Sections

प्रा. डॉ. सतीश मस्के यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान

प्रा. भगवान जगदाळे |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव प्रा. डॉ. देगांवकर, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर शेंडगे व संपादक रामदास वाघमारे आदींच्या हस्ते राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. सतीश मस्के.

निजामपूर-जैताणे (धुळे) : औरंगाबाद येथील बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवनगौरव सार्वजनिक वाचनालयातर्फे पिंपळनेर (ता. साक्री) येथील कर्मवीर आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख  प्रा. डॉ. सतीश मस्के यांना नुकतेच राज्यस्तरीय 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

निजामपूर-जैताणे (धुळे) : औरंगाबाद येथील बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवनगौरव सार्वजनिक वाचनालयातर्फे पिंपळनेर (ता. साक्री) येथील कर्मवीर आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख  प्रा. डॉ. सतीश मस्के यांना नुकतेच राज्यस्तरीय 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठवाडा महसूल शिक्षण प्रबोधिनी सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव प्रा. डॉ. देगांवकर, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर शेंडगे, संपादक रामदास वाघमारे आदींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी केलेल्या सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.

यापूर्वी डॉ. मस्के यांना चार राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. ते विविध वृत्तपत्रात लेखन करत असून व्याख्यानाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतात. त्यांची दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील विविध चर्चासत्रात त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केलेले आहेत. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग असतो. 'जीवनगौरव' मासिकाचे ते सहसंपादक असून उमवि राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक म्हणूनही ते काम पाहतात. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून व मित्रपरिवाराकडून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

Web Title: dhule news prof dr satish maske jeevan gaurav puraskar

टॅग्स

संबंधित बातम्या

‘पिफ’च्या समारोपात ‘चुंबक’चा गौरव

पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या वेळी ‘पिफ’च्या या...

File photo
दीक्षान्त सोहळ्यातील 275 पदके घटली

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे दीक्षान्त समारंभात पदक, पारितोषिकांसाठी वाढीव रक्‍कम देण्याचे आवाहन करण्यात आले होते....

वयाच्या विशीतच जग जिंकणाऱ्या तरुणाईसाठी मतदान

मुंबई : देशातील तरुणाईचा सर्वांत प्राधान्यक्रम असलेली बँक अशी ओळख निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवत स्टेट बँक ऑफ इंडियाने 'योनो 20 अंडर 20' या...

18 भावी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले एम डी सिंहकडून धडे; बीड आणले होते देशात पहिले

बीड: ऊसतोड मजूरांचा जिल्हा, कायम दुष्काळी, टंचाई अशी ओळख पुसून जिल्ह्याने राज्यातच नव्हे तर देशात प्रधानमंत्री पिकविमा योजनेत अव्वल येण्याचा मान...

प्र. ना. परांजपे यांच्या पत्नीचे नागपुरात निधन

नागपूर : ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांच्या पत्नी वसुधा परांजपे (७६) यांचे मंगळवारी (ता.१५) नागपुरात ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन...

संभाजी ब्रिगेडकडून आदर्श मातांचा गौरव

पुणे -  राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त समाजामध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या दहा मातांना संभाजी ब्रिगेडतर्फे आदर्श माता पुरस्काराने लाल...