Sections

हतनूर प्रकल्पात 34 टक्केच जलसाठा 

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 2 एप्रिल 2018
residentional photo

रावेर : कमी झालेला पावसाळा आणि सप्टेंबरनंतर तापी आणि पूर्णा नदीच्या प्रवाह बंद पडल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत हतनूर मध्यम प्रकल्पातील जलसाठा तब्बल अकरा टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. सध्या प्रकल्पात फक्त 34 टक्केच जलसाठा आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अडीच महिने बाकी असल्याने यंदा निम्म्या जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ सहन करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. 

रावेर : कमी झालेला पावसाळा आणि सप्टेंबरनंतर तापी आणि पूर्णा नदीच्या प्रवाह बंद पडल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत हतनूर मध्यम प्रकल्पातील जलसाठा तब्बल अकरा टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. सध्या प्रकल्पात फक्त 34 टक्केच जलसाठा आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अडीच महिने बाकी असल्याने यंदा निम्म्या जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ सहन करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. 

100 गावाना पाणी पुरवठा  हतनूर या मध्यम प्रकल्पातून रावेर, सावदा, यावल, भुसावळ, वरणगाव, भुसावळ रेल्वे, जळगाव औद्योगिक वसाहत, मलकापूर या शहारांसह जिल्ह्यातील सुमारे 100 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.  यावर्षी हा प्रकल्प भरला मात्र प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यावर सुद्धा तापी आणि पूर्णा नदीच्या पात्रातून सप्टेंबर, ऑक्‍टोबर पर्यंत पाणी वाहत येते आणि पाणी साठ्यात भर पडत जाते. यंदा हा 'येवा' लवकर बंद झाला. त्यामुळे प्रकल्पातील साठा आताच एक तृतीयांश झाला आहे.  रविवार सकाळी आठ वाजता प्रकल्पात 219:40 दशलक्ष घनमीटर जलसाठा होता. या प्रकल्पाच्या एकूण जलसाठ्याच्या 33.88 टक्के इतका आहे. मागील वर्षी 1 एप्रिल 2017 ला प्रकल्पात 248.25 दशलक्ष घनमीटर म्हणजे क्षमतेच्या 45.20 टक्के जलसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षीचा पाणी साठा 11 टक्‍क्‍यांनी कमी आहे. जलसाठा रोज अर्ध्या टक्‍क्‍याने कमी होत आहे. सुमारे दोन महिन्यात जिवंत पाणी साठा संपेल अशी शक्‍यता आहे. 

काटकसरीची गरज  पावसाळा 7 जूनला सुरू होतो. प्रत्यक्षात या प्रकल्पात पाणी साठा किमान जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात वाढतो. याचा अर्थ पावसाळ्यासाठी अजून तब्बल अडीच महिने बाकी आहेत. शिल्लक पाणी साठा काळजीपूर्वक, काटकसरीने वापरण्याची गरज आहे, अन्यथा निम्म्या जिल्ह्याला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्‍यता आहे.  उन्हाळ्यामुळे 100 गावात पाण्याचा वापर वाढला आहे त्यामुळे यावर्षी हा जिवंत पाणी साठा तुलनेने लवकर संपण्याची चिन्हे आहेत. 

17 टक्के पाण्याचा वापर  मागील महिन्यात याच काळात प्रकल्पात 51 टक्के पाणी साठा होता. महिनाभरात तो 34 टक्‍क्‍यांवर खाली आला आहे. याच वेगाने पाण्याचा वापर झाल्यास मे च्या मध्यात प्रकल्पातील जिवंत पाणी साठा संपण्याची चिन्हे आहेत. 

तीव्र टंचाईची शक्‍यता  प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा संपला तरीही या प्रकल्पात मोठमोठे खड्डे आहेत त्यात पाणी असतेच. त्यामुळे प्रकल्पाच्या वरच्या बाजूला फारशी पाणीटंचाई जाणवणार नाही मात्र ज्या ठिकाणी प्रकल्पातून पाणी सोडल्यावरच पुरवठा होतो तिथे तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. प्रकल्पाचे सर्व दरवाजे पूर्ण उघडल्यावर देखील प्रकल्पातून पाणी खालच्या नदीपात्रात पडत नसेल तर त्याला जिवंत पाणीसाठा संपला असे म्हणतात. या परिस्थितीत प्रकल्पातील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणीसाठा असतो, मात्र तो वापरणे अवघड असते.   

Web Title: marathi news jalgaon hatnur dam

टॅग्स

संबंधित बातम्या

Farmer-Suicide
मराठवाड्यात चार शेतकरी आत्महत्या 

औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार...

आता ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी

चंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्या पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव...

water tanker
राज्यात टँकरची हजाराकडे वाटचाल 

सोलापूर : सद्यस्थितीत राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये एकूण 692 पाणी टॅंकर सुरु झाले आहेत. त्यामध्ये 567 गावे आणि एक हजार 117 वाड्यांवर टॅंकरद्वारे पाणी...

manmad
माधवरव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार

मनमाड - कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड माधवरव गायकवाड आज अनंतात विलीन झाले. माधवरावांच्या  पार्थिवावर मनमाडच्या...

देहूरोड - रस्ते महामंडळाकडून सुरू असलेले उड्डाण पुलाचे काम.
देहूरोड उड्डाण पुलाचे काम संथगतीने

पिंपरी - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या उड्‌डाण पुलाचे काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी या...

सकाळ कार्यालय, पिंपरी - संपादकीय कामकाजाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देताना ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर.
विद्यार्थी झाले अतिथी संपादक

पिंपरी - वृत्तपत्र म्हणजे काय?..., ते कसे छापले जाते?..., बातम्या कुठून मिळतात?..., मीडियाविषयी आस्था..., त्याच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्याची...