Sections

नाशिकच्या जवानांची सायकल मोहीम नागपुरात दाखल

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
live photo

नाशिक : "वाहतूक सुरक्षितता आणि आरोग्या'चा संदेश देण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आणि हवाई दलाच्या जवानांची सायकल मोहीम पाच दिवसांच्या प्रवासानंतर नागपूरात दाखल झाली. 
नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशन, पोलीस अधिक्षक शैलेश बालवडकर, हवाईदलाचे एअर व्हाईस मार्शल मानवेंद्र सिंग यांनी जवानांचे स्वागत केले. प्रवासादरम्यान, जवानांनी शाळा-महाविद्यालयांत वाहतूक सुरक्षितता आणि हवाईदलातील संधी याविषयी मार्गदर्शन करीत नागपूर गाठले. 12 जणांचा चमू उद्या (ता.28) सकाळी नाशिकला परतीच्या वाटेवर निघणार आहे. 

नाशिक : "वाहतूक सुरक्षितता आणि आरोग्या'चा संदेश देण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आणि हवाई दलाच्या जवानांची सायकल मोहीम पाच दिवसांच्या प्रवासानंतर नागपूरात दाखल झाली.  नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशन, पोलीस अधिक्षक शैलेश बालवडकर, हवाईदलाचे एअर व्हाईस मार्शल मानवेंद्र सिंग यांनी जवानांचे स्वागत केले. प्रवासादरम्यान, जवानांनी शाळा-महाविद्यालयांत वाहतूक सुरक्षितता आणि हवाईदलातील संधी याविषयी मार्गदर्शन करीत नागपूर गाठले. 12 जणांचा चमू उद्या (ता.28) सकाळी नाशिकला परतीच्या वाटेवर निघणार आहे. 

 नाशिक पोलीस आयुक्तालयातून गेल्या गुरुवारी (ता.22) सकाळी सहा पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि हवाईदलाचे सहा जवान सायकलीवरून नागपूरच्या दिशेने निघाले होते. पाच दिवसांमध्ये या 12 जवानांच्या चमूने 780 कि.मी. अंतर सायकलने कापत नागपूर गाठले. वाटेमध्ये चांदवड येथील नेमीनाथ जैन शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षिततेचा संदेश दिला तसेच, वायुदलातील संधीविषयी मार्गदर्शन केले. धुळ्यात पहिला मुक्काम केल्यानंतर पहाटे धुळ्याचे पोलीस अधीक्षक रामकुमार यांनीही 25 कि.मी.अंतरापर्यंत जवानासंगे सायकल रॅली केली. भुसावळमार्गे शेगावात मुक्काम केला असता, त्यावेळी तेथे जमलेल्या भाविकांनाही मार्गदर्शन केले. पुढे अमरावतीमध्ये गेल्यानंतर तेथील एसआरपीएफला भेट देऊन तेथील जवानांनाही मार्गदर्शन केले. अकोल्यात मुक्काम केल्यानंतर जवानांनी सोमवारी (ता.26) सायंकाळी नागपूर गाठले. 

जवानांनी नागपूरातील वायुदलाच्या मुख्यालयास भेट दिली असता, हवाईदलाचे एअर व्हाईल मार्शल मानवेंद्र सिंग यांनी स्वागत केले. त्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशन्‌, पोलीस अधीक्षक शैलेश बालवडकर यांनीही जवानांचे स्वागत करीत कौतूक केले. हा चमू उद्या (ता.28) सकाळी सहाला यवतमाळच्या दिशेने नाशिककडे परतीच्या मार्गावर मार्गस्थ होणार आहेत. या संघात नाशिक पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, हवालदार नंदू उगले, बाळकृष्ण वेताळ, सुदाम सांगळे, दिनेश माळी, किरण वडजे, हर्षल बोरसे, एम.के. धुम, फुलचंद पवार तर वायु दलाचे स्कॉड्रन लिडर संतोष दुबे, फ्लाईंग लेफ्टनंट सुमीत, ज्युनिअर वॉरंट अधिकारी नितीन पाटील, सार्जंट संजय, कॉर्पोरल समीउल्ला, एस.ए. जाधव, रवींदर, धीरज, सुमीत, मनजीत यांचा समावेश आहे. 

Web Title: marathi news cycle rally in nagpur

टॅग्स

संबंधित बातम्या

sangamner
संगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी

संगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...

नाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण

खामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...

पतंग उडवताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

जेलरोड : पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...

Former Mayor of the Ahmednagar city Sandeep Kotkar arrested
नगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना अटक

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर यांना काल (सोमवार) नाशिक कारागृहातून ताब्यात घेत अटक केली....

सरकारचे शेवटचे वर्ष उजाडले तरी भूसंपादनाचीच चर्चा

नाशिक - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनावरच अजूनही चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. १४) सहव्यवस्थापकीय...

वाढीव गुण पदरी पाडण्यासाठीच्या प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ

येवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा...