Sections

शिक्षक संघटनेची अर्थमंत्री, शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

प्रा. भगवान जगदाळे |   बुधवार, 14 मार्च 2018
शिक्षक संघटनेची अर्थमंत्री, शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

"सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी एकजूट रहावे. आजपर्यंत आपल्याला जे काही मिळाले आहे, ते केवळ संघटनेमुळेच मिळाले आहे. संघटनेच्या बैठका, बहिष्कार, मोर्चे, आंदोलने यांच्यात सहभागी न होणाऱ्यांना संघटनेवर टीका करण्याचा अधिकार नाही."
- प्रा. बी. ए. पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष व नाशिक विभागीय अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.

उर्वरित मागण्या मान्य न झाल्यास २१ मार्चपासून मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण

निजामपूर-जैताणे (धुळे) : बारावी बोर्डाच्या पेपरतपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेतल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत मंगळवारी (ता. १३) विधानभवनात संयुक्त बैठक झाली. यावेळी शिक्षकांच्या काही प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. १७ मार्चला पुन्हा संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी संघटनेला दिले आहे. तेव्हाही संघटनेच्या मागण्यांवर अंतिम निर्णय न झाल्यास मंत्रालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, सरचिटणीस प्रा. संजय शिंदे यांनी शासनाला दिला आहे.

पुढील मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली... १. २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या पायाभूत, वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनासाठी आर्थिक तरतूद करणे. तसेच २०११-१२ पासूनच्या वाढीव पदांना मान्यता देणे. २. माहिती तंत्रज्ञान विषय अनुदानित करणे. ३. २४ वर्षांच्या सेवेनंतर सर्वांना सरसकट निवडश्रेणी देणे. ४. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अर्धवेळ व अंशतः अनुदान तत्त्वावरील शिक्षकांना, तसेच १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे. ५. २०१२ पासून नियुक्त सर्व शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून आतापर्यंतची थकबाकी देणे. ६. उपप्राचार्य, पर्यवेक्षक यांच्या 'ग्रेड-पे' मध्ये वाढ करणे. तसेच घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधन वाढविणे. ७. विनाअनुदानित सेवा वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी ग्राह्य धरणे. त्याबाबत ६ मे २०१४ च्या शासनादेशात सुधारणा करणे. ८. कायम विनाअनुदानित मूल्यांकनपात्र उर्वरित कनिष्ठ महाविद्यालयांच्या याद्या तातडीने जाहीर करणे आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.

Web Title: dhule news junior college professor federation examination paper vinod tawde

टॅग्स

संबंधित बातम्या

ओला, उबरचा उद्यापासून बंद 

मुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे...

muktapeeth
घरचे कार्य! (ढिंग टांग)

गेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...

फेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला

पुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...

flex.jpg
धोकादायक फ्लेक्‍स हटवा

पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...

पोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन

मंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...

शाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी

मूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...