Sections

धर्मा पाटलांसह मुलाच्या बँक खात्यात 48 लाख जमा 

निखिल सूर्यवंशी |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Dharma Patil

धर्मा पाटलांची तक्रार काय? 
शेतकरी धर्मा पाटील यांची विखरण (ता. शिंदखेडा, जि. धुळे) गटात 1.4 हेक्‍टर आणि नरेंद्र धर्मा पाटील यांची एक हेक्‍टर जमीन आहे. दोंडाईचा- विखरण परिसरात 2009 ला प्रस्तावित औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांतर्गत अशा एकूण पाच एकर क्षेत्रात आंब्याची 648 झाडे असूनही योग्य मोबदला मिळाला नाही. लगतच्या शेतकऱ्याचे क्षेत्र 74 आर असताना त्याला एक कोटी 89 लाखांचा मोबदला आणि पाच एकरसाठी मला चार लाखांचा मोबदला मिळाला. हा अन्याय असल्याचे सांगत धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले. त्यांच्या मृत्यूनंतर "महाजनको'कडून देय सानुग्रह अनुदान नाकारत नरेंद्र धर्मा पाटील यांनी आमच्या शेतातील 648 आंब्याच्या झाडांचा मोबदला मिळावा, अशी मागणी लावून धरली. 
 

धुळे : भूसंपादनातील फळबागेच्या मोबदला प्रश्‍नी मंत्रालयात 22 जानेवारीला विष प्राशनातून आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा मंगा पाटील आणि नरेंद्र धर्मा पाटील यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी सरासरी 24 लाखांप्रमाणे एकूण 48 लाखांचा निधी "महाजनको'ने वर्ग केला. शेतकरी पितापुत्राला पाच एकर जमिनीच्या मोबदल्याविषयी सानुग्रह अनुदानाव्दारे हा लाभ दिला गेला आहे. 

धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर 30 दिवसांत नियमानुसार न्यायदान केले जाईल, असे हमी पत्र ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नरेंद्र पाटील यांना दिले होते. ही मुदत 3 मार्चला संपुष्टात येत आहे. 

फळबागेचा विचार नाही  या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने धर्मा पाटील, नरेंद्र धर्मा पाटील यांना एकूण 648 आंब्याच्या रोपांसाठी पाच लाख 88 हजार 378 आणि प्रति एकरी सहा लाखांच्या सानुग्रह अनुदानापोटी 48 लाख 59 हजार 754, असा एकंदर 54 लाख 48 हजार 132 रुपयांचा मोबदला देय होऊ शकतो; त्यांना पूर्वी चार लाख तीन हजार 445 रुपयांचा मोबदला अदा झाला असल्याने तो वगळता नव्याने 50 लाख 44 हजार 687 रुपयांचा मोबदला देता येऊ शकेल, असे अहवालात नमूद केले. त्याआधारे "महाजनको'ने जमिनीपोटी सानुग्रह अनुदान म्हणून सुमारे 48 लाखांचा निधी धर्मा पाटील, नरेंद्र पाटील यांच्या बॅंक खात्यात वर्ग केला. धर्मा पाटील यांच्या दोंडाईचा येथील बॅंक खात्यात 24 लाखांचा निधी वर्ग करताना तो त्यांच्या वारसांना दिला जावा, अशी सूचना आहे. नरेंद्र पाटील यांच्या सुरत येथील बॅंक खात्यात 24 लाखांचा निधी वर्ग केला. पाटील पितापुत्राच्या आंब्याच्या झाडांविषयीची मागणी "महाजनको'सह शासनाने विचारात घेतली नसल्याचे या निर्णयातून दिसून येते. 

धर्मा पाटलांची तक्रार काय?  शेतकरी धर्मा पाटील यांची विखरण (ता. शिंदखेडा, जि. धुळे) गटात 1.4 हेक्‍टर आणि नरेंद्र धर्मा पाटील यांची एक हेक्‍टर जमीन आहे. दोंडाईचा- विखरण परिसरात 2009 ला प्रस्तावित औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांतर्गत अशा एकूण पाच एकर क्षेत्रात आंब्याची 648 झाडे असूनही योग्य मोबदला मिळाला नाही. लगतच्या शेतकऱ्याचे क्षेत्र 74 आर असताना त्याला एक कोटी 89 लाखांचा मोबदला आणि पाच एकरसाठी मला चार लाखांचा मोबदला मिळाला. हा अन्याय असल्याचे सांगत धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले. त्यांच्या मृत्यूनंतर "महाजनको'कडून देय सानुग्रह अनुदान नाकारत नरेंद्र धर्मा पाटील यांनी आमच्या शेतातील 648 आंब्याच्या झाडांचा मोबदला मिळावा, अशी मागणी लावून धरली. 

