Sections

भाजपने शेपूट घातले असे सेनेने समजू नये: गिरीश महाजन 

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 17 मार्च 2018
girish-mahajan

जळगाव - भारतीय जनता पक्ष आज देशातील क्रमांक एकचा पक्ष आहे. राज्यात आम्ही सत्तेतील मित्र पक्षाच्या मोठ्या भावाच्या भुमिकेत आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेनेला समजून घेत आहोत. याचा अर्थ भाजपने शेपूट घातले शिवसेनेने समजू नये. आगामी निवडणूकीत तुम्ही सोबत असाल तर ठिक अन्यथा भाजप स्वबळावर निवडणूका लढवून सत्तेवर येईल, असा ईशारा भाजपचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला दिला आहे. जळगाव येथे पक्षाच्या खानदेशस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. 

जळगाव - भारतीय जनता पक्ष आज देशातील क्रमांक एकचा पक्ष आहे. राज्यात आम्ही सत्तेतील मित्र पक्षाच्या मोठ्या भावाच्या भुमिकेत आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेनेला समजून घेत आहोत. याचा अर्थ भाजपने शेपूट घातले शिवसेनेने समजू नये. आगामी निवडणूकीत तुम्ही सोबत असाल तर ठिक अन्यथा भाजप स्वबळावर निवडणूका लढवून सत्तेवर येईल, असा ईशारा भाजपचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला दिला आहे. जळगाव येथे पक्षाच्या खानदेशस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. 

भारतीय जनता पक्षाचा 6 एप्रिल रोजी मुंबईत वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पक्षाची खानदेशस्तरीय पदाधिकाऱ्यांची बाबा हरदासराम सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर होते. तर खासदार रक्षा खडसे, ए.टी.पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ उपस्थित होते. प्रास्ताविक आमदार स्मिता वाघ यानी केले. 

यावेळी बोलतांना जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे देशात 21 मुख्यमंत्री आहेत. स्वतंत्र्यानंतर एवढे मुख्यमंत्री असणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. देशात भाजप आज क्रमांक एकचा पक्ष आहे. उत्तर प्रदेशातील दोन पोटनिवडणूका जिंकल्या म्हणून विरोधकांनी हुरळून जावू नये. आम्ही मुख्य निवडणूका जिकंत आहोत हे त्यांनी लक्षात घ्यावे. 

राज्यातील भाजप सरकार यशस्वी ठरल्याचे सागूंन महाजन म्हणाले, काँग्रेसचा काळ आठवा आणि आजचा पहा आज जलयुक्त शिवाराने शेती समृध्द झाली आहे. वीज पूर्णवेळ दिली जात आहे. कापसाला चांगला भाव आहे, तूरडाळ, मका, धान, ज्वारी शासनाने खरेदी करून शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या काळात शेतकरी सुखी आहे, तर रस्त्याच्या विकासही मोठ्या प्रमाणात झाला आहे. आज राज्यात सहा पदरी आणि चार पदरी महामार्ग आहेत. त्यामुळे आमच्या काळात मोठा विकास झाला असल्याचा दावाही त्यांनी केला

Web Title: marathi news jalgaon BJP girish mahajan

टॅग्स

संबंधित बातम्या

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

2ajit_pawar_26.jpg
मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा : अजित पवार 

औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची...

सांगली महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी अजिंक्‍य पाटील निश्‍चित

सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित...

Rs 30000 cr given to man with no skill in making aircraft says Rahul
रिलायंसला कंत्राट देणे हीच कुशल भारताची ओळख- राहुल गांधी

नवी दिल्ली- राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. आता त्यांनी...

छत्तीसगडमध्ये रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण होणार : अर्थमंत्री

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील कथगोरापासून दोंगरग्रहपर्यंत रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. छत्तीसगड सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये करार होणार असून...