Sections

लग्नातील अवास्तव खर्चाला फाटा देण्याचा आदिवासी बांधवाचा निर्णय

नरेंद्र जोशी |   सोमवार, 5 मार्च 2018
residentional photo

नाशिक : बागलाण तालुक्‍यातील चाफ्याचा पाडा या आदिवासी बहुल गावाने लग्नातील लाखो रुपयांच्या अवास्तव खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी समाज आता बदलाच्या दिशेने निघाला आहे. सत्कार, बॅण्ड या पुढे बंद करण्याचा ठराव करण्यात आला आहे.

नाशिक : बागलाण तालुक्‍यातील चाफ्याचा पाडा या आदिवासी बहुल गावाने लग्नातील लाखो रुपयांच्या अवास्तव खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी समाज आता बदलाच्या दिशेने निघाला आहे. सत्कार, बॅण्ड या पुढे बंद करण्याचा ठराव करण्यात आला आहे. आदिवासी भागात विशेषता भिल्ल समाजात लग्न समारंभ म्हटला की मोठ्या थाटमाटातच साजरा करण्याची रित आहे. कितीही गरीबी असली तरी सावकारांकडून कर्ज घेऊन लग्न थाटामाटातच साजरे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याने अनेक जण कायमचे कर्ज बाजारी होतात. बॅण्ड, आहेर, सत्कार,दारु व हुंडा यावर लाखोचा खर्च करण्यासाठी ते शेती तरी विकतात किंवा सावकारकडुन कर्ज तरी घेतात. भिल्ल समाज तर यात कर्जबाजारी होऊन लग्नानंतर तब्बल 15 वर्ष वधुपित्याला दुसऱ्याच्या शेतात राबण्या शिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळेच ही प्रथाच बंद व्हावी. असा प्रयत्न काही समाज धुरींणांनी केला. आणि गावानेही साथ देण्याचे ठरवून आता गावात ही प्रथाच बंद करण्याचे गेल्या शुक्रवारी ( ता.2)ठरविण्यात आले. चाफ्याचा पाडा येथील तरुण व गावकऱ्यांनी  एकमुखाने हा निर्णय घेतला. 

 आता गावात आहेर, बॅण्ड, दारु, सत्कार, हुंडा बंदी केली आहे, लग्नात अक्षदां एैवजी फुले टाकली जातील. सत्कारा एैवजी गांधी टोपी घातली जाईल. भोजनासाठी पानांची पत्रावळ वापरली जाईल. दर वर्षी गावात पंधरा ते वीस लग्न होतात. प्रत्येताचा लाखो रुपये खर्च होतो. आता मात्र संरपंच भास्कर गांगुर्डे, वसंत चौरे, पुंडलीक सुर्यवंशी, सुक्रम गांगुर्डे, संजय गांगुर्डे, निंबा गावीत, वसंत गांगुर्डे, बारुक गावीत, रमेश सुर्यवंशी, नागु गांगुर्डे, शाताराम गावीत यांनी ही चळवळ यशस्वी केल्याने लाखोची बचत होणार आहे.   

Web Title: marathi news adhivasi people marriage

टॅग्स

संबंधित बातम्या

muktapeeth
घरचे कार्य! (ढिंग टांग)

गेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...

लग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या 

औरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...

असा झाला दीप-वीर लग्नसोहळा !

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने...

स्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या

शेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...

Sugar-Factory
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला राज्य बँकेचा दिलासा

मुंबई - साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे पैसे देता यावेत, यासाठी कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जावरील दुरावा येत्या ३१ मार्चपर्यंत १५...

suicide
कर्जामुळे दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. या प्रकरणी माळाकोळी व शिवाजीनगर पोलिस...