Sections

बॅंकांच्या सलग सुट्यांमुळे ग्राहकांची धावपळ!

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 28 एप्रिल 2018
live photo

जळगाव ः चार दिवसांच्या सलग सुट्या आल्याने बॅंकांमधील आर्थिक व्यवहारांना ब्रेक लागणार असल्याचे चित्र आहे. शिवाय सलग चार दिवसांच्या सुटीमुळे बॅंकेचे व्यवहार देखील ठप्प होणार आहेत. यातच बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्याने चार दिवसांच्या सुटीत बॅंक ग्राहकांची प्रचंड धावपळ उडणार आहे. परिणामी आजच बॅंकांमध्ये दिवसभर गर्दी होती. 

जळगाव ः चार दिवसांच्या सलग सुट्या आल्याने बॅंकांमधील आर्थिक व्यवहारांना ब्रेक लागणार असल्याचे चित्र आहे. शिवाय सलग चार दिवसांच्या सुटीमुळे बॅंकेचे व्यवहार देखील ठप्प होणार आहेत. यातच बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्याने चार दिवसांच्या सुटीत बॅंक ग्राहकांची प्रचंड धावपळ उडणार आहे. परिणामी आजच बॅंकांमध्ये दिवसभर गर्दी होती.  आर्थिक वर्षातील शेवटचा मार्च महिना संपला असून, एप्रिलमध्ये देखील याचे कामकाज साधारण पंधरा दिवसांपर्यंत सुरू होते. यामुळे सर्वच शासकीय-निमशासकीय कार्यालये तसेच बॅंका, पतसंस्थांचे आर्थिक वर्षातील जमाखर्चाचा हिशोब करण्याची काम सुरू असतात. दरम्यान गेल्या पंधरा- वीस दिवसांपासून सर्वच बॅंकांच्या एटीएम मशिनमध्ये पैशांचा खडखडाट आहे. यामुळे नागरिकांना रक्‍कम काढण्यासाठी बॅंकांमध्येच जावे लागत होते. यातच आता चार दिवसांच्या सुट्या आल्याने आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता अनेकांनी बॅंकांमध्ये जाऊन आपले आर्थिक व्यवहार करण्यावर आज भर दिला होता. 

बॅंकांमध्ये दिवसभर रांगा  सलग चार शासकीय सुट्या आल्याने बॅंक ग्राहकांची पंचाईत झाली आहे. बॅंकांना 28 एप्रिलला दुसरा शनिवार, 29 एप्रिलला रविवार, 30 एप्रिलला बुद्धपौर्णिमा आणि 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने सुटी आहे. यामुळे पुढील चार दिवसांच्या सुटीमुळे बॅंकांमधील आर्थिक व्यवहार बंद राहणार असल्याने आज सर्वच बॅंकांमध्ये दिवसभर रांगा लागलेल्या होत्या. अनेक ग्राहकांनी कॅश काढणे, चेक जमा करणे, पैसे जमा करण्याचे काम करण्यासाठी सकाळपासून गर्दी होती. तर मू. जे. महाविद्यालयातील महाराष्ट्र बॅंकेत चलन भरणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी रांग लागलेली होती. 

"एटीएम'च्या आधाराची शक्‍यता  बॅंकांना सलग सुट्या आल्यानंतर ग्राहकांची अडचण होऊ नये; यासाठी एटीएममध्ये सुटीच्या कालावधीत पुरेल इतकी रक्‍कम बॅंकांकडून ठेवलेली असते. परंतु, गेल्या पंधरा- वीस दिवसांपासूनच "एटीएम'मध्ये कॅशचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे ग्राहकांना एटीएमच्या शोधात फिरावे लागत होते. काहींनी तर बॅंकेत जाऊनच रक्‍कम काढण्याचे काम केले होते. या साऱ्या परिस्थितीमुळे पुढच्या चार दिवसांच्या सुटीत बॅंक ग्राहकांना "एटीएम'चा किती आधार राहणार? याबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

Web Title: marathi news jalgaon bank hollyday

टॅग्स

संबंधित बातम्या

pathak
राज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : विश्वास पाठक

परभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी...

बंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र 

जळगाव : आदर्शनगरातील "प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...

trupti desai
तृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले

कोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...

ग्राहकाचे पैसे सव्याज परत करा;महारेराचा डीएसकेंना आदेश 

पुणे - करारात ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही सदनिकेचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी संबंधित ग्राहकाला एका महिन्याच्या आत...

maratha kranti morcha
मराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)

राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...

muktapeeth
घरचे कार्य! (ढिंग टांग)

गेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...