Sections

मानस (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी |   मंगळवार, 8 मे 2018
dhing tang

बेटा : (ब्याग खांद्यावर अडकवून) ढॅणढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (वर्तमानपत्रात डोकं घालून थंडपणे) वेलकम!
बेटा : (जाहीर करत)...अँड गोइंग बॅक!
मम्मामॅडम : (कपाळाला आठ्या घालून) आता कुठे? कर्नाटकातला निकाल लागल्याशिवाय कुठेही जाऊ देणार नाही तुला!!
बेटा : (चुटक्‍या वाजवत) कर्नाटकचा निकाल लागल्यात जमा आहे!! पंधरा मिनिटांत जिंकून दाखवीन मी कर्नाटक!! आहे काय नि नाही काय! तिथल्या दौऱ्यात भेटलेल्या प्रत्येक माणसानं मला सांगितलं : ह्या वेळी आमचं मत तुम्हालाच!
मम्मामॅडम : (पेपरात डोकं खुपसून) एवढा आत्मविश्‍वास बरा नव्हे!!

बेटा : (ब्याग खांद्यावर अडकवून) ढॅणढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक! मम्मामॅडम : (वर्तमानपत्रात डोकं घालून थंडपणे) वेलकम! बेटा : (जाहीर करत)...अँड गोइंग बॅक! मम्मामॅडम : (कपाळाला आठ्या घालून) आता कुठे? कर्नाटकातला निकाल लागल्याशिवाय कुठेही जाऊ देणार नाही तुला!! बेटा : (चुटक्‍या वाजवत) कर्नाटकचा निकाल लागल्यात जमा आहे!! पंधरा मिनिटांत जिंकून दाखवीन मी कर्नाटक!! आहे काय नि नाही काय! तिथल्या दौऱ्यात भेटलेल्या प्रत्येक माणसानं मला सांगितलं : ह्या वेळी आमचं मत तुम्हालाच! मम्मामॅडम : (पेपरात डोकं खुपसून) एवढा आत्मविश्‍वास बरा नव्हे!! बेटा : मी तिथल्या कार्यकर्त्यांना सांगून टाकलंय की ते कमळवाले बूथ जिंकणार आहेत, आपण थेट सीटच जिंकू! बूथ जिंकून काय करणार? हाहा!! मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) निकाल लागेल तेव्हा खरं! बेटा : (चुटक्‍या वाजवत) यू जस्ट डोण्ट वरी! कर्नाटकातलं सरकार पाडून आपण आपलं सरकार आणू! बघशीलच तू!! (दात ओठ खात) लेकाचे मला आव्हान देतात काय!!. मम्मामॅडम : (दचकून) तिथं आपलंच सरकार आहे बेटा!! बेटा : (सावरून घेत) व्हॉटेव्हर! नवं सरकार आणायचं म्हटलं तर जुनं घालवावं लागतंच ना!! आणि त्या कमळवाल्यांचं आव्हान स्वीकारून मी नवं सरकार आणण्याची सगळी तयारी करून ठेवली आहे! मम्मामॅडम : (संयमाने) काय तयारी केलीस? कसलं आव्हान? बेटा : (संतापानं) त्या मोदीजींनी मला आव्हान दिलं होतं की सलग पंधरा मिनिटं हातात कागद न धरता बोलून दाखवा! मम्मामॅडम : ते नाव माझ्यासमोर घ्यायचं नाही, शंभर वेळा बजावलंय तुला! बेटा : (दुर्लक्ष करत)... त्यांचं दुसरं आव्हानही मी पेललं, मम्मा!! मम्मामॅडम : (प्रश्‍नार्थक) कुठलं? बेटा : विश्‍वेश्‍वरय्या!! मला आता हे नावही छान उच्चारता येतं!! विश्‍वेश्‍वरय्या, विश्‍वेश्‍वरय्या, विश्‍वेश्‍वरय्या!! आणखी दोनदा उच्चारून दाखवू? मम्मामॅडम : (घायाळ होत) त्या कमळवाल्यांची आव्हानं एवढी मनावर घ्यायची नसतात बेटा! नतद्रष्ट माणसं आहेत ती!! बेटा : अडलंय माझं खेटर! जिंकणाऱ्या माणसानं विरोधकांना मनावर घ्यायचंच नसतं मुळी!! म्हणून तर मी सुट्टीची तयारीसुद्धा केली!! मैं तो चला छुट्टी पे!! मम्मामॅडम : (काळजीनं) तू कुठून येतो आहेस की चालला आहेस? बेटा : (खुलासा करत) वेल... दोन्हीही!! कर्नाटकाहून आलो आहे, आणि आता बाहेर सहलीला जाणार आहे!! मम्मामॅडम : (पोटात गोळा येऊन) पुन्हा परदेशात? बेटा : (गोंधळून) कैलास-मानस सरोवर फॉरेनमध्ये आहे की इंडियात? मम्मामॅडम : (किंचित विचार करून) ज्या अर्थी तिथं आपले प्रधानसेवक अजून गेलेले नाहीत, त्याअर्थी इंडियात असावं!! बेटा : इंडियात नसणार! तिथं जायला पासपोर्ट लागतो!! मम्मामॅडम : (घाईघाईने) अजिबात जायचं नाही कुठं!! कैलास-मानसची यात्रा खूप डेंजरस असते म्हणे! मी नाही जाऊ देणार तुला!! हवं तर इटलीला किंवा नॉर्वेला जा!! बेटा : (निर्धाराने) नोप!! कैलास-मानसलाच जाणार... माझं विमान मध्यंतरी हेलकावे खात होतं तेव्हाच मी ठरवलं की तिथं जाऊन यायला हवं!! सोमनाथ वगैरे ठीक आहे, पण कैलास-मानस इज सुप्रीम!! आय मस्ट गो देअर!! तिथंही एखादं भाषण वगैरे देऊन येईन म्हणतो!! मम्मामॅडम : (हताश होत) तिथं काही नाही रे! खडतर यात्रा आहे, आणि प्रचंड थंडी आहे!! आपलं कैलास-मानस आहे इथं दिल्लीतच! कळलं? तिथं कशाला जायचंय तुला? बेटा : (निरागसपणे) मानस सरोवरात राजहंस असतात म्हणे! त्यांच्याकडून नीरक्षीर विवेक शिकून घेण्याचा मानस आहे माझा!! गॉट इट?

