Sections

सहजीवनाची सुरवात केली रक्तदानाने ! 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 24 एप्रिल 2018

जळगाव ः ग्रामीण भागातील जनता अजूनही मागास विचारांची, असे मानले जाते. मात्र, हेच लोक आपल्या कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण करतात, तेव्हा त्यांचे कौतुक न झाले तरच नवल..! जामनेर तालुक्‍यातील पहूर येथील शेतकरी तरुणाचा गावातीलच मुलीशी विवाह जुळला. सोहळ्यात खर्च नको म्हणून त्यांनी दोनशे रुपयांत लग्न लावून घेतले. एवढ्यावरच हे दांपत्य थांबले नाही तर, सहजीवनाचा प्रारंभ विधायक कार्यानं व्हावा म्हणून दोघांनी विवाहानंतर लगेचच रक्तदान करत अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला. 

जळगाव ः ग्रामीण भागातील जनता अजूनही मागास विचारांची, असे मानले जाते. मात्र, हेच लोक आपल्या कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण करतात, तेव्हा त्यांचे कौतुक न झाले तरच नवल..! जामनेर तालुक्‍यातील पहूर येथील शेतकरी तरुणाचा गावातीलच मुलीशी विवाह जुळला. सोहळ्यात खर्च नको म्हणून त्यांनी दोनशे रुपयांत लग्न लावून घेतले. एवढ्यावरच हे दांपत्य थांबले नाही तर, सहजीवनाचा प्रारंभ विधायक कार्यानं व्हावा म्हणून दोघांनी विवाहानंतर लगेचच रक्तदान करत अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला. 

अतुल लहासे हे पहूर येथील रहिवासी, व्यवसायाने शेतकरी. काही दिवसापूर्वी पहूरमधील वर्षा यांच्याशी त्यांचे लग्न जुळले. विवाह म्हटला की मोठा खर्च, पैशांची उधळपट्टी. परंतु, असे न करता अतुल व वर्षा यांनी आदर्श विवाह करण्याचे ठरवले. ही गोष्ट दोघांच्या कुटुंबातील सदस्यांना सांगून केवळ 200 रुपयांत ते विवाहबद्ध झाले. या नव्या सहजीवनाची सुरवात नव्या संकल्पनेने करावी, त्यातून कुणाला तरी जीवदान मिळावे हा विचार करत या दांपत्याने आज थेट जळगावी येत इंडियन रेडक्रॉस सोसायटी गाठली. तेथे दोघांनीही रक्तदान केले आणि आपल्या पुढील जीवनास सुरवात केली. 

रेडक्रॉस सोसायटीतर्फे सत्कार  नवदांपत्याच्या या अभिनव विवाहासोबतच आदर्श वैवाहिक जीवनाच्या सुरवातीबद्दल अतुल व वर्षा लहासे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र, ट्रॉफी, विमा संस्थेचे उपाध्यक्ष गनी मेमन यांच्याहस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी अरविंद देशमुख, रेडक्रॉसचे प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, डॉ. अनिल चौधरी, जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा उपस्थित होत्या. तसेच जिल्हाधिकारी यांनी देखील नवदांपत्याचा कौतुक करून अभिनंदन केले. 

रक्तदान जागृतीचा संकल्प  नवदाम्पत्य अतुल व वर्षा लहासे यांनी रक्तदान करून वैवाहिक जीवनाला आज सुरवात केली. यासोबत त्यांनी आजूबाजूच्या तसेच कुटुंबातील सदस्यांना रक्तदानाचे महत्त्व सांगून रक्तदानाबाबत जनजागृती करणार असल्याचाही संकल्प केला. 

Web Title: marathi news jalgaon blood donetion

टॅग्स

संबंधित बातम्या

muktapeeth
ट्रॅव्हल लाइट

आयुष्याच्या प्रवासातही भार कमी करीत जायला हवे. म्हणजे चित्तशुद्धी अनुभवता येते. पर्यटनविषयीच्या जाहिराती वाचत होते. बहुतेक सर्व पर्यटनसंस्था...

Pregnant Delhi Woman Bites Off Husbands Tongue Allegedly Over His Looks
...म्हणून नवऱयाची किस करताना तोडली जीभ

नवी दिल्ली- आपला नवरा हा दिसायला सावळा आहे. तो चांगला दिसत नसल्याच्या कारणावरुन किस करताना पतीच्या जीभेचा लचका तोडल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीतील...

satana
उद्योजक होण्यासाठी कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक वृत्ती आवश्यक

सटाणा : उद्योग क्षेत्रात करिअर करतांना प्रत्येकाने आवडीनुसार उद्योग निवडावा, अन्यथा उद्योग व्यवसायात मन लागत नाही. आवडीप्रमाणे उद्योगात संधी किती...

indapur
युवकांनी नवनवीन शेतीपुरक व्यवसाय सुरु करावेत : आ. भरणे

वालचंदनगर (पुणे) : युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन नवनवीन शेती पुरक व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे...

नांदेड -  लग्नाचे आमिष केला युवतीवर अत्याचार 

नांदेड - ओळखीचा फायदा घेऊन बहिणीच्या दिराने लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर अत्याचार केला. गरोदर राहिल्यानंतर त्याने नकार देताच त्याच्याविरूध्द...