Sections

मराठी भाषा दिनानिमित्त आज वक्‍तृत्व स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Yin

जळगाव - जगभरात मराठी भाषा दिन कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात ‘यिन’तर्फे उद्या (ता. २७) वक्‍तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा शहरातील आयएमआर महाविद्यालयातील सभागृहात होणार असून, सकाळी दहाला स्पर्धेचे उद्‌घाटन होईल.

जळगाव - जगभरात मराठी भाषा दिन कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात ‘यिन’तर्फे उद्या (ता. २७) वक्‍तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा शहरातील आयएमआर महाविद्यालयातील सभागृहात होणार असून, सकाळी दहाला स्पर्धेचे उद्‌घाटन होईल.

‘सकाळ-यिन’च्या माध्यमातून युवकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या उपक्रमांतर्गत मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ‘यिन’च्या माध्यमातून राज्यात जिल्हास्तरावर वक्‍तृत्व स्पर्धा होणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी होणारी स्पर्धा ‘सकाळ- यिन’ आणि आयएमआर महाविद्यालय यांच्यातर्फे होत आहे. या स्पर्धेत महाविद्यालयीन युवक- युवतींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास एक हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय बक्षीस पाचशे रुपये व प्रमाणपत्र, तर तृतीय बक्षीस तीनशे रुपये आणि प्रमाणपत्र आहे. स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सहभागासाठी आजही संधी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शंभर रुपये शुल्क आहे. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला बोलण्यासाठी ५+२ मिनिटांची वेळ देण्यात आली असून, स्पर्धेचे हक्क आयोजकांकडे राखीव ठेवण्यात आले आहेत. इच्छुक स्पर्धकांना कार्यक्रमस्थळीही नावनोंदणी करता येईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ‘यिन’चे समन्वयक अंकुश सोनवणे (भ्रमणध्वनी - ९६८९०५३२११)  यांच्याशी संपर्क साधावा. 

असे आहेत स्पर्धेसाठीचे विषय  मराठी भाषा आणि आजचा तरुण.  समाज माध्यमांमध्ये मराठीचा सन्मान : काळाची गरज  लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे संवर्धनच तरुणाईला आकर्षित करेल  मराठी लेखक, कवींकडून कसदार लेखनाची आवश्‍यकता  शासन पातळीवरील मराठी उदासीनता एक वास्तव 

Web Title: marathi news jalgaon news marathi bhasha din Oratory Competition

टॅग्स

संबंधित बातम्या

राज्यात प्रथमच पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र पोलिसिंग

पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला....

urali-kanchan.jpg
उरुळी कांचनमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व...

झाडे जगवण्यासाठी रिकाम्या बॉटलची करा मदत; तरुणाईचे आवाहन

संग्रामपूर- सातपुडा पर्वतराईत सालईबन या आदिवासी परिसरात लागवड केलेल्या झाडांना जगविण्यासाठी रिकाम्या बिसलरी बॉटलची मदत करा, असे आवाहन तरुणाई...

पाण्यासाठी सांगोल्यात जनावरांसह शेतकर्यांचे धरणे आंदोलन

सांगोला : तालुक्यातील माण नदीकाठच्या 14 गावातील शेतकऱ्यानी नदीमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडावे, या मागणीसाठी येथील तहसिल कार्यालयावर जनावरासह मोर्चा...

'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'

हिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत...

BHIDE-PUL.jpg
बाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार?

पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...