Web Title: editorial dhing tang british nandi article

टॅग्स

संबंधित बातम्या

खडकवासला कालवा समितीची बैठक आठ दिवसात घेणार

खडकवासला  : "शहराला पिण्यासाठी व दौंड, इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी देण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणार आहे.  ...

गौरी लंकेश हत्या प्रकरणः शरद कळसकर होता बेळगावात

बेळगाव - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी आधी महाराष्ट्र एटीएसने व नंतर सीबीआयने अटक केलेल्या शरद कळसकरचे नाव आता डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि...

शेतकऱ्याला २० लाखांचा गंडा

जत - शेतात सोलर सिस्टीम बसवून सरकारी अनुदान मिळवून देतो म्हणून आप्पासाहेब गळवे (रा. कोसारी, ता. जत) या शेतकऱ्याला २० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी...

Mohan Bhagawat speak about ram mandir
'राममंदिर व्हावे, ही संघाची इच्छा; आरक्षणाला विरोध नाही'

नवी दिल्ली - अयोध्येत भव्य राममंदिराची निर्मिती लवकरात लवकर व्हायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी, जम्मू-काश्‍मीरबाबतचे...

वीज दरवाढीमुळे ५२ संस्था अवसायनात

कुडित्रे - स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये पाणीपुरवठा संस्थांचे बीज सहकारातून रोवले गेले. पाणीपुरवठा संस्थांमुळे जमीन सिंचनाखाली येऊन पश्‍चिम...