऊन ती थेट 20-25वर आली आहे.  ------  पॉइंटर  अशी कामे होणार  - राज्यातील प्रमुख मार्गांचा समावेश  - प्रमुख जिल्हामार्गांचीही दुरुस्ती होणार  - रस्त्याच्या स्थितीनुसार ठरेल प्राधान्यक्रम  - नव्या रस्त्यांची कामे यात नसतील  - गटपद्धतीने कामे करून घेण्यावर भर  -------  कोट..  शासनाने रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे "इंटिग्रेटेड' पद्धतीद्वारे करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार या कामांबाबत नियोजन केले जात आहे. राज्यभरात या प्रणालीद्वारे रस्त्यांची दुरुस्ती होणार असून सुरवातीला एकपदरी, नंतर दुपदरी रस्त्यांची दुरुस्ती यात होईल.  - प्रशांत सोनवणे  अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग, जळगाव.   

Web Title: marathi news jalgaon raste

टॅग्स

संबंधित बातम्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिसांनी केले 37 जणांना हद्दपार

मोहोळ : मोहोळ पोलिसांकडून गणेशोत्सव उत्सवाच्या मिरवणुकीत गांवात अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांची माहिती एकत्रित करून ...

The sand smuggling in Atapalli taluka administration ignored the mafia
एटापल्ली तालुक्यात वाळू तस्करी जोमात; प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

एटापल्ली (जि. गडचिरोली) - तालुक्यात विविध शासकीय इमारती, रस्ते, नाली व खासगी इमारतीं बांधकामे गेली वर्षभरापासून केली जात आहेत.  या...

pune
शेतकरी उत्पादक संस्थेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांनाच व्हावा : केंद्रीय कृषी राज्यमंत्री

पुणे (औंध) : "बाजारात विक्री करतांना शेतकऱ्यांनी गटांच्या स्वरुपात एकत्र येऊन विक्री व पुरवठ्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांचे दिवस बदलतील....

WhatsApp-Image-2018-09-20-a.jpg
इंदापूरमध्ये मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरा

इंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला....

indapur
केंद्र सरकार साखर उद्योगाबाबत संवेदनशील नाही - हर्षवर्धन पाटील

इंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासंदर्भात अद्याप मंत्री समितीची बैठक घेतली नाही. केंद्र- शासन देखील या उद्योगासंदर्भात ...