Sections

खवा व्यवसायातून शेतकऱ्याने साधली प्रगती 

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 21 एप्रिल 2018
khava

खामगाव : शेती परवडत नाही, असे रडगाणे गात न बसता शेतीला खवा निर्मितीचा जोडधंदा भेंडवळ येथील शेतकरी सारंगधर वाघ यांनी सुरू केला. खवा विक्रीच्या व्यवसायातून या शेतकऱ्याने प्रगती साधली. हा शेतकऱ्यांसमोर एक आदर्श आहे. 

खामगाव : शेती परवडत नाही, असे रडगाणे गात न बसता शेतीला खवा निर्मितीचा जोडधंदा भेंडवळ येथील शेतकरी सारंगधर वाघ यांनी सुरू केला. खवा विक्रीच्या व्यवसायातून या शेतकऱ्याने प्रगती साधली. हा शेतकऱ्यांसमोर एक आदर्श आहे. 

जळगाव जामोद तालुक्‍यातील भेंडवळ हे गाव तसे घटमांडणीसाठी प्रसिध्द आहे. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र गेल्या काही वर्षात अपुऱ्या पाऊसमानामुळे शेती पिकत नाही. असे असले तरी खचून न जाता येथील सारंगधर वाघ यांनी शेतीला जोडधंदा म्हणून खवा निर्मिती व विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांनी जवळपास चार ते पाच लाख रूपयांची गुतवणूक केली. त्यांचा आता या व्यवसायात चांगलाच जम बसला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने जोडधंदा करावा, असे सारंगधर वाघ सांगतात. खवा व्यवसाय शक्‍य नसेल तर म्हशी घ्याव्यात. चांगल्या प्रतिचे दूध ४० रूपये लिटर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुधाचा व्यवयाय केल्यास त्याला चांगले उत्पन्न मिळेत सोबतच शेतीसाठी शेणखत तयार होईल व रासायनीक खतांचा वापर कमी होवून जमीनीची सुपिकता वाढेल, असेही ते म्हणाले. 

सात वर्षापासून खवा उद्योग  सुरूवातीस सारंगधर वाघ यांनी दुध विक्रीचा व्यवसाय केला. नंतर त्यांनी खवा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. वाघ कुटुंबातील सर्वच सदस्य खवा निर्मितीसाठी मेहनत करतात. शेती सांभाळून हा उद्योग ते करतात. सात वर्षापासून वाघ कुटुंब हा व्यवसाय करत आहेत. 

दररोज दिड क्‍विंटल खवा  सारंगधर वाघ हे परिसरातील शेतकऱ्यांकडून दररोज ८०० लिटर दुध खरेदी करतात. त्यापासून एक क्‍विंटल ६० किलो खवा तयार होतो. हा खवा ते नांदुरा येथील व्यापाऱ्यांना विकतात. या व्यवसायातून दरमहा २५ ते ३० हजार रूपये नफा मिळतो, असे त्यांनी सांगीतले. 

Web Title: khava business makes development of farmer

टॅग्स

संबंधित बातम्या

mangal wedha
शेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली : समाधान आवताडे

मंगळवेढा  : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने...

crime
शेतीच्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना शिक्षा

औरंगाबाद : शेतीच्या वादातून शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एम. चव्हाण यांनी दोषी ठरवून तीन महिण्याची...

sex_racket
नागपुरातील देहव्यापार 100 कोटींवर! 

नागपूर : रशिया, इटली, इंग्लंड, पाकिस्तान, उज्बेकिस्तान, बांगलादेश, आणि श्रीलंका या देशातील ललनांना "सेक्‍स रॅकेट' अंतर्गत मुंबई-दिल्लीत आणल्या...

हॉकर्सच्या जप्त साहित्याची परस्पर विक्री 

जळगाव ः शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाने हॉकर्सचे लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले. परंतु या साहित्याची...

हिंगोली - दर्शन रांगेत भाविकांची गर्दी.
मोदकोत्सवानिमित्त जणू यात्रा!

हिंगोली - शहरात विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या मोदकोत्सवासाठी रविवारी (ता. २३) राज्यातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी...