Sections

वाघ वाचवा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी |   शुक्रवार, 9 मार्च 2018
dhing tang

स्थळ : ताडोबा अभयारण्य.
वेळ : सकाळची.
प्रसंग : न्याहारीचा.
पात्रे : मिस्टर अँड मिसेस वाघ.

स्थळ : ताडोबा अभयारण्य. वेळ : सकाळची. प्रसंग : न्याहारीचा. पात्रे : मिस्टर अँड मिसेस वाघ.

मिस्टर वाघ : (पडेल आवाजात) ऐकलंत का? मिसेस वाघ : (पंजाने वारत) छुत छुत...! मि. वाघ : (आणखी पडेल आवाजात) अहो, मी काय बोका आहे का, छुत छुत करायला? नऊ वाजून गेले, चहा नाही झाला अजून !! मिसेस वाघ : (पेपर वाचता वाचता) तुम्हीच ठेवा आज चहा ! मि. वाघ : (हबकून) मी? मिसेस वाघ : (फणकाऱ्यानं) आज महिला दिन आहे म्हटलं ! मेला, आज तरी आयता कपभर चहा मिळू दे आम्हाला !! मि. वाघ : (अजीजीनं) चहाशिवाय हातपाय चालत नाहीत हो आमचे !! पहिला तुम्हीच करा, दुसरा हवंतर मी ठेवतो !! मिसेस वाघ : (निष्ठूरपणे)..नाऽऽही ! मी तर म्हणते ब्रेकफास्टचीही तयारी करून ठेवा !! मि. वाघ : (शरणागती पत्करत) मला आमलेट चालेल !! मिसेस वाघ : (पेपर आपटत) एखादा जातिवंत वाघ असता तर छान ससाबिसा मारून आणला असता ! अंडी खातायत, अंडी !! सदोदित मेलं ते लक्ष वनरक्षकांच्या डब्याकडे !! ते येऊन गवत कापत बसले की तुम्ही टिफिन पळवून आणणार ! तेवढीच मर्दुमकी उरलीये का तुमच्यात? मि. वाघ : (खोल आवाजात) अहो, किती टाकून बोलाल !! हल्ली शिकार मिळणं किती दुरापास्त झालंय नोटाबंदीनंतर ! फुकट येते का शिकार? काळविटावर तर अठ्ठावीस टक्‍के जीएसटी लागलाय ! पेपर वाचता ना तुम्ही? मिसेस वाघ : (पेपरकडे पाहून नाक मुरडत) आहे काय त्या पेपरात? हु:!! मि. वाघ : (चेवात येत) महाराष्ट्रातल्या चिमूर जिल्ह्यात अठ्ठेचाळीस तासांत सात वाघ जिवानिशी मेलेत !! वाचा बातमी पेपरात !! मिसेस वाघ : (आश्‍चर्यानं) माय गॉड ! मी कशी नाही वाचली बातमी? सात वाघ मेले? मि. वाघ : (डोळे मिटून) आजारीच होते...पण  गेले हे खरं ! मिसेस वाघ : (चिंतातुर सुरात) आपल्या त्या तमकीचा बछडा होता नं चिमूर डिव्हिजनमध्ये? त्याचं तर नाही ना बरंवाईट काही झालं? मि. वाघ : (सुस्कारा सोडत) आपण हयात आहोत हे काय कमी आहे? दिवस बरे नाहीत एवढं मात्र खरं ! तसं काळजीचं कारण नाही म्हणा !! आपल्या मुनगंटीवारसाहेबांनी चौकशीचे आदेश दिलेच आहेत ! दोन दिवसांत अहवाल येतोय म्हणे ! बघू या, काय होतं ते !! मिसेस वाघ : (आणखी काळजीत पडून) आणि आपल्या मुंबईच्या वाघांचं काय? मि. वाघ : (त्रयस्थ सुरात) त्यांचं काय? बोरिवलीचे बिबटे मजेत आहेत ! खायला प्यायला भरपूर !! हॅम, पोर्क, हॉट डॉग काय म्हणशील ते हजर आहे त्यांना !! डुकरं, कुत्री मारून खातायत लेकाचे !! मिसेस वाघ : इश्‍श... त्या बिबट्यांचं काय सांगताय? भुरटी मांजरं आहेत ती !! मुंबईचे खरेखुरे वाघ म्हणतेय मी...ते...ते...बांदऱ्याचे !! मि. वाघ : त्यांचं बरं चाललंय की वाईट हेच अजून ठरत नाहीए !! पण ‘आम्ही त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहो,’ असं मुनगंटीवारसाहेबांनी सांगितलंय ! मिसेस वाघ : लक्ष ठेवून आहो, म्हंजे काय? हे काय बोलणं झालं? मि. वाघ : (दोन्ही पंजे डोक्‍यामागे टाकत) मुंबई हे वाघांचं सर्वांत मोठं अभयारण्य आहे बाईसाहेब ! तिथल्या वाघांना काहीही प्रॉब्लेम नाही ! विदर्भातल्याच वाघांची अवस्था शेतकऱ्यांसारखी झाली आहे !! मिसेस वाघ : (शेपूट वेळावत) मी काय म्हणते... नाहीतरी तुम्ही शिकारबिकार सोडलीच आहे ! नुसत्याच डरकाळ्या मारत बसता ! ...आपण मुंबईतच स्थलांतर करूया का? चार घास बरे पोटात जातील तरी !! काय?

Web Title: editorial dhing tang british nandi article

टॅग्स

संबंधित बातम्या

दुष्काळाचा कृती कार्यक्रम हाती घ्या; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने निश्‍चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पावले उचलून जनतेला...

#PmcIssues 'स्मार्ट' पुण्याची टॉयलेट्‌स मात्र 'वर्स्ट' ! 

पुणे : तुटलेले दरवाजे, पाण्याचा अभाव, खिडक्‍यांच्या फुटलेल्या काचा, नळच गायब... जागोजागी कचरा..... हे आहे चित्र शहरातील महिलांच्या सार्वजनिक...

काँग्रेसचा सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीनेच लढणार असल्याचे निश्‍चित झालेले असले तरी कॉंग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व 48...

sundeep waslekar
हवी विवाद-निराकरण यंत्रणा (संदीप वासलेकर)

विवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात...

पालिका आयुक्तांविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार : स्वराज

मुंबई : पालिकेतील अनुसूचित जातींच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांबाबत पालिका आयुक्त आणि प्रशासनाबरोबर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला...

sandeep kale
हसलेली झेंडूची फुले... (संदीप काळे)

आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला...