Sections

युती, आघाडी स्वतंत्र लढण्याचे दावे पोकळ

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 15 मार्च 2018
jalgaon-mahanagarpalika

जळगाव - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. युती आणि आघाडी करण्यावरून आता पक्षनेतृत्वात शह- काटशहाचा खेळ सुरू झाला आहे. पक्षाचे नेते युती, आघाडी किंवा स्वतंत्र लढण्याचे दावे करीत असले, तरी ते ‘पोकळ’च असल्याचे दिसत आहे. खऱ्या अर्थाने सर्वच पक्षांतील अंतर्गत वाद आणि नेतृत्वाचाच तिढा सोडविण्याचे खरे आव्हान आहे. 

जळगाव - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. युती आणि आघाडी करण्यावरून आता पक्षनेतृत्वात शह- काटशहाचा खेळ सुरू झाला आहे. पक्षाचे नेते युती, आघाडी किंवा स्वतंत्र लढण्याचे दावे करीत असले, तरी ते ‘पोकळ’च असल्याचे दिसत आहे. खऱ्या अर्थाने सर्वच पक्षांतील अंतर्गत वाद आणि नेतृत्वाचाच तिढा सोडविण्याचे खरे आव्हान आहे. 

महापालिकेतील सध्याची राजकीय स्थिती विचित्र आहे. महापालिकेत खानदेश विकास आघाडीचे बहुमत आहे. तर याच आघाडीच्या विरोधात लढा देऊन मनसेच्या चिन्हावर तब्बल तेरा नगरसेवक निवडून आणणारे ललित कोल्हे याच आघाडीच्या बळावर महापौर आहेत. मात्र, आगामी निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत त्यांचीच भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्याच निर्णयाबाबत संभ्रम आहे. तर आघाडीच्या विरोधात लढलेली राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका खानदेश विकास आघाडीच्या ‘बाजू’ची तर कधी विरोधात राहिली आहे. परंतु आता हीच ‘राष्ट्रवादी’ सोबत असून, आघाडीच्या बळावर त्यांनी महिला बालकल्याण सभापतिपदही मिळविले आहे. तर बहुमतात असलेल्या खानदेश विकास आघाडीने उपमहापौर, स्थायी समिती सभापतिपद आपल्याकडे ठेवले आहे. भाजप हा प्रमुख विरोधी  पक्ष आहे. 

पक्षीय नेतृत्वाबाबतही प्रश्‍नचिन्ह महापालिकेतील पक्षीय नेतृत्वाचा विचार केल्यास खानदेश विकास आघाडीचे नेते सुरेशदादा जैन हे शिवसेनेचे माजी मंत्री आहेत. महापौर ललित कोल्हे यांचा मनसे हा पक्ष असला तरी तो तांत्रिकदृष्ट्या कागदावरच आहे. त्यामुळे भविष्यात ते या पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्‍यता कमीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातील आणि महापालिकेतील नेतृत्वात मोठा फरक आहे. या ठिकाणी जिल्हा नेतृत्वाचे महापालिकेतील सदस्य ऐकतीलच असे नाही किंवा महापालिकेतील नेत्यांचा सर्व सदस्य आदेश पाळतीलच असेही नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व महापालिकेत नसल्यासारखेच असल्याचे सांगण्यात येते. भाजप विरोधी पक्षात आहे. परंतु पक्षाचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व खानदेश विकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे सख्य आहे. आघाडीचे नेते कायम महाजन यांच्या संपर्कात असतात, असेही सांगितले जाते. त्यामुळे महापालिकेतील भाजपचे सदस्य आणि भाजपचे जिल्ह्यातील नेतृत्व यांच्यातही सख्य नाही. भाजपमध्ये जिल्ह्यातील राजकारणात असलेल्या महाजन आणि खडसे गटाचा वाद महापालिकेतही असून, खडसे यांच्या गटाचे मोठ्या प्रमाणावर नगरसेवक असल्याचे सांगितले जाते. पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजपच्या नगरसेवकांनीच आगामी निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्‍न विचारला होता. त्यावेळी नेतेही निरुत्तर झाले होते. तर दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जळगावातच फार कमी येत असल्यामुळे त्यांचेही महापालिकेतील गटाकडे फारसे लक्ष नाही. त्यामुळे सध्या तरी भाजपही महापालिकेत नेतृत्वहीनच असल्याचे दिसत आहे.

‘युती’,‘आघाडी’ दावे नेत्यांकडूनच महापालिकेतील खानदेश विकास आघाडीसह सर्वच पक्षाची आगामी निवडणुकीबाबत संभ्रमावस्था आहे. अशा स्थितीत दुसरीकडे नेत्यांकडूनच ‘युती’, ‘आघाडी’ आणि स्वतंत्र लढण्याचे दावे- प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी महापालिकेत भाजप-सेनेच्या युतीचा दावा केलेला आहे. दुसरीकडे मात्र जैन यांचेच मित्र असलेले भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘महापौर’ भाजपचा असेल असे संकेत दिले आहेत. मात्र त्यांनी स्वतंत्र लढण्याबाबत सोईस्कर मौन राखले आहे. तरीही भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी मात्र स्वतंत्र चिन्हावर लढण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी खानदेश विकास आघाडीसोबत युती करण्याची घोषणा केली आहे. तर खानदेश विकास आघाडीचे सर्वेसर्वा असलेल्या सुरेशदादा जैन यांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुका चिन्हावर लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता जैन यांची खानदेश विकास आघाडीच मैदानात राहणार की नाही? याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. महापालिकेतील सध्याच्या या स्थितीत पक्षाचे नेते युती आणि आघाडीसह स्वतंत्र लढण्याचे दावे करीत असले तरी सर्वच पक्षाच्या नेत्यांना सद्या तरी आपल्या पक्षातील तिढा सोडविण्याचे आव्हान आहे.

Web Title: marathi news jalgaon news municipal corporation

टॅग्स

संबंधित बातम्या

narendra modi
चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी

अंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...

Cotton
कापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी

जळगाव - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रोत्साहनाने खानदेश, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात जिनिंगची संख्या वाढली, परंतु जिनिंगकडे हवा...

पैठण, जि. औरंगाबाद - पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१५) झाले. या वेळी सुभाष देसाई, नंदकिशोर कागलीवाल, रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे, अतुल सावे, प्रकाश सारवाल,
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी

औरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...

ullasnagar.
उल्हासनगरमध्ये वाढीव वीज बिलाच्या विरोधात साईपक्ष रस्त्यावर

उल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे....

deshmukh
माढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून...

In the Lok Sabha Congress seats is Increasing
लोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी !

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...