Sections

गुगल ‘जीबोर्ड’ ॲप आता अपडेटसह

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 2 एप्रिल 2018
Google-GBoard-App

स्मार्टफोनवरून स्थानिक भाषेमध्ये संवादाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. हे सर्व शक्‍य झाले आहे, ते त्या त्या भाषेतील कीबोर्डची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे. स्थानिक भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी गुगलचे ‘जीबोर्ड’ हे ॲप खास बनले आहे. कारण गुगलने हे ॲप आणखी अपडेट केले आहे. ॲपमध्ये नवीन फिचर जोडण्यात आले आहे. या अपडेटमुळे हे ॲप आता आणखी २० भाषांना सपोर्ट करू लागले आहे. जगभरातील जवळपास तीनशे भाषांना गुगलचे ‘जोबीर्ड’ सपोर्ट करते. याशिवाय व्हॉट्‌स ॲप किंवा अन्य मेसेंजरच्या माध्यमातून टेक्‍स्ट मेसेजद्वारे एखाद्या रेस्टॉरंटचा पत्ता किंवा माहिती सांगायची झाल्यास, या ॲपवरूनच सर्च करता येईल.

स्मार्टफोनवरून स्थानिक भाषेमध्ये संवादाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. हे सर्व शक्‍य झाले आहे, ते त्या त्या भाषेतील कीबोर्डची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे. स्थानिक भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी गुगलचे ‘जीबोर्ड’ हे ॲप खास बनले आहे. कारण गुगलने हे ॲप आणखी अपडेट केले आहे. ॲपमध्ये नवीन फिचर जोडण्यात आले आहे. या अपडेटमुळे हे ॲप आता आणखी २० भाषांना सपोर्ट करू लागले आहे. जगभरातील जवळपास तीनशे भाषांना गुगलचे ‘जोबीर्ड’ सपोर्ट करते. याशिवाय व्हॉट्‌स ॲप किंवा अन्य मेसेंजरच्या माध्यमातून टेक्‍स्ट मेसेजद्वारे एखाद्या रेस्टॉरंटचा पत्ता किंवा माहिती सांगायची झाल्यास, या ॲपवरूनच सर्च करता येईल. त्यानंतर सर्च केलेला पत्ता किंवा माहिती ॲपद्वारे थेट पाठवता येईल. गुगलने सर्च ही सुविधा या ॲपमध्ये कीपॅडच्या वरच्या बाजूला दिली आहे. समजा इंटरनेटवर एखाद्या ठिकाणाबद्दल माहिती घ्यायची असेल, तर या कीपॅडच्या वरच्या बाजूला दिलेल्या सर्च आयकॉनवर क्‍लिक करावे लागेल. त्यानंतर आपोआप सर्च स्क्रिनवर येईल. त्यानंतर ठिकाण सर्च केल्यास त्याची माहिती स्क्रिनवर येईल. ही माहिती कॉपी, पेस्ट न करता पाठवता येईल. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर कोणत्याही मेसेजिंग ॲपमध्ये जीबोर्डचा वापर करता येईल. जीबोर्डमध्ये ग्लाईड टायपिंग, व्हॉईस टायपिंग, सर्च ॲन्ड शेअर, इमोजी सर्च, जीआयफ, मल्टिंगल टायपिंग, गुगल ट्रान्स्लेट या गोष्टी मिळतात.

Web Title: sci tech google gboard app

टॅग्स

संबंधित बातम्या

Dog
कुत्ते की पूंछ! (ढिंग टांग)

वझीरेआजम-ए-हिंदोस्तां जनाब नमोजीसाहब, अत्यंत दुखभऱ्या दिलाने आपल्याला हे खत लिखत आहे. हे खत पढून झाल्यावर तुम्ही फाडून टाकणार हेही मला मालूम आहे....

muktapeeth
नेपाळची सायकलसफर

तुमचा हेतू चांगला असेल तर चंबळचे डाकूही तुम्हाला मदत करतात, असा अनुभव आहे. लहानमोठ्या अनेक सायकलसफरी केल्यानंतर आम्ही मित्रांनी सायकलवरून थेट...

Digital Cleanliness
डिजिटल स्वच्छतेची गरज

ज्या माहितीचा कोणालाही फायदा होणार नाही किंवा झालेच तर त्या माहितीने नुकसानच होऊ शकते, अशा कितीतरी पोस्टद्वारे आपण कचरानिर्मिती करत असतो. कचरा म्हणजे...

Digital-Marketing
महिलांची पाउले डिजिटल मार्केटिंगकडे

नागपूर - आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन घराघरांत पोहोचले. प्रत्येक व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातूनच जगाशी...

Engineers Day Sir M Vishweshwaraiah Google Doodle
Engineers Day : डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांना डुडल समर्पित

नवी दिल्ली- डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांची जंयती इंजिनिअर्स डे म्हणून जगभरात साजरी केली जाते. यानिमित्तानेच गुगल या सर्च इंजिनने खास अॅनिमेटेड डुडल...