महसूल, कृषी विभाग अलिप्त  धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर यंत्रणेने घेतलेली भूमिका अशी ः औष्णिक ऊर्जा प्रकल्पांतर्गत भूसंपादन अधिकाऱ्यांनी 2015 मध्ये निवाडा जाहीर केला. नंतर फेरमूल्यांकन करता येत नाही. निवाड्याला आव्हान द्यायचे असेल तर तो जाहीर झाल्यानंतर आठवड्याभरात दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागते. या तरतुदीनुसार धर्मा पाटील किंवा 138 शेतकरी न्यायालयात गेले नाहीत, असे महसूल विभागाने सांगितले. त्यांच्या शेतात सद्यःस्थितीत आंब्याची रोपे, झाडे नसल्याने फेरमूल्यांकन करता येणार नाही, असा अहवाल कृषी विभागाने दिला. मोबदल्याच्या वादातून औष्णिक ऊर्जा प्रकल्प रद्द झाल्यावर त्याजागी नियोजीत सौर ऊर्जा प्रकल्प "महाजनको'चा व त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी लागत असल्याने धर्मा पाटील, नरेंद्र पाटील यांना वाढीव मोबदला हा विभाग देऊ शकतो, असे म्हणत नियमांसह तरतुदीतील अडचणी पुढे करत कृषी, महसूल विभाग या प्रकरणापासून अलिप्त राहिला. 

138 शेतकऱ्यांचा प्रश्‍न, अनुदान  भूसंपादनातील वादामुळे 3300 मेगावॉटचा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प रद्दबातल झाला. त्याऐवजी दोंडाईचा- विखरण परिसरात सोलर पार्क प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 675 हेक्‍टर 32 आर क्षेत्र संपादित करण्याचा निर्णय झाला. पैकी "महाजनको'ने 476.5 हेक्‍टर क्षेत्र संबंधित शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केले. त्यासाठी सुमारे 48 कोटींचा मोबदला देण्यात आला. संबंधित शेतकऱ्यांना 2012 मध्ये प्रती हेक्‍टर दहा लाख रुपयांप्रमाणे मोबदला वाटप झाला. मात्र, असा मिळणारा मोबदला असमाधानकारक असल्याचे सांगत शासनाने उर्वरित संपादित केलेल्या 199 हेक्‍टर 27 आर क्षेत्रातील 138 शेतकऱ्यांनी मोबदला स्वीकारण्यास नकार दिला. त्यात शेतकरी (कै.) धर्मा पाटील यांचा समावेश होता. 138 पैकी पाच शेतकऱ्यांनी मोबदला स्वीकारला असून धर्मा पाटील यांना जमीनीपोटी दोन लाख 18 हजार 617, तर लिंब, बोर, शेवगासाठी 18 हजार 845 रुपयांचा, असा एकूण दोन लाख 18 हजार 617, तर नरेंद्र धर्मा पाटील यांना एक लाख 84 हजार 828, असा दोघांना मिळून सरासरी पाच एकरासाठी एकंदर चार लाख तीन हजार 445 रुपयांचा मोबदला अदा झाला आहे. धर्मा पाटील यांच्या विष प्राशनानंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 24 जानेवारीच्या बैठकीत 138 शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदानात कोरडवाहू जमिनीसाठी जो मोबदला दिला जाईल, त्यापेक्षा दीडपट मोबदला हंगामी बागाईतदारांसाठी, तर दुप्पट मोबदला बागाईतदार शेतकऱ्यांना देण्याचा, तसेच पहिल्या खरेदीच्या दिनांकापासून आतापर्यंत या रक्कमेवर व्याजही देण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: Marathi news Dhule news Dharma patil land

टॅग्स

संबंधित बातम्या

राज्यात प्रथमच पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र पोलिसिंग

पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला....

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे दुष्काळी भागातील नागरीकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील.
पाणी, चारा नसल्याने जनावरांना कसे संभाळायचे? (व्हिडिओ)

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): साहेब, पिण्यासाठी पाणी नाही, चारा नसल्य़ाने जनावरांना कसे संभाळायचे यांची चिंता, दु्ष्काळी परीस्थीतीत हाताला काम मिळणे...

44crime_logo_525_1.jpg
शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्‍टरवर गुन्हा 

पिंपरी : शरीर सुखाची मागणी मान्य न केल्यास एका 36 वर्षीय महिलेला बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्‍टराच्या...

Chandrakant Patil
मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील

फुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...

BHIDE-PUL.jpg
बाबा भिडे पुलावरील वाढलेले गवत, कचरा कधी काढणार?

पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन...