Sections

शेतकऱ्याचा मुलगा झाला डॉक्टरेट

प्रा. भगवान जगदाळे |   शनिवार, 21 एप्रिल 2018
शेतकऱ्याचा मुलगा झाला डॉक्टरेट

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजाच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने हिंदी विषयात पीएच. डी. मिळवून गावातील धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सद्या फैजपूर (जि. जळगाव) येथील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात हिंदी विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या या युवकाचे नाव आहे प्रा. डॉ. विजय एकनाथ सोनजे. प्रा. सोनजे हे येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत..

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजाच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने हिंदी विषयात पीएच. डी. मिळवून गावातील धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सद्या फैजपूर (जि. जळगाव) येथील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात हिंदी विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या या युवकाचे नाव आहे प्रा. डॉ. विजय एकनाथ सोनजे. प्रा. सोनजे हे येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत..

प्रा. विजय सोनजे यांना नुकतीच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावतर्फे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांच्या हस्ते पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांना महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष व मानव्य विद्या शाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. मधु खराटे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. सोनजे यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी महसूल आयुक्त गोविंद मिश्र यांच्या साहित्यावर पीएच.डी.चे संशोधन कार्य पूर्ण केले असून त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाचे शिर्षक 'गोविंद मिश्र का कथासाहित्य : एक अनुशीलन' असे आहे.

शून्यातून विश्व.. प्रा. विजय सोनजे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले असून एका सामान्य शेतकरी परिवारातून 'डॉक्टरेट'पर्यंत त्यांनी मजल मारली आहे. गावातील धनगर समाजात पीएच. डी. मिळवणारे ते पहिलेच प्राध्यापक आहेत. त्यांनी चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत, पाचवी ते दहावी, बारावी व पदवीपर्यंतचे शिक्षण आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातून घेतले आहे. तर पदव्युत्तर शिक्षण नाशिक येथील एचपीटी महाविद्यालयातून घेतले. सन २००६ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची 'नेट' ही पात्रता परीक्षाही ते उत्तीर्ण झाले आहेत. सन २००८ पासून ते फैजपूर येथील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

शाळा-महाविद्यालयात असताना शेतीची कामे करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांसह मार्गदर्शक, स्वतः कार्यरत व शिक्षण घेतलेल्या शाळा-महाविद्यालयांना दिले आहे. निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष डी. एन. पाटील, आदर्श महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र शाह, शालेय समिती अध्यक्ष अजितचंद्र शाह, प्राचार्य डॉ.अशोक खैरनार, मुख्याध्यापक जयंत भामरे, हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय गुरव आदींसह संचालक मंडळ व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: The farmers son had a doctorate

टॅग्स

संबंधित बातम्या

kalas
इंदापुरात पाणी आणण्यासाठी असावी लागते मनगटात ताकद

कळस : इंदापूर तालुक्यात ज्याच्या मनगटात ताकद व अंगात पाणी आहे तोच कालव्याला पाणी आणू शकतो. निष्क्रीय माणूस पाणी आणू शकत नाही. आम्ही केवळ रास्तारोको...

Hyderabad sairat woman marries Dalit, father attacks them & chops off her hand
हैदराबादमध्ये पुन्हा 'सैराट'; नाना नका मारू मला...

हैदराबादः तेलंगणच्या नालगोंडा जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच हैदराबादमध्ये आणखी एक घटना घडली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संतप्त...

India wins the match but fans lose to this cute Pakistani girl
Asia Cup 2018 : सामना एकीकडे अन् सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच

दुबई : आशिया कप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. भारत पाकिस्तान सामना म्हटले की, प्रेक्षकांसाठी...

mangalwedha
कालव्यात पाणीच नसल्याने शेतकऱ्यांचा संताप

मंगळवेढा : उजनी कालव्याच्या लाभक्षेत्रात शेवटच्या टोकावर असलेल्या नंदूर परिसरातील शेतीला उजनीचेच पाणी मिळत नसल्यामुळे कालवा आहे, गावाला पण...

Mahesh Bhatt returns to direction with Sadak 2 daughters Alia and Pooja to star with Sanjay Dutt
महेश भट यांच्या 'सडक 2' मध्ये आलिया भट

मुंबई : 1991 साली बॉलिवूडमध्ये सुपर डुपर हिट ठरलेल्या सडक या चित्रपटाचा सीक्वल 'सडक 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट दिग्दर्शित...