Sections

भडगाव तालुक्यातील 22 गावे हागणदारी मुक्त 

सुधाकर पाटील |   गुरुवार, 15 मार्च 2018
toilet

तालुक्यातील 22 गावे ही हागणदारी मुक्त म्हणून घोषित झाले आहेत. उर्वरित गावेही 31 मार्च हागणदारी मुक्त होतील. त्यामुळे संपुर्ण तालुकाच ओडीएफ होईल. ग्रामस्थांनी बांधलेल्या शौचालयाचा नियमित वापर करावा 
- दिपाली कोतवाल गटविकास अधिकारी  भडगाव

भडगाव : भडगाव तालुकाही शंभर टक्के हागणदारी मुक्ततेच्या दिशेने वाटचाल करत आहे. आतापर्यंत 22 गावे हागणदारी मुक्त म्हणून घोषित झाले आहेत. तर उर्वरित 27 गावेही 31 मार्च पर्यंत हागणदारीमुक्त होतील असे पंचायत समिती प्रशासनाकडुन सांगण्यात आले. तर यापुर्विच भडगाव शहर हागणदारी मुक्त झाले आहे.

भडगाव तालुक्यात एकुण 49 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी तब्बल 22 गावांची त्रयस्थ समितीने पाहणी करून हागणदारी मुक्त म्हणून घोषित केले आहे. तर उर्वरित 27 ग्रामपंचायतीही मार्च अखेर पर्यंत संपुर्ण हागणदारी मुक्त होण्याची चिन्हे आहेत. गेल्या पाच वर्षात तालुक्यात 15 वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले आहेत. त्यामुळे तालुका स्वच्छतेकडे वाटचाल करतांना दिसत आहे. 

5 वर्षात 15147 शौचालय बांधले  भडगाव तालुक्यात  2012 मधे झालेल्या सर्वेक्षणात 15 हजार 501 कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे निर्दशनास आले होते. त्यानुसार स्वच्छ भारत  अभियान व रोजगार हमी योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षात तब्बल 15 हजार 147 कुटुंबाकडे शौचालय बांधण्यात आले. 2017-18 यावर्षात  तब्बल 9 हजार 507 वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले आहेत. 354 कुटुंब हे स्थलांतरीत असल्याने त्यांच्याकडे  शौचालय बांधता आले नाही.

22 गावे झाले हाघणदारी मुक्त! आतापर्यंत तालुक्यातील 22 ग्रामपंचायती या शंभर टक्के हाघणदारी मुक्त म्हणून घोषित झाले आहेत. त्यात आडळसे, भोरटेक बु., शिवणी, बाळद, बांबरूड प्र.ब., भट्टगाव, मांडकी, वरखेड, वाक, तांदुळवाडि, सावदे, पासर्डी, पाढंरद, लोण प्र.ऊ. , लोणपिराचे, मळगाव, गोंडगाव, घुसर्डी, बोरनार, अंजनविहीरे, अंतुर्लि, बोदर्डे या गावांचा समावेश आहे.  या गावांची त्रयस्थ समितीने तपासणी केल्यानंतर ही गावे हागणदारी मुक्त म्हणून घोषित झाले. अद्याप 27 गावे ही तपासणीचे बाकी आहे. 

शौचालयासाठी 12 हजार अनुदान  शौचालय बांधण्यासाठि  भारत  स्वच्छ अभियानांतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 12 हजाराचे अनुदान देण्यात आले आहे. तर काही शौचालय ही रोजगार हमी योजना अंतर्गत ही बांधण्यात आले आहेत. तालुक्यातील शौचालयाचे अनुदानापोटी  शासनाकडे पंचायत समिती कडुन  तिन कोटीची मागणी करण्यात आली आहे.

आता वापराबाबत जनजागृती व्हावी तालुक्यात आतापर्यंत 22 गावे शंभर टक्के हाघणदारी मुक्त झाले आहेत. उर्वरित गावे ही मार्च अखेरपर्यंत हागणदारी मुक्त होणार आहे. त्यामुळे आता या शौचालयाचा  वापराबाबत जनजागृती करावी लागणार आहे. अंगणवाडी, जि.प. शाळा मधे  शौचालय आहेत पण त्यांचा वापर होतांना दिसत नाही. अर्थात शौचालयासाठी आवश्यक असलेले अतिरीक्त  पाणीही लोकांना उपलब्ध मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.  

वर्षनिहाय बांधण्यात आलेले स्वच्छतागृह  वर्ष...............बांधण्यात आलेले शौचालय     2013-14.........129 2014-15.........795 2015-16.........1649 2016-17.........3067 2017-18.........9507

तालुक्यातील 22 गावे ही हागणदारी मुक्त म्हणून घोषित झाले आहेत. उर्वरित गावेही 31 मार्च हागणदारी मुक्त होतील. त्यामुळे संपुर्ण तालुकाच ओडीएफ होईल. ग्रामस्थांनी बांधलेल्या शौचालयाचा नियमित वापर करावा - दिपाली कोतवाल गटविकास अधिकारी  भडगाव

Web Title: Marathi news Dhule news toilet free

टॅग्स

संबंधित बातम्या

Goa Minister Rane challenged Chotonkar
गोव्यात मंत्री राणेंचे चोडणकरांना आव्हान

पणजी- गोव्यात विकल्या जाणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलिनचा अंश अद्यापही आढळत असल्याची टीका गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. ही टीका...

स्वच्छ भारत मोहिमे अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानक स्वच्छता मोहीम

कल्याण : महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती निमित्त रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या स्वच्छता हीच सेवा - पंधरवडा अंतर्गत ...

tanker
शेटफळे प्रादेशिक योजना बंद, भीषण पाणी टंचाई

आटपाडी - शेटफळे प्रादेशिक योजना बंद झाल्यामुळे शेटफळेत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून काहीनी एकत्र येऊन...

Rahul Gandhi
मोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी

नवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...

vidarbha
एटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले

एटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन...