Sections

रक्तदान, अवयवदानाची शपथ हाच आज लग्नाचा आहेर 

प्रशांत कोतकर |   शनिवार, 17 मार्च 2018
swapnil-varsha

नाशिक : पर्यावरणाची, अवयव दानाची, गुढी वेगळी हर्षाची..., सहजीवनाच्या आरंभाची घटिका स्वप्नील -वर्षाची...! या आपण सर्व सामाजिक सामीलकीचे सहजीवन आरंभाला... रक्तदान- अवयवदानाची शपथ हाच असेल आमचा लग्नाचा आहेर, असे विवाहाचे आमंत्रण दिले आहे, ते कुणी सामाजिक किंवा राजकीय कुटुंबाने नव्हे, तर सहाय्यक प्राप्तिकर आयुक्त व सहाय्यक उपायुक्त (भविष्यनिर्वाह निधी) या अधिकारी जोडप्याने. 

नाशिक : पर्यावरणाची, अवयव दानाची, गुढी वेगळी हर्षाची..., सहजीवनाच्या आरंभाची घटिका स्वप्नील -वर्षाची...! या आपण सर्व सामाजिक सामीलकीचे सहजीवन आरंभाला... रक्तदान- अवयवदानाची शपथ हाच असेल आमचा लग्नाचा आहेर, असे विवाहाचे आमंत्रण दिले आहे, ते कुणी सामाजिक किंवा राजकीय कुटुंबाने नव्हे, तर सहाय्यक प्राप्तिकर आयुक्त व सहाय्यक उपायुक्त (भविष्यनिर्वाह निधी) या अधिकारी जोडप्याने. 

कळवण येथील मूळ रहिवासी असलेले स्वप्नील कोठावदे (आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे सहाय्यक प्राप्तिकर आयुक्त म्हणून कार्यरत आहे) तर त्यांच्यासोबत सहजीवनाचा प्रारंभ करणाऱ्या नाशिक येथील श्रमिकनगरातील रहिवासी वर्षा पगार कर्नाटक राज्यात भविष्यनिर्वाह निधी विभागात सहाय्यक उपायुक्त म्हणून कार्यरत आहे. हे दोघे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 18 मार्चला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांनीही आहेर मागितलाय... तो येताना अवयवदानाची शपथ आणि रक्तदानाचा संकल्प सोबत आणायला विसरू नका... असं आग्रहाचं निमंत्रण त्यांनी दिलंय. 

स्वप्नील कोठावदे म्हणाले, की लग्नात सर्व कुटुंबीय एकत्र येतात. अनेक लोक भेटतात. त्यामुळे विवाह अवयवदानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोचवण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. एखादा व्यक्ती जगणार नसेल तर तो इतरांना आयुष्य देऊ शकतो. भारतात अवयवदानाबाबत हळूहळू जनजागृती होतेय. अवयवदान आणि अवयवांची मागणी यांच्यात फार मोठी तफावत आहे. देशात दहा लाख लोकांमागे फक्त 0.58 व्यक्ती अवयवदानाचा निर्णय घेतात. अवयवांच्या प्रतीक्षेत लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे ही प्रतीक्षायादी कमी करायची असेल तर अवयवदानाचं महत्त्व घराघरांत पोचलं पाहिजे. 

वर्षा पगार म्हणाल्या, की लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही सरकारी नोकरी निवडली. अवयवदानाने लोकांना नवसंजीवनी मिळू शकते. आमच्या लग्नात आम्ही पहिल्यांदा रक्तदान करणार आहोत. यासाठी नाशिक वैद्यकीय महविद्यालयाची टीम उपस्थित असेल. नर्सिंग कॉलेजच्या मुली लग्नाला आलेल्यांना अवयवदानाची माहिती देतील. त्याचसोबत एक अवयवदानाची शपथ देण्यासाठी अर्ज देतील. आमच्या लग्नात आवाज नसेल. कारण लग्न इकोफ्रेंडली पद्धतीने करण्याचं आम्ही ठरवलंय आहे.  जिल्हा परिषदेच्या शाळेत केंद्रप्रमुख असलेले शरद व शिक्षिका सुरेखा कोठावदे यांनी सांगितले, की स्वप्नील व वर्षा या दोघांनी घेतलेला निर्णय आम्हाला ज्यावेळी सांगितला, त्या वेळी आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शिक्षक या नात्याने आम्ही जे मुलांना सांगत असतो, त्याची कृती प्रत्यक्षात आमचा मुलगा करीत असल्याने आम्हाला अभिमान आहे.

Web Title: appeal for blood and organ donation in marriage swapnil varsha

टॅग्स

संबंधित बातम्या

muktapeeth
घरचे कार्य! (ढिंग टांग)

गेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...

लग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या 

औरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...

असा झाला दीप-वीर लग्नसोहळा !

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने...

flex.jpg
धोकादायक फ्लेक्‍स हटवा

पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...

स्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या

शेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...

nashik
विंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा

सटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...