Sections

हॉकिंग! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी |   शुक्रवार, 16 मार्च 2018
dhing tang

काळोखाला नसते उत्तर
उजेड करतो सवाल तेव्हा
अज्ञानाच्या विवरालाही
लवलव सहस्र जिव्हा

ॐकाराच्या मूळारंभी
नव्हते येथे सत-असतही
आकाशाची नव्हती चाहूल,
अंकुरले नच अंतरिक्षही

येथे नव्हते काहीच आणिक
तेथेही नव्हतेच काहीही
असण्या-नसण्याच्या व्योमातच
स्फुटल्या होत्या दिशा दहाही

कोण असावे साऱ्या मागे?
कोण असे तो, जो विश्‍वंभर?
कुणी रुजविले आदिबीज अन्‌
कुणी रचियले हे अवडंबर?

कोठे लपले होते इतुके
असण्याच्याही आधी सारे?
नसण्याच्याही आधी होते
जळस्थळ किंवा चांद सितारे?

काळोखाला नसते उत्तर उजेड करतो सवाल तेव्हा अज्ञानाच्या विवरालाही लवलव सहस्र जिव्हा

ॐकाराच्या मूळारंभी नव्हते येथे सत-असतही आकाशाची नव्हती चाहूल, अंकुरले नच अंतरिक्षही

येथे नव्हते काहीच आणिक तेथेही नव्हतेच काहीही असण्या-नसण्याच्या व्योमातच स्फुटल्या होत्या दिशा दहाही

कोण असावे साऱ्या मागे? कोण असे तो, जो विश्‍वंभर? कुणी रुजविले आदिबीज अन्‌ कुणी रचियले हे अवडंबर?

कोठे लपले होते इतुके असण्याच्याही आधी सारे? नसण्याच्याही आधी होते जळस्थळ किंवा चांद सितारे?

खरेच का तो कृष्णविधाता हिरण्यगर्भामधुनी उगवला? की हा त्या सद्‌अध्यक्षाचा थातुरमातुर केवळ जुमला?

कूटघनाचे प्रश्‍न मांडती उपनिषदांची दीर्घ मंडले अवकाशाचे लोकन करिती इजिप्तातले त्रिकोण इमले

काळोखाचे शोधत उत्तर युगामागुनी युगे निमाली किती संस्कृत्या, शास्त्रे, वेत्ते नष्ट जहाल्या मातीखाली

तरिही नाही गमले उत्तर नाही कळले येथ प्रयोजन जीवित्वाचे गुह्य न कळले जन्म-मृत्यूचे नकळे सर्जन

अज्ञानाच्या वत्सल मार्गी धार्मिक करिती पवित्र शिंपण ज्ञाताच्या शेतास बांधती कर्मठतेचे कठोर कुंपण

सपाट पृथ्वीभवती फिरतो सहस्त्ररश्‍मी गुलाम तारा तिरक्‍या आसावर ध्रुवाचा तोल ढळावा जगदाकारा

पृथ्वीवरचे कुठले माकड उभे राहिले दोन पदांवर सुदूर तिथल्या अवकाशातच सुरू जाहला त्याचा वावर

शतसूर्याच्या शतमालांतील दुय्यम तिय्यम सौरजनांची प्रियतम प्रेमळ वसुंधरा ही जाग जपतसे अस्तित्वाची...

अनंतातल्या ब्रह्मरुपाने कृष्णवापीतील गुरुत्व प्यावे अज्ञाताच्या ओढीने मग सर्व चराचर मागून धावे

क्षणाक्षणाने पळापळाने घेऊन कळीकाळाला भयाण मरक्‍या भवतालाचे कोडे पडले महाभुताला

काळोखाला नसते उत्तर उजेड करतो सवाल तेव्हा अज्ञानाच्या विवरालाही लवलव सहस्र जिव्हा

नचिकेताचे वस्त्र लेवुनी पहा निघाला कुणी उदासी अतिथी असावा पृथ्वीवरचा अनंतातला खरा प्रवासी !

Web Title: editorial dhing tang british nandi article

टॅग्स

संबंधित बातम्या

dhing tang
बोबडे वकील! (ढिंग टांग)

बेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!! मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं! बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...

Ambedkar-and-Owaisi
आघाडीमध्ये ‘एमआयएम’ नकोच - काँग्रेस

मुंबई - असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’सोबत काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत आघाडी करूच शकत नाही, असे काँग्रेस नेत्यांनी आज भारिपचे नेते प्रकाश...

Ganesh festival : मेरे मालिक, मेरे मौला.. बाप्पा मोरया!

बेळगाव - बेळगाव शहराला मोठी परंपरा असून शहरात धार्मिक सलोख्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. शहराला लागून असलेल्या काही गावांमध्येही हिंदू-...

dhing tang
वित्तपत्रे! (ढिंग टांग)

पत्र क्रमांक एक : सर्व संबंधितांसाठी- गेले काही दिवस आम्ही वित्त आयोगातर्फे महाराष्ट्र राज्याची एकंदर आर्थिक स्थिती तपासून पाहात होतो. सर्वप्रथम...

vijay salunke
राजकीय साठमारीपासून लष्कर अलिप्तच हवे

सत्ताधारी आपल्या बचावासाठी किंवा विरोधकांची कोंडी करण्यासाठी प्रशासन, पोलिस, गुप्तचर, लष्कर वा न्यायपालिका वापरू लागतात, तेव्हा लोकशाहीचा कडेलोट अटळ...