Sections

अकरावीच्या तीन महाविद्यालयांना ऑनलाईनमधून  वगळले

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 4 एप्रिल 2018
residentional photo

नाशिक : या शैक्षणिक (2018-19) वर्षातील अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत कॅन्टोमेंट हद्दीतील तीन महाविद्यालयांना वगळण्यात आले आहे. 

 रावसाहेब थोरात सभागृहात महापालिका हद्दीतील माध्यामिक शाळांच्या सर्व मुख्यध्यापक आणि कनिष्ठ लिपिकांना प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापकांच्या बैठकीस सहाय्यक संचालक दिलीप गोविंद, माध्यामिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनीता धनगर, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अशोक बागूल, प्रा. वैभव सरोदे, आर.बी. पाटील आदी उपस्थित होते. 

नाशिक : या शैक्षणिक (2018-19) वर्षातील अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत कॅन्टोमेंट हद्दीतील तीन महाविद्यालयांना वगळण्यात आले आहे. 

 रावसाहेब थोरात सभागृहात महापालिका हद्दीतील माध्यामिक शाळांच्या सर्व मुख्यध्यापक आणि कनिष्ठ लिपिकांना प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापकांच्या बैठकीस सहाय्यक संचालक दिलीप गोविंद, माध्यामिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनीता धनगर, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अशोक बागूल, प्रा. वैभव सरोदे, आर.बी. पाटील आदी उपस्थित होते. 

गेल्या वर्षीप्रमाणे चालू वर्षी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी मनपा हद्दीतील माध्यामिक शाळेच्या मुख्यध्यापक यांना प्रवेशासंदर्भात संपूर्ण माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व शिक्षण उपसंचालक विभागामार्फत देण्यात आली. यंदा ऑनलाईन अर्जाचे दोन टप्पे असून पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची प्राथमिक संपूर्ण माहिती ही शाळेतील शिक्षकांमार्फेत बिनचूक भरण्यात यावी. जेणेकरून त्याला प्रवेशासाठी अडचण येणार नाही. यासाठी 12 एप्रिलपर्यंत पालक आणि विद्यार्थ्यांची प्रत्येक शाळेतील मुख्यध्यापक यांनी बैठक बोलावून संपूर्ण माहिती द्यावी. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता देखील घ्यावी अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या. चालूवर्षी मनपा हद्दीतील सुमारे 47 महाविद्यालये या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होत आहे. 

पाच विभागांमध्ये महाविद्यालयाची वर्गवारी  अकरावी प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून विभागामार्फेत शहरातील महाविद्यालयांची पाच विभागात वर्गवारी करून देण्यात आली असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या भागातील महाविद्यालयाची माहिती करून द्यावी. जेणेकरून महाविद्यालयांची निवड करताना विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाही. विभागानुसार विद्यार्थ्यांना मदतकेंद्र म्हणून महाविद्यालये देखील निवडली गेली असून त्याठिकाणी समन्वयक म्हणून शिक्षकांची निवड देखील करण्यात आली आहे. 

अकरावी प्रवेशासंदर्भात मुलींना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी एसएमआरके महाविद्यालयात स्वतंत्र मदतकेंद्र देखील तयार करण्यात येणार आहे. राज्याबाहेरून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयामध्ये मदतकेंद्र तयार करण्यात येणार आहे. 

तीन महाविद्यालये ऑनलाईनमधून वगळली  चालू शैक्षणिक वर्षामध्ये देवळाली कॅन्टोंमेंट बोर्डाच्या हद्दीतील डॉ. सुभाष गुजर हायस्कुल, नुतन विद्यालय आणि भाटिका महाविद्यालय हे वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एसएमआरकेच्या गृहविज्ञान विभागाचे आणि हिंदी माध्यामिक विद्यालयाचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने होतील. 

Web Title: MARATHI NEWS 11 ADMISSION

टॅग्स

संबंधित बातम्या

ANANT JOSHI
नगररचना'ला टाळे ठोकणाऱ्या सेना नगरसेवकावर गुन्हा 

जळगाव ः महापालिकेच्या नगररचना विभागातील गैरकारभाराविरोधात थेट पालिका इमारतीत पोहचून नगररचना विभागाला टाळे ठोकण्याचा प्रकार शिवसेना नगरसेवकाच्या...

mitha.jpg
रेशन दुकानात मिळणार मिठ

पुणे : रेशन दुकानातून आता मीठ विक्री सुरु करण्यात आली आहे. मिठामुळे शरिरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होऊन पुरुषाबरोबरच महिलाही अधिक सशक्त होण्यासाठी...

One school going girls death because of dengue in purna parbhani
डेंग्यूने शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू

पूर्णा (जि. परभणी) : डेंग्यूची लागण होऊन शाळकरी विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नगरपालिका व आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराबद्दल...

MNP nashik
महापौरांच्या घरात आयुक्त मुंडे यांच्यावरुन बंद दाराआड शाब्दिक चकमक (व्हिडिओ)

नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून सत्ताधारी भाजपची झालेली कोंडी व गेल्याकाही दिवसांपासून करवाढीवरून सुरू असलेला वाद...

Indapur gets water from Khadakvasala
इंदापूरला मिळणार खडकवासलाचे पाणी

कळस - खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्याला शेती सिंचनासाठी उद्या (मंगळवारी, ता. 18) दुपारपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. याचा फायदा तालुक्यातील...