Sections

चाळीसगावमध्ये भूगर्भात "हायड्रोकार्बन'चे साठे ?

दीपक कच्छवा |   शुक्रवार, 20 एप्रिल 2018
chalisgaon

मेहुणबारे (चाळीसगाव) -  देशातील गाळयुक्त खोऱ्यात "हायड्रोकार्बन'चे साठे असल्याची शक्‍यता लक्षात आहे. शासनाच्या "ओएनजीसी' कंपनीतर्फे परिसरात सध्या तपासणी करून "डाटा' संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्‍यातील नऊ गावांमध्ये कालपासून (18 एप्रिल) ही तपासणी होत असून, भूगर्भातील नमुने घेऊन ते तपासणीसाठी लंडनला पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

मेहुणबारे (चाळीसगाव) -  देशातील गाळयुक्त खोऱ्यात "हायड्रोकार्बन'चे साठे असल्याची शक्‍यता लक्षात आहे. शासनाच्या "ओएनजीसी' कंपनीतर्फे परिसरात सध्या तपासणी करून "डाटा' संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्‍यातील नऊ गावांमध्ये कालपासून (18 एप्रिल) ही तपासणी होत असून, भूगर्भातील नमुने घेऊन ते तपासणीसाठी लंडनला पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

तालुक्‍यात हैदराबाद येथील "ओएनजीसी'च्या पथकाने 38 मशिनरीद्वारे तपासणीचे कार्य हाती घेतले आहे. यात तालुक्‍यतील रोहिणी, हातगाव, अंधारी, शिरसगाव, माळशेवगे, पिंपळवाड म्हाळसा, वरखेडे खुर्द, लोंढे आदी गावांमध्ये भूगर्भात "बोअरवेल' करून तपासणी केली जात आहे. वरखेडे येथे तपासणीप्रसंगी आमदार उन्मेष पाटील व तहसीलदार कैलास देवरे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. सध्या पहिल्या टप्यात सर्व्हेक्षण सुरू असल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या तपासणीमुळे परिसरात खनिज तेलाचे साठे आढळून येत असल्याची अफवा देखील पसरली होती. 

नमुने लंडनला पाठविणार  चाळीसगाव तालुक्‍यात ज्या गावामध्ये भूगर्भातील तपासणी करण्यात येत आहे, त्या ठिकाणी दिवसाला 150 बोअरवेल केले जात आहेत. या बोअरवेलमध्ये "सेन्सर वायर' टाकून त्याचे चार दिवसांनंतर नमुने घेतली जातात. सध्या असे काम महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यात सुरू आहे. हा सर्व "डाटा' संकलित करण्याचे काम "ओएनजीसी' करीत आहे. "डाटा' संकलित करण्यासाठी अंदाजे 650 कोटी एवढा खर्च असल्याचेही प्रशासनाला प्राप्त झालेल्या पत्रात नमुद केले आहे. 

शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ  चाळीसगावात "हायड्रोकार्बन'चे साठे तपासणी दरम्यान लावण्यात येत असलेल्या काही बोअरवेल्सला मोठ्या प्रमाणावर पाणी लागले आहे. तर काही ठिकाणी "बोअरवेल' कोरडे असले तरी बहुतांश ठिकाणी पाणी लागल्याने शेतकऱ्यांना घरबसरल्या या पाण्याचा फायदा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: "Hydrocarbons" in Chalisgaon ?

टॅग्स

संबंधित बातम्या

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे दुष्काळी भागातील नागरीकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील.
पाणी, चारा नसल्याने जनावरांना कसे संभाळायचे? (व्हिडिओ)

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): साहेब, पिण्यासाठी पाणी नाही, चारा नसल्य़ाने जनावरांना कसे संभाळायचे यांची चिंता, दु्ष्काळी परीस्थीतीत हाताला काम मिळणे...

divyang
दिव्यागांनी मिळवला विकास निधीत वाटा

लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची...

15 मुद्यांच्या आधारे सोलापुरातील झेडपी शाळांची तपासणी

सोलापूर- दिवाळीच्या सुटीनंतर यंदाच्या वर्षातील दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (ता. 19) सुरवात होत आहे. सुटीनंतरच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील...

लक्षद्वीपवर पुढील २४ तासांत वादळाची निर्मिती

मुंबई- तामिळनाडूत गज वादळाच्या तडाख्यानंतर नव्या वादळाचे संकेत मिळाले आहे. येत्या चोवीस तासांत लक्षद्वीपवर नवे वादळ तयार होत असल्याचा इशारा...

Chandrakant Patil
मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील

फुलंब्री : संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला मराठा आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरु आहे. मागासवर्ग...